शहरं
Join us  
Trending Stories
1
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
2
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
3
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
4
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
5
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
6
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
7
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
8
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
9
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
10
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
11
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
12
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
13
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
14
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
15
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
16
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
17
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
18
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
19
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
20
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

आरोग्य केंद्र असून अडचण नसून खोळंबा!

By admin | Updated: October 24, 2015 23:54 IST

मार्डी येथील स्थिती : निवासी डॉक्टर नसल्याने रुग्णांना अनेक अडचणी

पळशी : माण तालुक्यातील मार्डी हे गाव नेहमीच गजबलेलं ठिकाण. परिसरातील लोक या ना त्या कारखाने व आठवडी बाजारासाठी तसेच इतर कामांसाठी येथे येतात. या बरोबरच हे ठिकाण मध्यवर्ती असल्याने येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार घेण्यासाठी रुग्णांची रीघ लागलेली दिसून येते. मात्र, हे प्राथमिक आरोग्य केंद्र हे रुग्णांसाठी ‘असून अडचण, नसून खोळंबा’ अशा अवस्थेत आहे. येथे कायमस्वरूपी वैद्यकीय अधिकारी उपलब्ध नसल्याने रुग्णांची गैरसोय होत आहे. तर येथे येणारे वैद्यकीय अधिकारी हे तात्पुरत्या कालावधीसाठी येत असून, कायमस्वरूपी वैद्यकीय अधिकारी नसल्याने प्राथमिक आरोग्य केंद्रास वाली कोण? अशी संतप्त प्रतिक्रिया रुग्णांमधून व्यक्त केली जात आहे. गेल्या चार महिन्यांपासून केंद्रात कायमस्वरूपी वैद्यकीय अधिकारी नाहीत. या काळात तात्पुरत्या नेमणुका होत असून, बऱ्याचवेळा वैद्यकीय अधिकारी उपलब्धच नसतात. त्यामुळे आज डॉक्टर भेटतील का? या विवंचनेतच रुग्णांना यावे लागत आहे. आतापर्यंत फलटणचे डॉ. मदने हे काम पाहत असून, त्यांचीही नियुक्ती तात्पुरतीच असल्याचे समजते. त्यामुळे या केंद्रात कायमस्वरूपी वैद्यकीय अधिकारी मिळणार का? अशी विचारणा होत आहे. मार्डीतील प्राथमिक आरोग्य केंद्र हे मार्डी, भालवडी, इंजबाव, खुंटबाव, मोही, राणंद, रांजणी, झाशी या गावांसाठी मध्यवर्ती ठिकाण आहे. गाव परिसरातील तसेच वाड्या-वस्त्यांवरील दररोज सरासरी ९० ते १०० बाह्यरुग्ण उपचार घेतात, तर आंतररुग्ण विभागात अनेक रुग्ण उपचार घेतात. बऱ्याचदा डॉक्टर नसल्याने गरोदर मातांचे खूप हाल होतात. डॉक्टरांअभावी रुग्णांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत आहे. नुकतेच हे केंद्र नवीन इमारतीत स्थलांतरित झाले आहे. निवासी वैद्यकीय अधिकारी उपलब्ध नसल्याने रुग्णांची गैरसोय होत आहे. कायमस्वरूपी निवासी वैद्यकीय अधिकारी असावेत, अशी मागणी परिसरातून होत आहे. (वार्ताहर)  

डॉक्टर आहेत का हो? आरोग्य केंद्रात आल्यानंतर डॉक्टर आहे का हो? अशी केवीलवाणी चौकशी रुग्ण करताना आढळतात. परिसरातील लोकांचा शेती हा प्रमुख व्यवसाय असून, रात्री-अपरात्री त्यांना शेतात जावे लागते. त्यावेळी काही दुखापत किंवा सर्पदंश यासारखे प्रकार घडल्यास रात्रीच्या वेळी जायचे कुठे? असा प्रश्न विचारला जात आहे.