शहरं
Join us  
Trending Stories
1
गुरुवारी सायंकाळी तुर्की तर पहाटे हादरला चीन; पाकिस्ताननंतर त्याला साथ देणाऱ्या देशांना भूकंपाचे धक्के
2
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महायुती एकत्रच लढणार, काही ठिकाणी स्वबळही: CM फडणवीस
3
भारतात तुर्की अन् अझरबैजानवरील बहिष्काराला वेग; ३० टक्के भारतीय पर्यटकांनी बुकिंग रद्द केले
4
आजचे राशीभविष्य १६ मे २०२५ : नोकरी - व्यवसायात लाभ प्राप्ती, कोणाच्या राशीत काय...
5
Sankashti Chaturthi 2025: 'घालीन लोटांगण' हा आरतीचा एक भाग नसून ते आहे स्वतंत्र कवन, पण कोणाचे? वाचा!
6
राष्ट्रपतींनी सर्वोच्च न्यायालयाला विचारले १४ प्रश्न; राज्यघटनेतील १४३(१) अनुच्छेदाचा वापर
7
संकष्ट चतुर्थी व्रत: चंद्रोदयाची वेळ कधी? ‘असे’ करा गणेश पूजन; पाहा, शुभ मुहूर्त अन् मान्यता
8
वनजमीन वाटपप्रकरणी राणेंना धक्का; गृहनिर्माणास देणे बेकायदा, CJI गवई यांचा ऐतिहासिक निकाल
9
सहज रद्द होईल, असा एफआयआर पोलिसांनी तयार केला; विजय शाहप्रकरणी तपासावर लक्ष ठेवणार कोर्ट
10
शुक्रवारी संकष्ट चतुर्थी: बाप्पासह लक्ष्मी देवीचेही पूजन करा; सुख-समृद्धी, अपार कृपा मिळवा
11
पाकिस्तान उभा राहतो तिथूनच सुरू होते भिकाऱ्यांची रांग: राजनाथ सिंह, अण्वस्त्रांवर देखरेख ठेवा
12
खासगी शिक्षण संस्थांमध्ये आरक्षण मिळेपर्यंत लढणार; राहुल गांधींचे आश्वासन, केंद्रावर दबाव
13
जनतेची हरकत आहे का? पक्षांना नोंदणीआधी विचारावे लागणार; नोंदणी शुल्क १० हजारांवरून २० हजार
14
आई गयावया करत होती, "बेटा सरेंडर कर ले..." ऐकले नाही, सैन्याने ३ दहशतवाद्यांना टिपले!
15
५००० घोडेवाले, ६०० चालक बेरोजगार; पहलगाम दहशतवादी हल्ल्यामुळे रोडावले पर्यटक, काश्मिरी संकटात
16
डोनाल्ड ट्रम्पची इच्छा: भारतात बनू नये आयफोन; ...तर साडेचार लाख कोटींचे होईल नुकसान
17
महायुती, ठाकरे गट की स्वबळावर? राज ठाकरे म्हणाले, “योग्य वेळी योग्य निर्णय, राजकीय बोलू नका”
18
एकनाथ खडसे पुन्हा भाजपच्या वाटेवर? चंद्रशेखर बावनकुळेंची घेतली भेट, चर्चांना उधाण
19
मुंबई काँग्रेस अध्यक्षा खासदार वर्षा गायकवाड यांना दिल्लीचे अभय; खरगे यांच्याकडूनही पाठराखण
20
राष्ट्रवादी एकत्र? सुनील तटकरेंनी दिला फुलस्टॉप; कोणताही प्रस्ताव किंवा चर्चा नाही

तीन किलो गहूत महिनाभर पोट भरते का?शिधा पत्रिकाधारकांचा सवाल : अन्न सुरक्षा की उपासमारीची योजना

