शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
2
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
3
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
4
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
5
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
6
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
7
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
8
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
9
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
10
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
11
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
12
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
13
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
14
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
15
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
16
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
17
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
18
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
19
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
20
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
Daily Top 2Weekly Top 5

थकबाकीदार झाले ‘टेन्शन फ्री’

By admin | Updated: March 16, 2015 00:15 IST

लोकअदालतमध्ये तडजोड : तीस लाखांची घरपट्टी वसुली करून जावळी अव्वल

कुडाळ : ग्रामपंचायतीची घरपट्टी, पाणीपट्टी थकबाकीची वसुलीसाठी ग्रामविकास विभाग व न्यायालय यांच्या संयुक्त विद्यमान महालोक अदालतीचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये जावळीतील एकूण ३४५४ प्रकरणे मिटवून त्यामधून ३० लाख ३७ हजार ७११ रुपयांचा महसूल गोळा करीत जिल्ह्यात जावली तालुका अव्वल ठरला आहे.मेढा पंचायत समितीत थकबाकीदारांनी सकाळपासूनच गर्दी केली होती. या लोकअदालतमध्ये आपल्या हरकतीदेखील थकबाकीदारांनी मांडल्या. काही थकबाकीदारांनी एवढी घरपट्टी कशी आली, अशाही आपल्या तक्रारी मांडल्या. अशा थकबाकीदारांच्या प्रश्नांचे अधिकाऱ्यांनी निवारण केले. जावळीतून ७५ ग्रामपंचायतींतील ६४५० खातेदारांकडून ३० लाख ३७ हजार ७११ रुपये एवढी घरपट्टी, पाणीपट्टी वसूल करण्यात आली.जिल्ह्यात आयोजित केलेल्या या लोकअदालतीत जावळी तालुक्याने सर्वाधिक महसूल गोळा करीत अव्वल क्रमांक पटकाविला आहे. त्यासाठी सभापती गिरी, उपसभापती निर्मला कासुर्डे, सदस्य मोहनराव शिंदे, हणमंतराव पार्टे, सारिका सपकाळ, रूपाली वारागडे यांच्यासह पंचायत समिती अधिकारी, कर्मचारी, अंगणवाडी सेविका, ग्रामसेवक यांनी सहकार्य केले.या वसुलीमुळे ग्रामपंचायतीच्या महसुलात चांगलीच वाढ झाली आहे. तर अजूनही काही थकबाकीदार राहिलेले आहेत. त्यांच्यासाठी ११ एप्रिलला लोकअदालतीचे आयोजन केले असल्याचे गटविकास अधिकारी गजानन भोसले यांनी सांगितले. तर यावेळी थकबाकीदारांनी सहकार्य करावे, असे आवाहन देखील त्यांनी केले आहे. जप्तीची कारवाई टाळण्यासाठी नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे. (प्रतिनिधी)दहा वर्षात चांगला प्रतिसाद जावळी तालुक्यामध्ये घरपट्टी आणि पाणीपट्टी थकबाकीदारांना नोटीसा बजावून ग्रामपंचायतीचे कर्मचारी थकून गेले होते. अनेकदा थकबाकीदरांच्या घरावर जप्तीचीही कारवाई करण्यात आली. मात्र स्थानिक पातळीवर वाढत असलेल्या दबावामुळे कारवाईमध्ये हस्तक्षेपासारखे प्रकार घडत होते. मात्र या लोकअदालतीमुळे नागरिकांनी जुने हेवे दावे सोडून आपली थकबाकी जमा केली. गेल्या दहा वर्षात ग्रामपंचायतींना असा कधीच नागरिकांचा प्रतिसाद मिळाला नाही.