शहरं
Join us  
Trending Stories
1
सीमावर्ती राज्यांमध्ये उद्या होणारा मॉक ड्रिल पुढे ढकलला; 'ऑपरेशन शील्ड'ची नवीन तारीख लवकरच जाहीर होणार
2
पुण्यात झाड कोसळून १ ठार; कोल्हापुरात जोरदार पावसामुळे ठिकठिकाणी भूस्खलनाच्या घटना
3
एक वर्षानंतर 'कोविड पॉझिटिव्हिटी दर जास्त, NB.1.8.1 व्हेरिएंट वाढले'; WHO ने दिला इशारा
4
शस्त्र परवान्यासाठी गोळीबाराचा बनाव; शिंदे गटाच्या युवासेना जिल्हाप्रमुख निलेश घारे यांना अटक
5
Vaishnavi Hagawane Death Case :'आमचा आमच्या मुलीवर पूर्ण विश्वास'; हगवणेंच्या वकिलांच्या युक्तीवादावर वैष्णवीच्या कुटुंबीयांची पहिली प्रतिक्रिया
6
हगवणे बंधूंनी नीलेश चव्हाणच्या मदतीने केला आई, बहिणीचा मोबाईल लंपास; पोलिसांची कोर्टात माहिती
7
Rohit Sharma Gautam Gambhir, IND vs ENG: खुद्द रोहित शर्माने इंग्लंड दौऱ्यासाठी 'या' व्यक्तीबद्दल गौतम गंभीरकडे केली विनंती
8
सेबीच्या माजी अध्यक्षा माधबी पुरी बुच यांची हिंडेनबर्ग रिपोर्टच्या आरोपातून सुटका! लोकपालांनी दिली क्लीनचिट
9
आमच्याकडे ५ कोटींच्या गाड्या; आम्ही ४० लाखांच्या फॉर्च्युनरसाठी कशाला छळ करु - हगवणेंचे वकील
10
पोलिसांकडून दोषारोपपत्र दाखल करण्यास झालेल्या विलंबाची चौकशी व्हावी; महिला आयोगाचे मुख्यमंत्र्यांना पत्र
11
पाकिस्तानातील हिंदू क्रिकेटपटूचे दोन्ही पाय कापून टाकले, कारण ऐकून तुम्हालाही वाटेल वाईट
12
टॅरिफ आवश्यक, अन्यथा भारत-पाकिस्तान युद्धविराम भंग होऊ शकतो; ट्रम्प सरकारचा अमेरिकन न्यायालयात दावा
13
वैष्णवीचे एका व्यक्तीसोबत नको ते चॅट सुरु होते, म्हणून तिने...' हगवणेंच्या वकिलांचा अजब युक्तिवाद
14
ड्रोन हल्ल्यांपासून वाचण्याचे मार्ग, ऑपरेशन शील्ड' अंतर्गत उद्या या ४ राज्यांमध्ये मॉक ड्रिल होणार
15
आकडे बोलतात! 'लोकमत डॉट कॉम'ला दणदणीत 'बहुमत'; वाचकांचा विश्वास जिंकला, मराठी न्यूज वेबसाईट्समध्ये 'नंबर पहिला'
16
माजी मंत्र्याचा सचिव, पाकिस्तानला पुरवत होता गुप्त माहिती! जैसलमेरमधून पकडला गेला आणखी एक गद्दार
17
इलॉन मस्क यांना नकार देणे 'अ‍ॅपल'ला महागात पडले; आयफोन वापरकर्त्यांना ही खास सेवा मिळत नाही
18
'मला रात्री घराबाहेर काढलं', परिणय फुकेंवर प्रिया फुकेंचे आरोप; सुषमा अंधारेंनी CM फडणवीसांना केली विनंती
19
बेडरूममध्ये बसली होती सवत, बघताच पहिल्या पत्नीला संताप झाला अनावर! पुढे पतीने जे केले, ते वाचून व्हाल हैराण
20
सर्वात मोठा खुलासा; पाकिस्तानी लष्करप्रमुख असीम मुनीर पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड...

सातारच्या रस्त्यावर धावली हजारो चाके

By admin | Updated: August 17, 2014 00:17 IST

लोकमत माध्यम प्रायोजक : स्वातंत्र्यदिनी दिला पर्यावरणाचा संदेश

सातारा : ‘या स्वातंत्र्यदिनी, भारताच्या पर्यावरणासाठी... हा संदेश जनमानसात रूजविण्यासाठी स्वातंत्र्यदिनी सातारा शहरातून काढण्यात आलेल्या सायकल रॅलीत चिमुकल्यासह आजोबांनीही हिरीरीने सहभाग घेतला. आठ ते बाहत्तर वयोगटातील सुमारे दीड हजार सायकलस्वारांनी यामध्ये सहभाग घेतला. या रॅलीचे माध्यम प्रायोजकत्व ‘लोकमत’ने स्वीकारले होते.तालीम संघाच्या मैदानावरून सकाळी साडेदहा वाजता सायकल रॅलीला प्रारंभ झाला. यावेळी अमर सायकल एजन्सीचे आशीष जेजुरीकर, नैतिक क्रिएशनच्या रश्मी साळवी, डॉ. जयदीप रेवले, नीलेश मोरे, हितेश सिंग, नयन गुळुंजकर यांच्या हस्ते उद्घाटन झाले. तालीम मैदान येथून मोती चौकमार्गे शेटे चौक, पोलीस मुख्यालय, पोवई नाका, रयत शिक्षण संस्था मार्गे पुन्हा तालीम संघ मैदान अशी सायकल रॅली काढण्यात आली. रॅलीमध्ये शालेय विद्यार्थ्यांबरोबरच ज्येष्ठांचा सहभाग लक्षणीय होता. रस्त्याच्या दुतर्फा नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. हात उंचावून ते प्रोत्साहन देत होते. अनेकांनी आपल्या मोबाईल कॅमेऱ्यात सायकल रॅलीचा उत्साह चित्रबद्ध करून ठेवला. लहानग्यांसह ज्येष्ठांनीही सातारकरांना पर्यावरण संवर्धनाचा संदेश दिला. अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने रॅली पार पडली. सायकल रॅलीत सहभागी झाल्यामुळे मजा आली, अशा प्रतिक्रिया मुलांनी व्यक्त केल्या, तर सायकल चालविण्यामुळे मन प्रसन्न झाले, तसेच आरोग्याबरोबरच एक सामाजिक संदेश देता आला, अशा भावना व्यक्त केल्या. (प्रतिनिधी)