शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलने सीझफायर तोडले, ट्रम्प प्रचंड नाराज; म्हणाले, तातडीने पायलटना माघारी बोलवा...
2
शक्तिपीठ महामार्गाला मंजुरी, २० हजार कोटींची तरतूद; GSTत बदल होणार, मंत्रिमंडळाचे मोठे निर्णय
3
तुर्कीला धडा शिकवण्याची तयारी सुरू?; सर्वात मोठ्या शत्रूच्या देशात पोहचले भारतीय हवाई दल प्रमुख
4
“झूठ बोले कौवा काटे”; राहुल गांधींच्या आरोपांना CM फडणवीसांचे उत्तर, सगळी आकेडवारीच दिली
5
Nuclear Weapon : कोणता देश अणुबॉम्ब बनवतोय अन् कोणता नाही? कसं आणि कोण ठेवतं लक्ष? जाणून घ्या...
6
“भास्कर जाधवांनी शिंदेंचे नेतृत्व स्वीकारले तर आनंद, मातोश्रीवरचा राग...”; कुणी दिला सल्ला?
7
दिलजीत दोसांझच्या सिनेमात पाकिस्तानी अभिनेत्रीची भूमिका, टीका झाल्यावर म्हणाला...
8
Rahul Gandhi :'निवडणुका नियमांनुसार होतात', राहुल गांधींच्या आरोपांवर निवडणूक आयोगाचे उत्तर; चर्चेसाठी बोलावले
9
अपघाताच्या एक दिवस आधी एअर इंडियाच्या सीईओंचा पगार ४६% वाढवला; आता किती पैसे मिळतात?
10
विहिरीत पडलेल्या वासराला वाचवण्यासाठी उतरलेले तरुण एका पाठोपाठ एक बेशुद्ध पडले, पाच जणांचा मृत्यू, संपूर्ण गावावर शोककळा  
11
प्रेक्षकांची प्रतीक्षा आज संपणार; काही तासात सुबोध भावे-तेजश्रीच्या मालिकेचा प्रोमो येणार; पाहा झलक
12
"हात लावशील तर ३५ तुकडे करेन"; मधुचंद्राच्या रात्रीच नवरीने दिली थेट धमकी! म्हणाली...
13
केदारनाथला देवाकडे काय मागितलं? चाहत्याचा प्रश्न, अमृताचं मन जिंकणारं उत्तर, म्हणाली- "खरं सांगू..."
14
अहमदाबाद विमान अपघात: ब्लॅक बॉक्सची माहिती कधीपर्यंत मिळेल? केंद्रीय मंत्री नायडू म्हणाले...
15
हिंदी मोफत शिकवत असतील तर त्यात गैर काय?; राष्ट्रवादी आमदार संग्राम जगतापांचा सवाल
16
ज्या कतारवर हल्ला केला, त्याच कतारच्या शेखने फोन केला...; अन् इराण सीझफायरसाठी तयारही झाला...
17
"अमेरिकेला गुडघे टेकायला लावले, इराण बनला मुस्लिम जगताचा नेता’’, महबूबा मुफ्ती यांनी केलं कौतुक  
18
यंदा जूनमध्येच 'अलमट्टी' ६१ टक्के भरले; कृष्णा नदीकाठच्या नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण
19
युद्धबंदीच्या बातमीनंतर सेन्सेक्स-निफ्टी वधारले, पण 'या' कंपन्यांचे शेअर्स धडाधड कोसळले; काय आहे कारण?
20
लग्नानंतर दरमहा १०,००० फिक्स! पोस्ट ऑफिसच्या 'या' योजनेत फक्त एकदाच करा गुंतवणूक!

संशयातून घडले ‘ते’ थरारनाट्य

By admin | Updated: March 12, 2015 00:02 IST

पती अत्यवस्थच : पत्नीवर आरे येथे अंत्यसंस्कार

परळी (सातारा) : पत्नीच्या आत्महत्येनंतर पतीने स्वत:चा गळा चिरून घेण्याची थरारक घटना चारित्र्याच्या संशयातून घडल्याचे पत्नीच्या भावाने दिलेल्या फिर्यादीमुळे पुढे आले आहे. सातारा तालुक्यातील आरे गावात घडलेल्या या घटनेतील पती अद्याप मृत्यूशी झुंज देत आहे, तर पत्नीवर बुधवारी सकाळी शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.आरे गावातील वातावरणात मंगळवारी सायंकाळपासून विचित्र सन्नाटा पसरला आहे. रोहिणी संजय महाडिक (वय ३०) हिने दुमजली घराच्या वरच्या मजल्यावर गळफास घेऊन आत्महत्या केली आणि त्यानंतर लगेच तिचा पती संजय वसंत महाडिक याने धारदार कटरने स्वत:चा गळा चिरून घेतला. सातारच्या खासगी रुग्णालयात संजयवर उपचार सुरू असून, तो अद्याप अत्यवस्थच आहे. दरम्यान, चारित्र्याच्या संशयावरून होणाऱ्या जाचहाटामुळेच रोहिणीने आत्महत्या केल्याचा आरोप तिच्या माहेरच्यांनी केला असून, तालुका पोलीस ठाण्यात तशी फिर्यादही नोंदविली आहे. मंगळवारी रात्री चिंचणेरहून माहेरची मंडळी संतप्त होऊन आरे गावात दाखल झाली6; मात्र तालुका पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त ठेवल्यामुळे या संतापाचा उद्रेक थोपविला गेला. बुधवारी सकाळी दहाच्या सुमारास रोहिणीवर उरमोडी नदीकाठी शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. ग्रामस्थांनाही या घटनेचा मोठा धक्का बसला असून, याविषयी भाष्य करणेही टाळले जात असल्याचे दिसून आले. दरम्यान, महाडिक दाम्पत्याच्या दोन लहानग्या मुली प्रचंड भेदरलेल्या अवस्थेत आहेत. (वार्ताहर)