शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
2
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
3
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
4
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
5
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
6
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
7
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
8
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
9
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
10
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
11
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
12
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
13
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
14
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
15
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
16
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
17
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
18
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
19
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
20
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

पुसेसावळीतील तिघे पाच वर्षे निवडणूक लढविण्यास अपात्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2021 04:37 IST

औंध : खटाव तालुक्यात सगळीकडे निवडणुकीची धामधूम सुरू असताना पुसेसावळी येथे गेल्या पंचवार्षिक निवडणुकीत निवडणूक खर्च न दिल्याप्रकरणी माजी ...

औंध : खटाव तालुक्यात सगळीकडे निवडणुकीची धामधूम सुरू असताना पुसेसावळी येथे गेल्या पंचवार्षिक निवडणुकीत निवडणूक खर्च न दिल्याप्रकरणी माजी उपसरपंच सुरेश उर्फ सूर्यकांत शंकरराव कदम यांच्यासह दोघांना पुढील पाच वर्षांसाठी ग्रामपंचायत निवडणूक लढविण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी निर्बंध घातले आहेत, अशी माहिती अ‍ॅड. अभिजीत वीर यांनी दिली.

औंध येथे आयोजित पत्रकार परिषदेत अ‍ॅड. वीर म्हणाले, ‘गेल्या पंचवार्षिक निवडणुकीत सुरेश शंकरराव कदम यांच्यासह सचिन उत्तम कदम, मंगल अर्जुन कदम हे ग्रामपंचायत सदस्य म्हणून निवडून आले होते. सुरेश कदम हे उपसरपंच म्हणून कारभार पहात होते. मात्र, निवडणुकीनंतर निवडून आलेल्या सदस्याने निवडणुकीच्या खर्चाचा तपशिल विहीत नमुन्यात दिलेल्या वेळेत निवडणूक आयोगाला देणे बंधनकारक असते. मात्र, तिघांनी वेळेत खर्चाचा तपशिल निवडणूक आयोगाला दिला नाही. त्यामुळे त्यांच्या विरोधात श्रीकांत कदम आणि रवींद्र कदम यांनी अ‍ॅड. अभिजीत वीर यांच्यामार्फत जिल्हाधिकाऱ्यांकडे धाव घेऊन त्यांचे सदस्यत्व रद्द करण्याची मागणी केली होती. अ‍ॅड. वीर यांनी याबाबत केलेला युक्तिवाद जिल्हाधिकाऱ्यांनी मान्य करून तिघांना पाच वर्षे निवडणूक लढविण्यावरही निर्बंध घातले आहेत. ऐन निवडणुकीच्या रणधुमाळीत हा निकाल आल्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

यावेळी दादासो कदम, नितीन वीर उपस्थित होते.