By admin | Updated: February 9, 2015 00:47 IST

शिधा पत्रिकाधारकांचा सवाल : अन्न सुरक्षा की उपासमारीची योजना

परळी : मोठा गाजावाजा करून आणलेली राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजना राबविताना माणसी दरमहा तीन किलो गहू व दोन किलो तांदूळ याप्रमाणे वाटप असल्याची ती राष्ट्रीय अन्न सुरक्षा आहे की, उपासमार योजना आहे? असा प्रश्न गरजूंना पडला आहे. एक व्यक्ती तीन किलो गव्हात महिनाभर जगणार कसा? असा सवाल उपस्थित करून किमान गहू कोठा वाढवून द्या, अशी मागणी होत आहे.याबाबत सर्वसामान्य नागरिक व शिधा पत्रिकाधारकांकडून मिळालेल्या माहितीनुसार, या योजनेत प्रत्येक गावातील ७४ टक्के शिधापत्रिकाधारकांचा समावेश करून तसा याद्या तयार करण्यात आल्या व पूर्वीच्या दारिद्र्यरेषेखालील शिधा पत्रिकाधारकांनाही अन्य शिधापत्रिकांप्रमाणेच खाद्य देण्याची पद्धत सुरू केली आहे. त्यानुसार ज्या दारिद्र्यरेषेखालील शिधापत्रिकाधारक कुटुंबात कार्डापाठीमागे पंधरा किंवा वीस किलो गहू तर आठ किंवा दहा किलो तांदूळ मिळत होता. त्यांना तो माणसी मिळू लागला.दारिद्र्यरेषेखाली एका शिधापत्रिकेत दोन किंवा तीनच व्यक्ती होत्या. त्यांना १५-२० किलो धान्य पुरेसे होते. आता मानसी तीन किलो म्हणजे त्या कुटुंबाला सहा ते नऊ किलो धान्य मिळते. म्हणजे त्या कुटुंबाला तेवढ्या धान्यात महिनाभर जगणे शक्य नाही. म्हणजेच कमी पडणारे धान्य बाजारभावाप्रमाणे घ्यावे लागणार आहे. काही शिधापत्रिकेत एकच व्यक्ती आहे. त्याचा तीन किलोत महिना कसा निघणार?१५-२० वर्षांपूर्वी शासनाने सर्वांना शिधापत्रिका दिल्या व नंतर वाटप बंद करून टाकले त्यापैकी चार-सहा वर्षांची मुले-मुलीआता किमान २५-२६ वर्षांची झाली. विवाह होऊन तो स्वतंत्र कुटुंबधारक झाला; पण नवीन शिधापत्रिका मिळाली नाही म्हणून एकाच कार्डात १५-२० व्यक्तींचा समावेश आहे. अशा शिधापत्रिकाधारकांनी नावे अन्न सुरक्षा यादीतच नाहीत. एका कुटुंबाची स्वतंत्र दोन किंवा तीन कुटुंबे झाली; पण स्वतंत्र कार्ड नाही. म्हणून त्याला अन्न सुरक्षेचा लाभ मिळणार नसेल, तर तो माझ्यावर अन्याय आहे,अ‍ेसे त्या कुटुंबाला वाटते ते खरे आहे. म्हणजेच त्यांच्यावरील अन्याय दूर करावा व त्यासाठी विभक्त कुटुंबाला स्तंत्र शिधा पत्रिका मिळालीच पाहिजे अशी कुटुंबीयांची मागणी आहे. (वार्ताहर)अशीही आहेत गावेसरकार म्हणते, किमान ७५ टक्के जनतेला या योजनेचा लाभ मिळेल. यात ७४ ते ७५ शिधापत्रिकाधारकांचा समावेश करण्यात आला आहे. परंतु सर्वच गावात हा उपाय योग्य नाही. अनेकठिकाणी मागास, कोरडवाहू, डोंगर पठारावरील गावे ९० टक्क्यांपेक्षाही जास्त कुटुंबे या योजनेला पात्र ठरणारी आहेत, मग त्याचे काय?