शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

ऊसदरासाठी तीन दिवसांचा ‘अल्टिमेटम’

By admin | Updated: November 12, 2014 22:55 IST

कऱ्हाडच्या परिषदेत इशारा : शनिवारपर्यंत तोडगा न निघाल्यास आंदोलन

कऱ्हाड : ‘उत्पादन खर्च पाहता तीन हजार पाचशे रुपयांच्या आत उसाचा भाव परवडत नाही. हा दर पदरात पाडून घेण्यासाठी दि. १५ तारखेपर्यंत कारखान्यांना ऊस घालू नका. तोपर्यंत सरकारने ऊसदराचा तोडगा काढला नाही, तर आंदोलनासाठी तयार राहा,’ अशी हाक शेतकरी संघटनेचे नेते रघुनाथदादा पाटील यांनी दिली. शेतकरी हुतात्मादिनी बुधवारी येथील भेदा चौकात आयोजित ऊस परिषदेत ते बोलत होते. यावेळी संघटनेचे मराठावाडा प्रमुख कालिदास आपटे, क्रांतिसिंह नाना पाटील ब्रिगेडचे शिवाजीराव नांदखिले, बिग्रेडिअर सुधीर सावंत, महिला आघाडी प्रमुख वंदनाताई पवार, युवा आघाडीचे शंकर गायकवाड, पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष बाळासाहेब पठारे, पुणे जिल्हाध्यक्ष पांडुरंग रायते, सांगली जिल्हाध्यक्ष हणमंत पाटील, सोलापूर जिल्हाध्यक्ष राजेंद्र भोसले, कोल्हापूर जिल्हाध्यक्ष पी. जी. पाटील, सातारा जिल्हाध्यक्ष विकास मुळीक, नगरचे जिल्हाध्यक्ष अशोकराव पठारे, परमेश्वर पिसुरे, ऊसतोडणी मुकादम विश्वनाथ पवार, ‘मनसे’चे सोलापूर जिल्हाध्यक्ष दिलीप धोत्रे, सातारा जिल्हाध्यक्ष रवींद्र शेलार, विकास पवार, दादा शिंंगण, शहराध्यक्ष सागर बर्गे यांची उपस्थिती होती.रघुनाथदादा पाटील म्हणाले, ‘शेतकऱ्यांनी आपला ऊस दि. १५ तारखेपर्यंत तोडू देऊ नये. तोपर्यंत सरकारने ऊसदराबाबत निर्णय घेतला नाही, तर आंदोलनाची दिशा ठरविली जाईल. आझाद मैदानावर जमायचे, साखर आयुक्त कार्यालयाला टाळे ठोकायचे की, विधानसभेला घेराव घालायचा याबाबतचा निर्णय १५ तारखेनंतर घेतला जाईल. शेतकऱ्यांनी या लढाईसाठी तयार राहावे. मनसे आणि शेतकरी व स्वातंत्र्यसैनिकांची ताकद काय असते, हे आम्ही सरकाराला दाखवून देऊ. मोदी सरकारने लोकसभा निवडणुकीपूर्वी प्रसिद्ध केलेल्या जाहीरनाम्यात शेतीमालाचा उत्पादन खर्च अधिक ५० टक्के नफा धरून शेतीमालाची आधारभूत किंंमत दिली जाईल, असे आश्वासन दिले होते; परंतु यावर्षीच्या खरीप व रब्बी हंगामाच्या मोदी सरकारने जाहीर केलेल्या आधारभूत किंमती पाहता शेतकऱ्यांचा विश्वासघात झाल्याचे दिसते.’ ब्रिगेडिअर सुधीर सावंत, रवींद्र शेलार, सयाजीराव देशमुख, कालिदास आपटे, दिलीप धोत्रे, प्रशांत गिड्डे, अ‍ॅड. विकास पवार, शंकरराव गायकवाड आदींची भाषणे झाली. (प्रतिनिधी)अन्यथा राडा करायला तयार!सरकारने ऊसदराबाबत समिती स्थापन केली आहे. समितीच्या बैठकीत उत्पादन खर्चावर आधारित दर देणार असला तरच संघटना उपस्थित राहील; अन्यथा राडा करायला आम्ही तयार आहोत, असा इशारा शिवाजीराव नांदखिले यांनी यावेळी बोलताना दिला. तडजोड करणाऱ्यांनाही बडवा !राजू शेट्टी यांनी तडजोडीचे राजकारण करून शेतकऱ्यांचे सर्वात मोठे नुकसान केले आहे. या आंदोलनात प्रसंगी त्यांनाही बडवून काढायची भूमिका शेतकऱ्यांनी ठेवावी. मोदी सरकार हे अतिरेकी सरकार आहे. परदेशी कांदा आयात करून या सरकारने शेतकऱ्यांना भिकेला लावण्याचे उद्योग सुरू केले आहेत, असे मत शिवाजीराव नांदखिले यांनी यावेळी व्यक्त केले.