शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
2
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
3
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
4
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
5
Latest Marathi News LIVE Updates: "गेल्या एक-दीड वर्षांपासून अशा...; ठाकरेंच्या खासदारांसोबतच्या बैठकीवर एकनाथ शिंदेंचे स्पष्टीकरण
6
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
7
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
8
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
9
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
10
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
11
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
12
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
13
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
14
Mukul Choudhary: मुकुल चौधरीच्या शेवटच्या षटकाराची का होतेय चर्चा? मालक संजीव गोएंका बघतच राहिले!
15
बीएसएनएल पुन्हा मार्केटमध्ये परतली...! Jio आणि Airtel ला टाकलं मागे; ठरली देशातील नंबर-१ कंपनी
16
“फडणवीसांकडून शिंदेंच्या पक्षाचे ऑपरेशन सुरू, आमचे सर्व खासदार एकत्र”; संजय राऊतांचा दावा
17
डोशाच्या पिठात विष कुणी कालवले? सख्ख्या पित्यावर पोलिसांचा संशय; घरामध्ये सापडल्या सल्फासच्या गोळ्या!
18
इस्रायलचा एक इशारा अन् पाकिस्तानचे संरक्षण मंत्री घाबरले! कॅन्सरची पोस्ट डिलीट केली
19
Stress Management: तणावमुक्त जगण्यासाठी थेरपीशिवाय मन प्रसन्न ठेवण्याचे काही सोपे आणि घरगुती उपाय
20
सोने, चांदी, फ्लॅट, गाड्या... सरकारी अधिकाऱ्याकडे कोट्यवधींचं घबाड; कमाईपेक्षा संपत्ती जास्त
Daily Top 2Weekly Top 5

महामार्गावर लुटणाऱ्या तिघांना ठोकल्या बेड्या

By admin | Updated: July 7, 2015 01:04 IST

पिस्तूल जप्त : ‘एलसीबी’ची कारवाई

सातारा : महामार्गावर गाड्या अडवून प्रवाशांची लूटमार करणाऱ्या तिघांना स्थानिक गुन्हे शाखेने रविवारी सकाळी बेड्या ठोकल्या. त्यांच्याकडून छऱ्याची पिस्तूल जप्त करण्यात आली आहे. लालासाहेब सतीश येडगे (वय २४, रा. धनगरवाडी, ता. सातारा), प्रतीक बळीराम बाबर (वय २३, रा. सम्राटनगर) आणि समीर अल्ताफ मुलाणी (वय २१, रा. वाठार किरोली, ता. कोरेगाव) अशी अटक करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत. स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक पद्माकर घनवट यांना या टोळीच्या हालचालींविषयी माहिती मिळाली होती. त्यानुसार महामार्गावर वाढे फाटा चौकात सापळा रचण्यात आला. या परिसरात गुप्त तळ देऊन तिघांना ताब्यात घेण्यात आले. अधिक चौकशी केली असता आपण वाटमारीचा उद्योग करीत असल्याचे तिघांनी कबूल केले. या संशयितांकडून छऱ्याच्या पिस्तुलीसह दोन मोबाइल हँडसेट, खटक्याचा चाकू, काळ्या रंगाची एक मोटारसायकल जप्त करण्यात आली आहे. या टोळीकडून आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता व्यक्त होत आहे. याप्रकरणी हवालदार विक्रम पिसाळ यांनी शाहूपुरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. निरीक्षक पद्माकर घनवट यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक विकास जाधव, सहायक फौजदार सुरेंद्र पानसांडे, तानाजी आवारे, हवालदार मोहन घोरपडे, उत्तम दबडे, रूपेश कारंडे, स्वप्नील शिंदे, विक्रम पिसाळ यांनी कारवाईत भाग घेतला. (प्रतिनिधी)