शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारमध्ये नितीशकुमारांशिवाय भाजपा सरकार बनवू शकते, जदयू शिवाय एनडीए ११८ वर; एवढ्या जागा महागात पडणार...
2
Bihar Election 2025 Result: अजितदादांचा धुव्वा, उमेदवारांचे डिपॉझिटही जाणार? ५०० मतेही नाहीत
3
बिहारमध्ये पराभव झाल्यानंतरही, राजद आणि तेजस्वी यादवांसाठी आनंदाची बातमी
4
राहुल गांधींचा हायड्रोजन बॉम्ब त्यांच्यावरच फुटला, काँग्रेस-राजदच्या पराभवाची 5 कारणे...
5
आता माणसांचं आयुष्य वाढणार, १५० वर्षांपर्यंत जगणार? चीनचे शास्त्रज्ञ बनवताहेत अँटी एजिंग गोळी
6
ऐकावे ते नवलच! चीनमध्ये माशांना मिरच्या का खायला दिल्या जातायेत?; कारण ऐकून व्हाल हैराण
7
उत्पत्ती एकादशी २०२५: वाळलेले तुळशीचे पानही देईल लाभ, उत्पत्ती एकादशीला करा 'हा' उपाय!
8
घसरत्या बाजारात 'हा' डिफेन्स शेअर चमकला! खरेदी करण्याची ही योग्य वेळ आहे का? ब्रोकरेज फर्मने दिलं उत्तर
9
IND vs SA: पंतची विकेटमागून 'बोलंदाजी'! बावुमा कुलदीपच्या जाळ्यात अडकला! (VIDEO)
10
"निवडणूक आयोग आणि SIR जबाबदार...!"; बिहार निवडणूक निकालावरून काँग्रेस भडकली
11
Bihar Election Result: "...यापेक्षा वेगळा निकाल लागणे शक्य नव्हते"; संजय राऊतांचं निकालावर खळबळजनक विधान
12
बिहारमध्ये विजयी घौडदौड, मात्र पोटनिवडणुकीत भाजपाला मोठा फटका; ८ पैकी ६ जागांवर पराभव?
13
बिहारमध्ये एनडीएला बंपर विजय कसा मिळाला? ही आहेत ५ प्रमुख कारणं
14
तेजस्वी पिछाडीवर, तिकडे तेज प्रताप यादवांची काय अवस्था...; 'हम तो डुबेंगे सनम...' खरे ठरतेय? 
15
कामगिरी दमदार; पीएम मोदींच्या हनुमानाची 'हनुमान उडी', LJP(R) इतक्या जागांवर आघाडीवर...
16
बिहार निवडणूक निकाल: राघोपुरात तेजस्वी यादव पिछाडीवर; लखीसरायमध्ये विजय सिन्हांची आघाडी कायम
17
बिहारमध्ये NDA ला आघाडी, भाजप-जेडीयूच्या जागा वाढल्या; तेजस्वी यादवांना 'या' ५ चुका पडल्या महागात!
18
Health And Ritual: दुपारच्या जेवणानंतर वामकुक्षी ही पूर्वापार परंपरा; मेंदू होतो सुपरफास्ट!
19
“इंदुरीकर महाराज, फेटा खाली उतरवू नका, सोशल मीडियावरील छपरींकडे दुर्लक्ष करा”; कुणाचे आवाहन?
20
Utpatti Ekadashi 2025: उत्पत्ती एकादशीला 'या' ६ उपायांनी पापमुक्त व्हा; पाहा पूजाविधी!
Daily Top 2Weekly Top 5

पर्यटकांची रेलचेल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2021 04:26 IST

महाबळेश्वर : संचारंबदीमुळे जिल्ह्यातील सर्व पर्यटनस्थळे बंद असली तरी बहुतांश पर्यटक नियम डावलून महाबळेश्वर व पाचगणी या पर्यटनस्थळांना भेट ...

महाबळेश्वर : संचारंबदीमुळे जिल्ह्यातील सर्व पर्यटनस्थळे बंद असली तरी बहुतांश पर्यटक नियम डावलून महाबळेश्वर व पाचगणी या पर्यटनस्थळांना भेट देत आहेत. मात्र, स्थानिक प्रशासनाकडून अशा पर्यटकांना शहरात प्रवेश दिला जात नसल्याने त्यांना पुन्हा परतीचा प्रवास करावा लागत आहे. जिल्हा प्रशासनाने पर्यटनस्थळे सुरू करण्याबाबत निर्णय घ्यावा, अशी मागणी स्थानिकांंमधून होत आहे.

कचरा रस्त्यावरच

सातारा : सातारा शहरात पालिकेकडून घंटागाड्या व ट्रॅक्टरद्वारे कचरा संकलनाचे काम केले जाते. घंटागाड्यांमार्फत हे काम योग्य पद्धतीने सुरू असले तरी अनेक ट्रॅक्टरचालक ट्रॅक्टरमध्ये क्षमतेपेक्षा जास्त कचरा भरून डेपोकडे मार्गस्थ होत आहेत. हा कचरा रस्त्यावर पडत असल्याने नागरिकांमधून नाराजी व्यक्त केली जात आहे.

