शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
2
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
3
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
4
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
5
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
6
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
7
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
8
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
9
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
10
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
11
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
12
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
13
आशा भोसलेंचे कधीच न पाहिलेले दुर्मिळ फोटो; आर.डी. बर्मन ते लता दीदींसोबतचे खास क्षण, प्रत्येक फोटोमागे भन्नाट किस्सा
14
मुंबई इंडियन्सनं 'टाईमपास' केला; Hardik Pandya ला १२ लाखांचा फटका; Tim David लाही शिक्षा
15
Asha Bhosale: सूरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन, दिग्गज गायकांनी गाणं गाऊन दिली अखेरची स्वरांजली
16
होर्मुझ सामुद्रधुनीवर ब्रिटन-फ्रान्सचा 'बिग प्लॅन'; ४० देशांना एकत्र आणणार, ट्रम्प यांना डच्चू
17
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
18
Rohit Sharma Injury : मुंबई इंडियन्ससाठी वाजली धोक्याची घंटा; रोहित शर्मा पुढच्या सामन्याला मुकणार?
19
सिंगल चार्जवर ३२० KM रेंज...किंमत फक्त ₹१.२९ लाख! Ola ची नवीन EV स्कूटर लॉन्च
20
बालेन शाह यांनी PM मोदींना भेटण्यासाठी ठेवली अट; नेपाळ-भारत संबंध पुन्हा सुधारणार
Daily Top 2Weekly Top 5

थंडीच्या लाटेतही गर्दीचा महापूर!

By admin | Updated: December 23, 2014 23:42 IST

वाई फेस्टिव्हल : अनोख्या अदाकारिने रसिक चिंब---लोकमत माध्यम प्रायोजक

वाई : ‘वाई फेस्टिव्हल’ मध्ये गु्रप डान्स स्पर्धांचे आयोजन केले होते़ वाई शहराचा मानबिंदू असलेल्या वाई फेस्टिव्हलला सातारा, पुणे, कोल्हापूरमधून स्पर्धक संघ आले होते़ ‘थंडीच्या लाटेतही गर्दीचा महापूर,’ असे अनोखे दृष्य वाईकरांनी अनुभवले. एकाहून एक जबरदस्त नृत्याविष्कार पाहण्यासाठी वाईकरांनी प्रचंड गर्दीने महागणपती घाटाचा नजारा अवर्णनीय झाला होता.वाईच्या श्री डान्स अकॅडमीने मुरळी डान्सने रसिकांची मने जिंकली व प्रथम क्रमांक प्राप्त केला सातारच्या अजिंक्यतारा कला निकेतन, प्रेम डान्स गु्रप व अनंत इंग्लिश स्कूलच्या संघांनी जबरदस्त आविष्कार सादर केले़ एऩ डी़ एस. गु्रप , डी व्हायरस गु्रप या कलाकारांनी तर तरूणांना अक्षरश: वेड लावलं, कलाकारांचा जोश, उत्साह पाहून प्रेक्षकांची थंडी सुध्दा पळाली़ या स्पर्धेतील स्पर्धकांचे एकाचढ एक परफोरमन्स असल्याने परिक्षक म्हणून काम पाहताना निस्सार शेख व प्रमोद शिंदे यांना स्पर्धेचा निकाल देताना मोठया आव्हानाला सामोरे जावे लागले, शीतल देशपांडे-इनामदार यांनी सूत्रसंचालन केले़या स्पर्धेमध्ये उत्तेजनार्थ क्रमांक एस़ आऱ ग्रुप वाई व विघ्नहर्ता ग्रुप वाई यांनी मिळाले, तृतीय क्रमांक अनंत इंग्लिश स्कूल, सातारा, द्वितीय क्रमांक डी व्हायरस गु्रपने तर प्रथम क्रमांक आपल्या अभिनयाने सर्वांना अवाक करणा-या श्री डान्स अकॅडमी, वाई यांनी पटकावला़ विजयी संघाना फेस्टिव्हलचे अध्यक्ष सुनील शिंदे, रोटरी क्लबच्या अध्यक्षा सोनाली शिंदे, सुरेखा यादव, डॉ. जयश्री जगताप, मदनकुमार साळवेकर यांच्या हस्ते मानाचे सन्मानप्रत्र व ट्राफी दिल्या़ वाई फेस्टिव्हलचे निमंत्रक आनंद कोल्हापुरे यांनी स्पर्धेचे निकाल वाचन केले़ यावेळी अनेक वाईकरांनी स्पर्धकांना उस्फूर्तपणे बक्षिसे देऊन स्पर्धकांना प्रोत्साहित केले. कोल्हापूरच्या रूद्राक्ष अ‍ॅकडमीने सादर केलेल्या तांडव नृत्यास वाईकरांनी प्रचंड दाद दिली़ रूद्राक्ष अ‍ॅकडमीचे गणेश बिडकर व कलाकांचा आनंद कोल्हापूरे यांचे हस्ते सत्कार करण्यात आला. कार्यक्रमास राजेंद्र धुमाळ, आनंदराव लोळे, नगरसेविका अनुराधा कोल्हापूरे, नलिनी शिंदे, संजीवनी कद्दू, नीला कुलकर्णी, अरूण खरे, सचिन येवले, अलका मुरूमकर व मोठया संख्येने वाईकर नागरिक व ग्रामीण भागातून आलेले नागरिक उपस्थित होते़ (प्रतिनिधी)कलाविष्काराने वाईकर मंत्रमुग्धथंडीची लाट, कलाकारांचा अविष्कार, वाईकर रसिक नागरिकांचा उदंड प्रतिसाद याने गणपती घाट फूलून गेला़ वाई शहरातील तसेच परिसरातील नागरिकांची उपस्थितीलक्षणीय होती.