शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

साडेतीन एकरावर ‘पुस्तकाचे गाव’

By admin | Updated: September 11, 2016 23:48 IST

देशातला पहिलाच प्रयोग भिलारमध्ये : वाचक चळवळ उभारण्यासाठी घरांमध्ये ग्रंथालय, समितीकडून जागेची पाहणी

पाचगणी : स्ट्रॉबेरीसाठी प्रसिद्ध असणारे भिलार हे गाव आता ‘पुस्तकाचे गाव’ यारूपाने वाचन संस्कृतीसाठी समृद्ध होणार आहे. देशातील हा पहिला प्रकल्प असल्याने महाबळेश्वर तालुक्याचा देशात नावलौकिक उंचावणार आहे. या प्रकल्पातून भिलारमध्ये वाचक चळवळ उभी राहून बौद्धिक विकासाबरोबरच आर्थिक उन्नतीही होणार आहे. तब्बल साडेतीन एकरावर ‘पुस्तकाचे गाव’ वसणार असून, यासाठी जागेचीही प्राथमिक निश्चिती करण्यात आली असून, समितीकडून गावातील ५० घरांची पाहणी करण्यात आली आहे. महाबळेश्वरजवळचे भिलार हे स्ट्रॉबेरीसाठी प्रसिद्ध असलेले गाव. या योजनेंतर्गत भिलारमधील नव्या भूखंडावर सुमारे साडेतीन एकरावर हे ‘पुस्तक गाव’ विकसित करण्याची योजना आहे. यामध्ये विविध प्रकारची साहित्य दालने असतील. त्यात शेती, स्पर्धा परीक्षा याचीही माहिती यातून मिळेल. अत्याधुनिक दृकश्राव्य दालनात ई-बुक्स व आॅडिओ बुक्सही उपलब्ध असतील. तसेच या योजनेत निवडलेल्या घरांमध्ये विविध प्रकारची हजार पुस्तके ठेवली जाणार असून, त्याद्वारे वाचनसंस्कृती जोपासण्याचा प्रयत्न केला आहे. त्या घरांमध्ये तसे पूरक वातावरण तयार केले जाणार आहे. इंग्लंडमधील ‘हे आॅन वे’ याच्या धर्तीवर असे गाव विकसित करण्याची ही योजना आहे. त्याबाबत नेमलेल्या उपसमितीकडून कामांचा आढावा घेतला जात आहे. शासनाच्या वतीने या योजनेसाठी भिलार या गावाची निवड केली आहे. देशातील हा पहिलाच प्रकल्प असल्याचे महाबळेश्वर तालुक्यासह जिल्ह्यासाठी ही गौरवास्पद बाब आहे. गावकऱ्यांनी या योजनेचे स्वागत केले असून, ही योजना यशस्वी करण्याचा निर्धारही केला आहे. शासनाने घेतलेल्या निर्णयामुळे भिलार हे गाव पर्यटनस्थळ व स्ट्रॉबेरीलॅण्डसह आता पुस्तकांचे गाव म्हणूनही ओळखले जाणार आहे. (वार्ताहर) प्रकल्पाची अशी आहेत वैशिष्ट्ये... साहित्यिकांच्या भेटीद्वारे रसिकांशी सातत्यपूर्ण संवाद लेखन, वाचन, संपादन, मुद्रितशोधन याबाबत प्रशिक्षण कार्यशाळा होतील शैक्षणिक सहलींसाठी अनुकूल वातावरण, साहित्यिकांच्या भेटी ठरवता येतील. गावात कायमस्वरूपी कविकट्टा व अभिवाचन कट्टा असेल गावातील सार्वजनिक जागांवर (उदा : ग्रामपंचायत, समाजमंदिर, शाळा येथे वाचनकट्टे तयार करण्यात येणार आहे.) घरांचे वाचनालय.. गावाचे ग्रंथालयात रूपांतर... शासनाने भिलार या गावाला या पायलट प्रोजेक्टसाठी निवडले असून, यासाठी ग्रंथालय, पुस्तके व यासाठी लागणाऱ्या सर्व सुविधांसाठी आर्र्थिक तरतूद केली आहे. या माध्यमातून भिलारकडे उच्च दर्जाचे क्षेत्र म्हणून पाहिले जाणार आहे. तर रोजगार व आर्थिक स्थैर्य ही लाभणार आहे. त्यामुळे भिलारमधील घरांचे छोट्या वाचनालयात तर गावाचे मोठ्या ग्रथांलयात रूपांतर होणार आहे. या प्रकल्पासाठी देशपातळीवरून भिलार या गावाची प्राधान्याने निवड केल्याने तो आमच्या गावाचा गौरव म्हणावा लागेल. आता ही जबाबदारी शासनाची नव्हे तर आम्हा गावकऱ्यांची आहे. या प्रकल्पास आम्ही सर्वतोपरी सहकार्य करू आणि हा प्रकल्प यशस्वी करून दाखवू. - बाळासाहेब भिलारे, जिल्हा परिषद सदस्य