शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
2
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
3
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
4
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
5
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
6
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
7
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
8
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
9
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
10
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
11
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
12
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
13
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
14
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
15
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
16
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
17
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
18
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
19
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
20
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
Daily Top 2Weekly Top 5

हजार महिलांनी घेतली स्वच्छतेची शपथ

By admin | Updated: March 12, 2016 00:02 IST

मलकापुरात मेळावा : घनकचरा व्यवस्थापनासाठी दोन हजार बकेटचे वाटप

मलकापूर : मलकापूर येथे आयोजित महिला मेळाव्यात स्वच्छ व सुंदर मलकापूरसाठी नगरपंचायतीच्या वतीने दोन हजार बकेटचे वाटप करण्यात आले. शहराच्या स्वच्छतेत महिलांचाच सहभाग महत्त्वाचा समजून नगरपंचायतीने स्वच्छतेचा विशेष उपक्रम हाती घेतला. महिला मेळाव्याचे औचित्य साधून यावेळी हजार महिलांनी स्वच्छतेची शपथ घेतली.येथील नगरपंचायतीने जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून महिला मेळाव्याचे आयोजन केले होते. या मेळाव्यासाठी कोल्हापूर येथील देवराई संस्थेच्या विश्वस्त अनुराधा सामंत, सत्वशीला चव्हाण, आहारतज्ज्ञ डॉ. रचना थोरात, जिल्हा परिषद सदस्या विद्याताई थोरवडे, सोनल भोसेकर, नगराध्यक्षा सुनंदा साठे, उपनगराध्यक्ष मनोहर शिंदे, शंकरराव चांदे, राजेंद्र यादव, नयना वेळापुरे यांच्यासह सर्व नगरसेवक उपस्थित होते. यावेळी सत्वशीला चव्हाण म्हणाल्या, ‘स्त्री ही शक्ती आहे. ती कोणत्याही अडचणीवर मात करू शकते. मनात आणले तर जग बदलू शकते. हे मलकापूरच्या महिलांनी करून दाखवले आहे. म्हणूनच मलकापूरचे नाव देशात उज्ज्वल झाले. यापुढेही महिलांनी आपल्या वर्तनातून मलकापूरची उंची वाढविण्यासाठी प्रयत्न करावा. मनावर व जिभेवर ताबा ठेवल्यास आरोग्य सुदृढ बनते.’ दरम्यान, यावेळी उपस्थित महिलांची आरोग्य तपासणी करण्यात आली. रक्तातील साखर, हिमोग्लोबिन, कॅन्सर यासारख्या रोगांबाबत प्राथमिक तपासण्या करण्यात आल्या. जयश्री देसाई यांनी सूत्रसंचालन केले. मनोहर शिंदे यांनी प्रास्ताविक केले. विद्याताई थोरवडे यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)‘लक्षाधीश कन्यारत्न’ पावतीचे वितरण..महिला दिनाचे औचित्य साधून नगरपंचायतीच्या वतीने प्रियदर्शनी कन्यारत्न योजनेअंतर्गत दोनशेपेक्षा जास्त लाभार्थिंना लक्षाधीश कन्या ठेव पावत्यांचा लाभ देण्यात आला. मान्यवरांच्या हस्ते या पावत्यांचे वितरण करण्यात आले.