शहरं
Join us  
Trending Stories
1
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
2
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
3
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
4
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
5
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
6
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
7
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
8
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
9
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
10
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
11
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
12
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
13
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
14
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
15
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
16
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
17
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
18
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
19
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
20
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
Daily Top 2Weekly Top 5

तलावात कागद टाकण्यासाठी हजारो हात एकवटले...

By admin | Updated: June 13, 2016 00:20 IST

खटाव तालुका : लोकसहभाग, वर्गणीतून औंधकर घडविणार जलक्रांती

औंध: औंधमध्ये जलक्रांती घडविण्यासाठी ग्रामस्थांनी लोकसहभाग, श्रमदान आणि लोकवर्गणीतून गावाच्या उत्तरेकडील ‘तेलकी’ तलावाच्या दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर सुरू केले आहे. १००० फूट लांबीच्या तलावाच्या भिंतीतील पाणी गळती रोखण्यासाठी लोकवर्गणीतून सुमारे ३ लाख रुपयांचा कागद टाकण्यात आला आहे. येथील ‘पाणी अडवा, पाणी जिरवा’ ही मोहीम मार्गदर्शक व दिशादर्शक ठरणार आहे. खटाव तालुक्यातील औंध भागातील जनतेला कधी नव्हे ते यंदा मोठ्या पाणीटंचाईला सामोरे जावे लागले. त्यामुळे पाण्यासाठी झालेली ससेहोलपट थांबविणे व औंधला पिण्याच्या व शेतीच्या पाण्यासाठी स्वयंपूर्ण बनविण्यासाठी औंधकर एकवटले आहेत. औंध गावच्या पिण्याच्या पाण्याचा तसेच काही अंशी सुमारे १७५ हेक्टर क्षेत्रातील शेती पाण्याचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी मागील चार महिन्यांपासून औंधकरांनी कंबर कसली आहे. पाण्याचा प्रत्येक थेंब न थेंब अडविण्याचे नियोजन करण्यात आले आहे. औंध गावासाठी वरदान ठरणाऱ्या तेलकी तलावाच्या बांध भिंतीची दुरुस्ती करण्यात आली आहे. ३३० मीटर लांब म्हणजेच १००० फुटापेक्षा अधिक लांबीच्या बांधभिंतीच्या आतील भागात सुमारे २५ ते ३० फूट खोल सीओटी चर खणण्यात आली आहे. बांधाचे मजबुतीकरण करण्यात आले आहे. या सीओटीच्या तळापासून पाण्याची पूर्णपणे गळती रोखण्यासाठी कागद टाकण्यात आला आहे. मागील दीड महिन्यापासून तेलकी तलावाच्या बांध भिंतीच्या दुरुस्तीचे काम सुरू आहे. सुमारे ३५० ग्रामस्थांनी तसेच शेतकरी, युवकांनी सहभाग नोंदवून दिवसभर तेलकी तलावाच्या बांध भिंतीवर कागद टाकण्यासाठी श्रमदानातून परिश्रम केले. या तेलकी तलावाच्या कामासाठी औंध संस्थानच्या अधिपती गायत्रीदेवी पंतप्रतिनिधी यांनी एक लाख रुपयांची वर्गणी दिली आहे. त्यांच्यासह औंध गावातील शेतकरी, शेतमजूर, व्यापारी, उद्योजक, छोटेमोठे व्यावसायिक, नोकरदार, ग्रामस्थांनी सुमारे २ लाख रुपयांचा निधी लोकवर्गणीतून याकामासाठी दिला आहे. मागील दोन महिन्यांपूर्वी झालेल्या गव्हाळा तलावामध्येही लोकवर्गणीतून ९३ हजार रुपयांचा कागद टाकून तलावाचे काम पूर्ण करण्यात आले होते. दत्तात्रय जगदाळे, उपसरपंच बापूसाहेब कुंभार, वसंत जानकर, प्रभाकर यादव, सी. व्ही. कुंभार, नंदकुमार इंगळे, प्रशांत कुंभार, हणमंत खैरमोडे, रवी थोरात, इलियाज पटवेकरी, रमेश जगदाळे, सचिन पवार, नितीन आंमले, सदाशिव इंगळे, शेतकरी, विविध मंडळाचे युवक, ग्रामस्थ, विविध संस्थांचे पदाधिकारी याकामासाठी परिश्रम घेत आहेत. दरम्यान, आ. प्रभाकर घार्गे यांनी तेलकी तलावाच्या कामाची पाहणी करून सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले. यावेळी हणमंत शिंदे, राजेंद्र्र माने, दीपक नलवडे, इलयाज पटवेकरी, प्रकाश महंत, वसंत माने उपस्थित होते. औंध येथील पाझर तलावांच्या कामासाठी जलसंपदा यांत्रिक विभागाचे कार्यकारी अभियंता पी. बी. भोसले, शाखा अभियंता ए. पी. जाधव कर्मचारी सहकार्य करीत आहेत. (वार्ताहर) आता ६ फूट पाणीपातळी वाढण्यास मदत...लोकवर्गणीतून सुमारे ३ लाख रुपयांचा निधी गोळा करून एक वेगळा आदर्श औंधकरांनी सर्वांसमोर ठेवला आहे. यातून २ पाझर तलावांची कामे पूर्ण होण्याच्या मार्गावर आहेत. त्याचबरोबर तेलकी तलावाचे खोलीकरण ही लोकसहभागातून केले जाणार आहे. दोन्ही तलावाच्या कामांबरोबर औंध गावातील ऐतिहासिक नागाळे तळ्यातील सुमारे २ एकर क्षेत्रातील अडीच हजार ट्रॉल्या गाळ ही मागील महिन्यात लोकसहभागातून काढण्यात आला आहे. त्याचा परिणाम ५ ते ६ फूट पाणीसाठा वाढणार आहे.