शहरं
Join us  
Trending Stories
1
आषाढी एकादशी सोहळा; मुख्यमंत्र्यांची शासकीय महापूजा; नाशिक जिल्ह्याला सलग दुसऱ्या वर्षी मिळाला मान
2
विठ्ठल.. विठ्ठल.. जय हरी विठ्ठल; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडली विठ्ठल - रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा
3
हीच ती वेळ! अचूक टप्प्यावर 'करेक्ट कार्यक्रम' करत इंग्लंडचा 'बालेकिल्ला' जिंकण्याची संधी
4
दुधात थुंकून, तेच दूध ग्राहकांना द्यायचा; किळसवाणं कृत्य CCTV मध्ये कैद झाल्यानंतर शरीफला अटक!
5
'ज्ञानोबा माऊली तुकाराम'च्या गजरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अन् अमृता फडणवीस यांनी धरला फुगडीचा फेर 
6
गैर-मुस्लिमांचे धर्मांतरण कराणाऱ्या झांगूर बाबाला अटक, मुलींना प्रेमाच्या जाळ्यात अडकवायचा अन्...
7
12 देशांवर पडणार डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफचा हातोडा, स्वाक्षरीही झाली! म्हणाले...
8
गिल है की मानता नहीं...; 'द्विशतकी' खेळीनंतर 'शतकी' डाव, इंग्लंडवर आणखी एक 'घाव'
9
IND VS ENG : ऋषभ पंतनं केला षटकारांचा महाविक्रम, बेन स्टोक्स-मॅथ्यू हेडनलाही टाकलं मागे
10
"भाजपची दुसऱ्यांदा माघार, केंद्राकडे राज यांच्या प्रश्नांची उत्तरे नाहीत"; स्टॅलिन यांचा ठाकरेंना पाठिंबा
11
Unplayable Delivery! आकाश दीपसमोर जो रुट चारीमुंड्याचित! विजयातील मोठा अडथळा दूर (VIDEO)
12
VIDEO: प्रचंड गर्दी तरीही वारकऱ्यांनी दाखवली शिस्त! रुग्णवाहिकेसाठी क्षणात मोकळी करून दिली वाट
13
ENG vs IND :आता यजमान इंग्लंडची खैर नाही! टीम इंडियानं 'बॅझबॉल'वाल्यांसमोर सेट केलं मोठं टार्गेट
14
Neeraj Chopra Wins Gold NC Classic 2025: घरच्या मैदानातील पहिली स्पर्धा! 'गोल्ड'सह इथंही नीरज चोप्राची हवा
15
"त्यासाठी मनगटात जोर लागतो, नुसत्या तोंडाच्या वाफा..."; एकनाथ शिंदे यांचा राज-उद्धव मेळाव्याला टोला
16
Video: "डाव घोषित करतोस का? उद्या पाऊस पडणार आहे"; हॅरी ब्रुकच्या प्रश्नाला गिलचे मजेशीर उत्तर
17
"मुंबईला नवा चेहरा दिल्याने उद्धव ठाकरेंचा जळफळाट"; CM फडणवीस म्हणाले, "एकमेकांशी भांडूनच ते…"
18
"ठाकरे ब्रँड असता, तर बाळासाहेब असतानाच २८८ आमदार असते"; शिंदेंच्या आमदाराचे धक्कादायक विधान
19
सर्वात जलद सेंच्युरी! १४ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास; मोडला पाक फलंदाजाचा रेकॉर्ड
20
Photo: आजच दुकान गाठलं पाहिजे, बजाजची नवीन स्पोर्ट्स बाईक पाहून तुम्हीही हेच म्हणाल!

भविष्यात सोलर ऊर्जेशिवाय पर्याय नाही

By admin | Updated: May 20, 2016 00:03 IST

पृथ्वीराज चव्हाण : किसन वीर कारखान्यात फुड ग्रेड कार्बनडायआॅक्साईड प्रकल्पाच्या उद्घाटनप्रसंगी मत

भुईज : ‘येत्या तीन ते सात वर्षांत पेट्रोल आणि डिझेलवर चालणारी सर्व वाहने हद्दपार करावी लागणार असून, सोलर ऊर्जेवर चालणाऱ्या वाहनांशिवाय पर्याय राहणार नाही. कार्बनडायआॅक्साईडच्या भयानक जागतिक समस्येवर मात करण्यासाठी संपूर्ण जगात अब्जावधी रुपये खर्च केले जात असून, त्या संशोधनाचे फलित म्हणून हा बदल होणार आहे. अशा परिस्थितीत किसन वीर कारखान्याने कार्बनच्या जागतिक समस्येवर मात करत फुडग्रेड कार्बनडायआॅक्साईड प्रकल्प उभारून एक पाऊल पुढे टाकले आहे,’ असे प्रतिपादन माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी किसनवीरनगर (भुर्इंज) येथे केले. किसन वीर साखर कारखान्याने अल्पावधीत उभारलेल्या प्रतिदिन बारा टन क्षमतेच्या फुड ग्रेड कार्बनडायआॅक्साईड प्रकल्पाचे उद्घाटन आणिफॉस्पो कंपोस्ट खत विक्रीचा शुभारंभ पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते झाला. त्यावेळी ते बोलत होते. कारखान्याचे अध्यक्ष मदन भोसले, आमदार आनंदराव पाटील, कारखान्याचे उपाध्यक्ष गजानन बाबर, खंडाळा कारखान्याचे अध्यक्ष शंकराव गाढवे व संचालक मंडळाची प्रमुख उपस्थिती होती.मदन भोसले म्हणाले, ‘किसन वीर कारखान्याने विविध उपक्रम आणि पूरक उद्योग उभारताना नेहमीच पर्यावरणपूरक भूमिका घेतलेली आहे. फुडग्रेड कार्बनडायआॅक्साईड निर्मिती प्रकल्प हा त्याचाच भाग आहे. व्यवस्थापनाने दुष्काळ आणि पाणी टंचाईच्या पार्श्वभूमीवर कार्यक्षेत्रातील जलसंधारणाच्या कामासाठी पोकलेन मशीन दिलेले असून, हिवरे येथे या मशीनने झालेल्या कामामुळे साडेतीनशे हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येणार आहे. रासायनिक खतांचे प्रमाण कमी करण्यासाठीफॉस्पो कंपोस्ट खतनिर्मिती सुरू केलेली आहे. पाणी बचतीसाठी व्यवस्थापनाने सातत्याने प्रयत्न केलेले असून, कार्यक्षेत्रातील जास्तीत जास्त उसाचे क्षेत्र ठिबक सिंचनाखाली आणण्याचे उद्दिष्ट ठेवलेले आहे.’ बास्को इंडियाचे संचालक हिरेन शहा आणि डिस्टीलरी मॅनेजर एस. वाय. महिंद यांनी या प्रकल्पाची माहिती दिली. संचालक नंदकुमार निकम यांनी स्वागत केले. उपाध्यक्ष गजानन बाबर यांनी आभार मानले. कार्यक्रमास प्रभारी कार्यकारी संचालक एन. बी. पाटील, माजी संचालक नंदाभाऊ जाधव, केशवराव पाडळे, लालसिंग जमदाडे, शेखर जमदाडे, केतन भोसले, रोहित जगदाळे, विराज शिंदे, शंकरराव पवार, सुनील शिवथरे, हणमंत गायकवाड, प्रताप देशमुख, रमेश इथापे, नारायण भोसले, शंकरराव घाडगे, सुनील भोसले उपस्थित होते. (प्रतिनिधी)