पारा २१ अंशांवर

महाबळेश्वर : सातारा शहरासह जिल्ह्यात मान्सून पूर्णपणे सक्रिय झाला नसला तरी महाबळेश्वर व पाचगणीत गेल्या काही दिवसांपासून रिपरिप सुरू आहे. पवसामुळे तापमान खालावले असून, मंगळवारी शहराचे कमाल तापमान २१.१ तर किमान तापमान १८.१ अंश सेल्सिअस नोंदवले आहे. थंडीमुळे महाबळेश्वर तालुक्यात शेकोट्या पेटू लागल्या आहेत.

कसरत थांबली

सातारा : जुना मोटर स्टॅँड ते बुधवार नाका या मार्गाच्या डांबरीकरणााचे काम नुकतेच पूर्णत्वास आले आहे. अनेक वर्षांपासून खड्डेमय रस्त्यामुळे सुरू असलेली परवड थांबल्याने वाहनधारकांसह व्यापारी व दुकानदारांमधून समाधान व्यक्त होत आहे. या रस्त्याची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली होती. या मार्गावरून वाहन चालविणेदेखील जिकरीचे बनले होते. पालिकेने डांबरीकरणाचे काम मार्गी लावल्याने बुधवार नाका मार्गावरील वाहतूक सुकर झाली आहे.

डागडुजीची मागणी

मेढा : केळघर-महाबळेश्वर मार्गावर ठिकठिकाणी खड्डे पडले असून, त्याचा वाहनधारकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. सातारा ते महाबळेश्वर या मार्गाच्या डांबरीकरणाचे काम सुरू आहे. यासाठी रस्त्यात मोठ्या प्रमाणात खोदकाम करण्यात आले आहे. डांबरीकरणाच्या कामामुळे या मार्गावर अवजड वाहतूक सातत्याने सुरू आहे. त्यामुळे ठिकठिकाणचे रस्ते उखडले असून, रस्त्यावर खड्डेच खड्डे पडले आहेत.

खडीमुळे अपघात

सातारा : अर्कशाळा ते शाहूपुरी चौक या मार्गाची खड्ड्यांमुळे अक्षरश: चाळण झाली आहे. ठिकठिकाणी पडलेल्या खड्ड्यांमुळे या मार्गावरून ये-जा करताना वाहनधारकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. सातारा नगरपालिका व सार्वजनिक बांधकाम विभागाने शहरातील खड्डे मुरूम टाकून बुजवले. काही प्रमुख रस्त्यांचे डांबरीकरणही केले. मात्र, अंतर्गत रस्त्यांची डागडुजी न केल्याने वाहनधारकांची परवड सुरूच आहे.

वाहतुकीची कोंडी

सातारा : राजवाडा बसस्थानकासमोर असलेल्या तांदूळ आळीत वाहतुकीची सतत कोंडी होत आहे. अनेक खासगी वाहने, रिक्षा, मालवाहतूक करणारी वाहने याच मार्गावरुन ये-जा करतात. तर अनेक वाहनधारक रस्त्याकडेला तसेच दुकानांसमोर नो पार्किंगमध्ये वाहने लावत आहेत. अरुंद रस्ता असल्याने या मार्गावरून वाट काढताना वाहनधारकांसह पादचाऱ्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. पोलिसांकडून येथील वाहतुकीबाबत उपाययोजना करण्यात यावी, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.

पावसाची संततधार

सातारा : पश्चिमेकडील महाबळेश्वर, जावळी तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून पावसाची संततधार सुरू आहे. महाबळेश्वरसह परिसरात अधूनमधून हलक्या सरी बरसत आहेत. जावळी तालुक्यातही बुधवारी ठिकठिकाणी परतीच्या पावसाने हजेरी लावली. दुष्काळी भागात अद्याप मान्सून सक्रिय झाला नसून, शेतकऱ्यांच्या नजरा आभाळाकडे लागल्या आहेत.

ओढ्यांची स्वच्छता

सातारा : सातारा पालिकेकडून ओढे व नाल्यांच्या स्वच्छतेचे काम हाती घेण्यात आले आहे. पावसामुळे शहरातील सर्व ओढे कचऱ्याने तुडुंब भरले होते. प्रवाह बंद झाल्याने या ओढ्यांमधील व नाल्यांतील पाणी रस्त्यावरून वाहत होते. त्यामुळे नागरिकांसह पादचाऱ्यांना याचा नाहक त्रास सहन करावा लागत होता. पालिकेच्या आरोग्य विभागाने ओढे व नाले स्वच्छतेचे काम पुन्हा हाती घेतल्याने नागरिकांमधून समाधान व्यक्त होत आहे.