शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

ऐन दुष्काळात भागविली टंचाईग्रस्तांची तहान

By admin | Updated: April 1, 2016 01:51 IST

कवठे केंजळ पाणीयोजना : मकरंद पाटील यांच्या भूमिकेमुळे परिसराचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी

कवठे : वाई तालुक्याच्या पूर्व भागातील टंचाईग्रस्त भागातील भीषण दुष्काळी परिस्थितीतील जनतेला एकमेव आशादायी असलेल्या कवठे केंजळ उपसा जलसिंचन योजनेच्या किकलीकडे जात असलेल्या बंदिस्त पाईपलाईनची कवठे पर्यंतची पाईपलाईन पूर्ण करून कवठे येथील चंद्रभागा ओढ्यात पाणी सोडण्याची चाचणी आज पूर्ण झाल्याने ऐन दुष्काळात टंचाईग्रस्तांची तहान भागविली आहे.कवठे येथील बंधारा पूर्ण क्षमतेने भरून वाहू लागल्याने कवठे व बोपेगाव तसेच खानापूर या परीसरातील ओढे जलमय झाले. या पाईपलाईनच्या क्षेत्रात येणा-या सर्व ओढ्यांवर पाईपलाईनमधून व्हॉल्व काढून पाणी सोडण्यात आल्याने सर्व ओढ्यावरील बंधारे भरून वाहू लागले . केंजळ येथे जात असलेल्या पाईपलाईनच्या दुस-या फाट्याने केंजळ व सुरूर या ओढ्यात पाणी सोडण्यात आले. त्यामुळे वाई तालुक्याच्या पूर्व भागावर घोंगावत असलेल्या पाणी टंचाईचे संकट काही अंशी कमी होण्यास मदत झाली आहे. कवठे केंजळ योजनेच्या टाकीतून तीन पाईपलाईन जात असून त्यातील पहिला फाटा परखंदी येथे, दुसरा फाटा केंजळ येथे तर तिसरा फाटा कवठे येथून किकली या गावाकडे जाणारा आहे. यातील परखंदी व केंजळ या पाईपलाईनचे काम पूर्ण झाले आहे. परंतु महिनाभराचे कॅनालचे आवर्तन असतानासुद्धा केंजळ येथून सुरूर व कवठे गावापर्यंत येणारे पाणी भीषण दुष्काळी परिस्थितीमुळे कवठे येथे पोहोचू शकत नव्हते यावर पयार्यी मार्ग काढण्यासाठी आमदार मकरंद पाटील व जिल्हा बँकेचे संचालक नितीन पाटील यांनी कवठे येथून किकलीकडे जात असलेल्या पाईपलाईनचे काम पूर्णत्वास नेण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न केले व कवठे, बोपेगाव, खानापूर ग्रामस्थ यांनी अहोरात्र सहकार्य करीत कॅनालचे आवर्तन संपण्यापूर्वी काम पूर्ण केल्याने या पाणी वाहू शकले. यामुळे वाई तालुक्यातील पाण्याचा प्रश्न मार्गी लागला आहे. (प्रतिनिधी)लोकांचे सांघिक श्रमदानजिल्हा बँकेचे संचालक नितीन पाटील व आमदार मकरंद पाटील अहोरात्र सदर योजनेवर लक्ष ठेवून होते व वारंवार या योजनेच्या कामावर प्रत्यक्ष थांबून योजेनेच्या पूर्णत्वासाठी प्रयत्न करीत असल्याने परिसरातील सर्वच ग्रामस्थ योजनेच्या ठिकाणी रात्रंदिवस उपस्थित राहून यथाशक्ती काम करण्यासाठी स्वत:कडील यंत्रसामुग्रीसह विना मोबदला श्रमदान करून योजनेवरील इंजिनीअर व कामगारांना सहकार्य करीत होते. वीस वर्षांनी पूर्ण क्षमतेने वाहू लागला चंद्रभागा ओढाचंद्रभागा ओढ्याला पूर येवून गेला कि परिसरातील विहिरी तुडुंब भरणार व वर्षभर पाणी शेतीसाठी पुरणार हे येथील शेतक-यांनी मांडलेले गणित गेले वीस वर्षे हा ओढा पूर्ण क्षमतेने भरून न वाहिल्याने फोल ठरत होते. वीस वर्षाच्या कालावधीनंतर महापूर यावा या पद्धतीने सदर ओढा पहिल्यांदाच भरल्याचे पाहताना लोकांच्या डोळ्यात आनंदाश्रू दाटत होते