शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
6
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
7
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
8
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
9
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
10
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
11
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
12
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
13
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
14
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
15
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
16
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
17
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
18
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
19
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
20
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

परिवहन वाहनांच्या ‘एक्सप्रेस’ वेगाला ‘ब्रेक’

By admin | Updated: April 20, 2016 00:21 IST

‘स्पीड गव्हर्नर’ बंधनकारक : पासिंग थांबवले; प्रवासी तसेच मालवाहू वाहनांना आता वेगमर्यादा

कऱ्हाड : महामार्गाच्या चौपदरीकरणानंतर वाहतुकीचा वेग वाढला; पण या वाढत्या वेगामुळे अपघाताचे प्रमाणही वाढले़ इतर वाहनांपेक्षा परिवहनच्या वाहनांचा वेग प्रवाशांच्या काळजात धडकी भरवणारा असतो. मात्र, आता या वेगाला ‘ब्रेक’ लागला असून, परिवहन संवर्गातील वाहनांना ‘स्पीड गव्हर्नर’ बसविणे बंधनकारक करण्यात आले आहे. ज्यामुळे चालकाने कितीही ‘अ‍ॅक्सिलेटर’ दाबला तरी संबंधित वाहन निर्धारीत वेगापेक्षा जास्त वेगाने धावूच शकणार नाही. स्टेअरिंगवर हात, अ‍ॅक्सीलेटवर पाय, डोळ्यावर गॉगल अन् बंद काचा़ ‘स्पिडॅमीटर’चा काटा क्षणाक्षणाला पुढे सरकतो़ १००़़़ ११०़़़ १२०़़़ तर कधी त्याही पुढे; पण जोपर्यंत अडथळा येत नाही, तोपर्यंत चालकाचा ‘अ‍ॅक्सिलेटर’वरचा पाय हटत नाही़ लक्ष कुठंही असलं तरी गाडीचा वेग मात्र वाढतच असतो़ बंद काचांमुळे वेगाची जाणीव होत नाही अन् ज्यावेळी जाणीव होते त्यावेळी वाहनावर चालकाचा ताबा राहत नाही़ चालकाचा ताबा सुटल्यानेच अनेक वाहने अपघातग्रस्त होतात. त्यामध्ये काही वाहनांचा अक्षरश: चक्काचूर होतो. महामार्गावर धावणाऱ्या वाहनांच्या वेगाची तपासणी करण्यासाठी महामार्ग पोलिसांना ‘स्पिडगन’ पुरविण्यात आल्या आहेत़ मात्र, त्या ‘स्पिडगन’चा क्वचितच वापर होतो़ वेगाची मर्यादा ओलांडल्याप्रकरणी कधीतरी एखाद्या चालकावर कारवाई होताना दिसते़ एरव्ही प्रत्येक सेकंदाला वाऱ्याच्या वेगात वाहने धावत असतात़ प्रवासी तसेच माल वाहतूक करणाऱ्या वाहनांचा हा अमर्याद वेग कधीकधी अनेकांच्या जीवावर बेततो. त्यामुळे या वाहनांच्या वेगाला मर्यादा घालण्याचा निर्णय केंद्र शासनाने घेतला. गेल्या अनेक वर्षांपासून याबाबत कागदोपत्री कार्यवाही सुरू होती. मात्र, तांत्रिक अडचणी व इतर कारणांमुळे वेग मर्यादेचा विषय रखडत गेला. अखेर शासनाने याबाबत अधिसूचना काढली असून, वाहनांची वेग मर्यादा निर्धारीत केली आहे. वाहनांच्या या निर्धारित वेगासाठी वाहनांना वेगनियंत्रक बसविणे बंधनकारक केले आहे. १ आॅक्टोबर २०१५ रोजी व त्यानंतर उत्पादित होणाऱ्या परिवहन संवर्गातील वाहनांना उत्पादकांकडून उत्पादनाच्या वेळेसच हे नियंत्रक बसविणे क्रमप्राप्त करण्यात आले आहे. १ एप्रिलपासून ही अधिसूचना लागू करण्यात आली असून, प्रादेशिक तसेच उपप्रादेशिक परिवहन कार्यालयांतून वाहनांचे पासिंगही थांबविण्यात आले आहे. वेग नियंत्रक बसविल्यानंतरच वाहनांचे पासिंग होणार आहे. (प्रतिनिधी) या वाहनांना वेग नियंत्रकातून वगळलेमालवाहू दुचाकी, क्वाड्रीसायकल, फायर टेंडर्स, रुग्णवाहिका, पोलिस वाहने या वाहनांना वेग नियंत्रकातून सूट देण्यात आली आहे. फायर टेंडर्स, रुग्णवाहिका व पोलिस वाहने आपत्तीच्या वेळी वेगाने धावतात. त्यांना त्यावेळी ते गरजेचे असल्यामुळे ही सूट देण्यात आली आहे. ...तर नूतनीकरणही नाही!मालवाहू तसेच प्रवासी वाहनांचे ठराविक कालावधीनंतर नूतनीकरण करावे लागते. मात्र, यापुढे वेग नियंत्रक नसलेल्या वाहनांचे नूतनीकरण तसेच नोंदणी करण्यात येणार नाही. त्यामुळे परिवहन संवर्गात नोंदणी होणाऱ्या वाहनांना उत्पादकाने किंवा वाहन वितरकाने वेग नियंत्रक बसवूनच वाहने नोंदणी व योग्यता प्रमाणपत्रासाठी हजर करावीत, असे आवाहन करण्यात आले आहे. प्रवासी वाहनांनाही आता नियंत्रकमालवाहू वाहनांबरोबरच प्रवासी वाहनांनाही वेग नियंत्रक बंधनकारक करण्यात आले आहे. आॅटो रिक्षा, दुचाकी तसेच काळी-पिवळी जीप यांना त्यामधून वगळण्यात आले आहे. मात्र, ८+१ पेक्षा जास्त प्रवासी क्षमता असलेली वाहने, ट्रॅव्हल्स, मिनी ट्रॅव्हल्स यांना हे वेग नियंत्रक बसवावा लागणार आहे.