शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
2
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
3
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
4
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
5
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
6
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
7
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
8
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
9
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
10
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
ड्रग्जमाफियांनी पोखरली मुंबई विमानतळाची सुरक्षा; ड्रग्जचे पार्सल करायचे क्लिअर : कस्टम अधीक्षकासह दोन पोलिसांना अटक
13
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
14
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
15
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
16
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
17
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
18
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
19
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
20
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी

घाटातल्या वाटेवर झेपावतोय काळ!

By admin | Updated: June 24, 2015 00:45 IST

ठिकठिकाणी कोसळताहेत दरडी : मांढरदेवपाठोपाठ प्रतापगड मार्गावर संकट; नवख्या पर्यटकांची होतेय गोची

सातारा : सातारा जिल्ह्याला लाभलेले अफाट निसर्ग सौंदर्य, सह्याद्रीच्या डोंगररांगा अन् महाबळेश्वर, कास, बामणोली, तापोळा, नवजा येथे कोसळणारा धो-धो पाऊस. यामुळे येथील डोंगररागांतून पावलोपावली लहान-लहान धबधबे पाहण्यासाठी दररोज हजारो पर्यटकांची पावले महाबळेश्वर, प्रतापगडच्या दिशेने वळायला लागली आहे. मात्र, जिल्ह्यातील घाटातल्या वाटेवर दरडींच्या रुपाने काळ आ वासून बसला आहे. कधी आपल्यावर झेपावेल याचा नेम नाही.चोवीस तास कोसळणारा पाऊस सातारकरांसाठी नवा नाही. त्यामुळे मुसळधार पावसातील सातारकरांचा दिनक्रम कधी बदलला नाही. अंगात रेनकोट घातला की सातारकर रोजच्या कामासाठी सज्ज होतो. येथील निसर्गांच्या करामती जशा सर्वसामान्यांच्या अंगवणळी पडल्या आहेत. त्याचप्रमाणे जिल्हा प्रशासनासाठी या गोष्टी नवीन नाहीत. मात्र, दरवर्षी काहीना काही संकटे उभे राहतच आहेत. आपत्तीसमोर हात टेकण्याची वेळ प्रशासनावर येते अन् पुन्हा ‘कोण श्रेष्ठ?’ या वादावर निसर्ग शिक्कामोर्तब करत आहे.महाबळेश्वर तालुक्यात चार दिवसांपासून मुसळधार पाऊस पडत आहे. या पावसामुळे किल्ले प्रतापगडच्या तटबंदीखालील दरड रविवारी कोसळली होती. ज्या ठिकाणी वाहने उभी केली जातात, तेथेच हा अनर्थ घडला. त्यामुळे स्थानिकांबरोबरच पर्यटकांचीही झोप उडाली आहे. स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार प्रतापगडजवळ सार्वजनिक बांधकाम विभागाचे काम सुरू आहे. त्याचे खडी, वाळू तसेच तर साहित्य तेथेच पडून आहे. त्यामुळे किल्ल्यावरुन येणाऱ्या पावसाच्या पाण्याच्या प्रवाहाला जागा न मिळाल्याने हे पाणी तटबंदीखाली मुरले. त्यामुळे कड्याच्या एका बाजूकडील दगड हे मातीपासून सुटले गेले. दरड रस्त्यावर आली. प्रतापगडच्या कड्याचे दगड पावसामुळे कोसळल्याची माहिती व्हॉट्सअ‍ॅपच्या माध्यमातून सर्वत्र पसरत गेले. याची माहिती समजल्यानंतर जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष रवी साळुंखे, महाबळेश्वरचे उपसभापती संजय गायवाड यांनी सोमवारी घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली. (प्रतिनिधी) आडोशाला उभे राहणे ठरते धोक्याचेसाताराहून मोटारसायकलवरुन निघालेल्यांना मुसळधार पावसाचा सर्वात जास्त त्रास सहन करावा लागतो. सोबत लहान मुलं किंवा महिला असतील तर अनेक मोटारसायकलस्वार गाडी रस्त्याच्या कडेला उभी करुन झाडाखाली थांबत असतात. तर काहीजण डोंगराच्या कडेला पावसासाठी आडोसा शोधून थांबतात. नेमके हेच उभे राहणे जीवावर बेतू शकते. सोसाट्याच्या वाऱ्यामुळे मोटारसायकल, कारवर झाडे पडल्याचे अनेक घटना घडल्या आहेत. डोंगराच्या कडेला उभे राहिले तरी दरड अंगावर पडल्याचा धोका असतो. बोरणे घाटात एका ठिकाणी डोंगराच्या आतमध्ये बुयाराप्रमाणे खड्डा तयार झाला आहे. अनेक मोटारसायकलस्वार याठिकाणी जाऊन थांबत असतात, पण येथे जाण्याचा मोह आवरणेच योग्य ठरणार आहे. येथे आहे धोकापुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर खंबाटकी घाटात अनेक ठिकाणी धोका आहे.महाबळेश्वरला जाण्यासाठी जवळचा रस्ता म्हणून केळघर घाटाकडे पाहिले जाते. मेढ्यापासून काही अंतर गेल्यानंतर केळघर घाटात दरडी वारंवार कोसळत असतात.वाईपासून नऊ किलोमीटरवर असलेल्या पाचगणीला जाण्यासाठी पसरणी घाटातून जावे लागते. हा मार्गही धोकादायक असल्याचे आपण गेल्यावर्षी अनुभवले आहे. पाच ते सात फुटी महाकाय दगड रस्त्यावर पडल्याने गोंधळ उडाळा होता.पाटण तालुक्यात अनेक भाग दुर्गम आहे. येथील गावे आजही जीव मुठीत धरून जीवन जगत आहेत. पुणे जिल्ह्यात झालेल्या माळीणनंतरही येथे फारशा उपाययोजना झालेल्या नाहीत. हा डोंगरीभागही धोकादायक आहेत. त्यामुळे या मार्गावर माहिती घेऊन जावे.बोरणे घाटही वाजवतोय धोक्याची घंटासातारा जिल्ह्यातील अनेक ठिकाणी लहानमोठे धबधबे पावसाळ्यात वाहत असतात. त्यातील काही धबधबे जगाच्या नकाशावर पोहोचले आहेत. त्यातील एक म्हणजे ठोसेघरचा धबधबा. सर्वात उंचीवरुन कोसळत असलेला हा धबधबा पाहण्यासाठी राज्याच्या विविध भागातून पर्यटक पावसाळ्यात येत असतात. सातारा शहरापासून वीस ते पंचवीस किलोमीटरवर असलेल्या ठोसेघरच्या धबधब्याकडे जाण्यासाठी बोरणे घाटातून जावे लागते. या मार्गावरील बोरणे घाटातही दरडी कोसळण्याचे प्रकार दरवर्षी घडत असतात. या मार्गावर अरुंद रस्ते असल्याने डोंगराचा थोडा भाग कोसळला तरी रस्ता अडवला जातो. त्यामुळे तासन्तास वाहतूक विस्कळीत होत असते. अशावेळी स्थानिक ग्रामस्थ तत्काळ धावून येतात, हे विशेष. रस्त्यावरील काही मुरुम, माती तरी दूर करुन वाहतूक सुरळीत करण्यासाठी प्रयत्न करत असतात.