शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
2
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
3
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
4
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
5
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
6
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
7
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
8
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
9
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
10
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
11
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
12
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
13
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
14
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
15
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
16
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
17
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
18
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
19
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
20
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
Daily Top 2Weekly Top 5

चाळीस दिवसांत तेराशे कोरोनाबाधित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2021 04:36 IST

कऱ्हाड : तालुक्यात कोरोना संक्रमणाचा वेग मोठ्या प्रमाणावर वाढला असून आजअखेर कोरोनाबाधितांची संख्या अकरा हजारांवर पोहोचली आहे. फेब्रुवारी अखेरपासून ...

कऱ्हाड : तालुक्यात कोरोना संक्रमणाचा वेग मोठ्या प्रमाणावर वाढला असून आजअखेर कोरोनाबाधितांची संख्या अकरा हजारांवर पोहोचली आहे. फेब्रुवारी अखेरपासून संक्रमण वाढले आहे. गत चाळीस दिवसांत तालुक्यात १ हजार ३०० पेक्षा जास्त जणांना कोरोनाची बाधा झाली आहे.

दरम्यान, वाढत्या संक्रमणाबरोबरच आरोग्य विभागाने बाधितांच्या संपर्कातील व्यक्तींची चाचणी करण्यावरही भर दिला आहे. त्याद्वारे संक्रमण रोखण्याचा प्रयत्न होत असून लसीकरणालाही तालुक्यात गती आली आहे.

कऱ्हाड तालुक्यातील अनेक गावांमध्ये सध्या नव्याने कोरोनाचा शिरकाव झाला आहे. काही गावांमध्ये रुग्णांची साखळी निर्माण झाली आहे तर काही गावे पुन्हा कोरोनामुक्त होण्याच्या दिशेने वाटचाल करत आहेत. गत महिन्यात तालुक्यातील घारेवाडी गावात एकाचवेळी बाधितांची संख्या वाढली होती. मात्र, सध्या तेथील परिस्थिती आटोक्यात आहे. मात्र, इतर काही गावांमध्ये धास्ती वाढली आहे.

कोरेगावमध्ये अचानक रुग्णसंख्या वाढल्याने ग्रामस्थ धास्तावले आहेत. सध्या त्याठिकाणी १९ अ‍ॅक्टिव्ह रुग्ण आहेत. त्याबरोबरच हेळगाव-पाडळी, चचेगाव, मलकापूर, तारूख, कोळे, मसूर, सैदापूर, तळबीड, कार्वेनाका, शेणोली, वडगाव हवेली आणि सवादे या गावांचीही चिंता वाढली आहे. संबंधित गावांवर सध्या आरोग्य विभागाने लक्ष केंद्रित केले आहे. इतर गावांमध्ये रुग्णसंख्या वाढत असली तरी अ‍ॅक्टिव्ह रुग्णांची संख्या हाताच्या बोटावर मोजण्याइतपत आहे. सध्या आरोग्य विभागाकडून बाधितांच्या संपर्कातील व्यक्तींची तातडीने चाचणी केली जात आहे. त्याद्वारे संक्रमण रोखण्याचा प्रयत्न केला जात असून बाधितांच्या कुटुंबीयांना क्वारंटाईन केले जात आहे.

- चौकट

शनिवारी १६० पॉझिटीव्ह

कऱ्हाड शहर : ५४

हेळगाव : ६

इंदोली : २

काले : २०

कोळे : १९

मसूर : ३

सदाशिवगड : ८

सुपने : २

उंब्रज : ४

वडगाव ह. : २८

येवती : १०

(आरोग्य केंद्रनिहाय रुग्ण)

- चौकट

बाधितांचा लेखाजोखा

२८ फेब्रुवारीपर्यंत : ९९६८

१ ते ३१ मार्चदरम्यान : ५७३

१ ते ९ एप्रिलदरम्यान : ६२१

१० एप्रिल रोजी : १६०

आजअखेर एकूण : ११३२२

- चौकट

कोरोना अपडेट

एकूण बाधित : ११३२२

कोरोनामुक्त : १०२७४

दुर्दैवी मृत्यू : ३५५

उपचारात : ६९३

- चौकट

उपचारातील रुग्णांपैकी...

होम आयसोलेट : ३८३

रुग्णालयात : ३१०२

- चौकट

सरासरी

रिकव्हरी रेट : ९१.७० टक्के

पॉझिटिव्ह रेट : १४.४७ टक्के

- चौकट

कऱ्हाड तालुक्यात...

१८५ : बाधित गावे

८४ : कोरोनामुक्त गावे

१०१ : कंटेन्मेंटमध्ये गावे

- कोट

कोरोना संक्रमण रोखण्यासाठी आरोग्य विभागाकडून प्रयत्न सुरू आहेत. तालुक्याचा ‘रिकव्हरी रेट’ चांगला असून मृत्यूचे प्रमाण कमी आहे. नागरिकांनी नियमांचे तंतोतंत पालन करावे. लसीकरणासाठी तातडीने नावनोंदणी करावी. नियमांचे पालन आणि लसीकरण या माध्यमातूनच आपल्याला संक्रमण रोखता येऊ शकते.

- डॉ. संगीता देशमुख

तालुका वैद्यकीय अधिकारी