शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
2
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
3
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
4
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
5
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
6
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
7
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
8
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
9
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
10
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
11
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
12
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
13
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
14
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
15
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
16
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
17
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
18
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
19
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
20
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
Daily Top 2Weekly Top 5

महाबळेश्वरात पर्यटकांचा महापूर

By admin | Updated: May 30, 2016 01:00 IST

बाजारपेठेला जत्रेचे स्वरूप : नौकाविहारासाठी पर्यटकांच्या रांगा; वाहतूक कोंडीमुळे नाराजी

महाबळेश्वर : सर्वत्र उन्हाची तीव्रता वाढलेली असतानाच महाराष्ट्राचे नंदनवन म्हणून संबोधल्या जाणाऱ्या महाबळेश्वर येथे सायंकाळनंतर दाट धुके पसरत आहे. या वातावरणाचा मनमुराद आनंद लुटण्यासाठी महाबळेश्वर व पाचगणीत पर्यटकांचा महापूर उसळला असून, उन्हाळी सुटीचा हंगाम अखेरच्या टप्प्यात आल्याने बाजारपेठ व सर्वच प्रेक्षणीय स्थळे गर्दीने फुलून गेली आहेत. शनिवार-रविवारी तर महाबळेश्वर ते पाचगणी या मुख्य मार्गावर वाहनाच्या लांबच लांब रांगा लागल्याने मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडीची समस्या निर्माण झाली.महाराष्ट्रात सर्वत्र तापमानाचा पारा वाढत असताना महाबळेश्वरमध्ये मात्र पर्यटक ऐन उन्हाळ्यात दाट धुक्याचा अनुभव घेत आहेत. महाबळेश्वरमध्ये विविध राज्यांमधून विशेषत: गुजरात राज्यामधून येणाऱ्या पर्यटकांची संख्या अधिक असून, सध्या येथील प्रसिद्ध वेण्णा तलाव येथे नौकाविहारासाठी पर्यटकांची गर्दी ओसंडूनहॉटेल्स व बंगले हाउसफुल झाल्याने पर्यटकांना भिलार, वाई या ठिकाणी मुक्काम करावा लागत आहे. बाजारपेठेते खरेदी-विक्रीतून दररोज कोट्यवधींची उलाढाल होत आहे. (प्रतिनिधी)चार दिवसांत दहा लाखांचा भरणामहाबळेश्वरला येणारा प्रत्येक पर्यटक येथील वेण्णा तलावात नौकाविहाराचा आंनद लुटतो. नौकाविहारासाठी येथे पर्यटकांची रांगच रांग लागते. गेल्या चार दिवसांमध्ये वेण्णा तलाव येथे तब्बल १० लाख रुपये शुल्क जमा झाले आहे. नौकाविहार करण्यासाठी बोटींची संख्या कमी पडत आहे. याठिकाणी नगरपालिकेचे २६ कर्मचारी कार्यरत असून, ४० कर्मचारी टेंडरवर काम करीत आहे. येथे रोइंग बोटींची संख्या ४० तर ५० पॅडल बोटी असून, १० बोटी बंदावस्थेत आहेत.