शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

समर्थ सद्गुरू मच्छीमार संस्थेच्या वतीने मच्छीमारांना प्रशिक्षण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2021 04:26 IST

येथील समर्थ सद्गुरू मच्छीमार सहकारी संस्थेच्या वतीने उरमोडी धरणात मच्छीमारी करणाऱ्या मच्छीमारांना प्रशिक्षण देण्यात आले. त्याबरोबर त्यांना अत्याधुनिक पद्धतीने ...

येथील समर्थ सद्गुरू मच्छीमार सहकारी संस्थेच्या वतीने उरमोडी धरणात मच्छीमारी करणाऱ्या मच्छीमारांना प्रशिक्षण देण्यात आले. त्याबरोबर त्यांना अत्याधुनिक पद्धतीने मासेमारी करण्यासाठी आवश्यक असणारी जाळी संस्थेच्या माध्यमातून दिली जाईल तसेच शासकीय योजनांचा लाभही देण्यात येईल, असे आश्वासन संस्थेचे अध्यक्ष रमेश देवरे यांनी दिले.

उरमोडी धरणात पारंपरिक पद्धतीने मच्छीमारी करणाऱ्या कातकरी समाजाच्या मच्छीमारांना तसेच उरमोडी धरणात मच्छीमारी करणाऱ्या बुडीत क्षेत्रातील लोकांना संस्थेच्या वतीने प्रशिक्षण आणि मदत मिळण्यासाठी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये मत्स्यव्यवसाय विकास अधिकारी श्रीकांत वारुंजीकर, निवृत्त मत्स्यव्यवसाय अधिकारी घाडगे, डॉ. कुंडले यांनी मार्गदर्शन केले.

मत्स्यविकास अधिकारी वारुंजीकर म्हणाले, शासनाच्या वतीने मच्छीमारांसाठी विविध योजना राबविण्यात येत आहेत. पंतप्रधान मत्स्यसंपदा योजनेच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या अनेक योजनांचा लाभ घेतला पाहिजे. शेततळ्याच्या माध्यमातून, खुल्या धरणातून तसेच बायोफ्लोक पद्धतीने मत्स्यपालन आणि मासेमारी करता येते. त्याासाठीच्या विविध योजनांचाही लाभ घ्यावा.

घाडगे म्हणाले, रंगीत मासेपालन आणि त्यांच्या विक्रीसाठी मोठी बाजारपेठ उपलब्ध आहे, याची माहिती घेऊन मत्स्यव्यवसाय केला पाहिजे.

समर्थ सद्गुरू संस्थेचे अध्यक्ष रमेश देवरे यांनीही यावेळी संस्थेच्या माध्यमातून या भागातील लोकांसाठी विविध योजना राबविण्यात येतील तसेच आवश्यक ती सर्व मदत करण्यात येईल, असे सांगितले.

यावेळी उरमोडी मातेचे ओटीभरणही करण्यात आले. कार्यक्रमाला संस्थेचे सचिव रवींद्र वाईकर, शशी वाईकर, सुधीर देसाई, गजानन वाईकर, गणेश कदम, सुनील केंजळे, किरण वांगडे, मनोज देवरे, काशिनाथ शेलार यांच्यासह या भागातील संस्थेचे सभासद व मच्छीमार उपस्थित होते.