शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
2
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
3
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
4
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
5
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
6
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
7
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
8
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
9
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
10
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
11
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
12
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
13
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
14
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
15
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
16
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
17
ड्रग्जमाफियांनी पोखरली मुंबई विमानतळाची सुरक्षा; ड्रग्जचे पार्सल करायचे क्लिअर : कस्टम अधीक्षकासह दोन पोलिसांना अटक
18
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
19
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
20
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  

अवैध वाळू वाहतूक करणारे दहा ट्रक ताब्यात

By admin | Updated: July 7, 2015 22:17 IST

धडक कारवाई : महसूलचा वॉच ‘आॅन ड्युटी चोवीस तास’; पंचवीस ब्रास वाळू जप्त

कऱ्हाड : तालुक्यात बेकायदेशीरपणे काही ट्रक वाळू वाहतूक करत असल्याची माहिती मिळाल्यानंतर महसूल विभागाने सोमवारी रात्री १२ वाजण्याच्या सुमारास धडक कारवाई केली. कऱ्हाडसह मसूर, पाचवड फाटा, कार्वेगाव, गोळेश्वर, तासवडे बेलवडे, भेदा चौक आदी ठिकाणी अवैधरीत्या वाळू वाहतूक करत असलेल्या दहा ट्रकवर वॉच ठेवत त्यांच्यावर कारवाई करून ते ताब्यात घेतले. कारवाई अशा प्रकारे पुढेही सुरू ठेवणार असल्याचे महसूल अधिकाऱ्यांनी सांगितले.प्रांताधिकारी किशोर पवार यांच्या आदेशाने तहसीलदार राजेंद्र शेळके यांच्या नेतृत्वाखाली तालुक्यात आठ ठिकाणी सोमवारी रात्री १२ वाजण्याच्या सुमारास महसूल विभागाने आठ मंडल अधिकाऱ्यांसह वीस तलाठी यांच्या पथकाने दहा ट्रकवर कारवाई केली कारवाई करण्यात आलेले ट्रक तहसील कार्यालय परिसरात लावण्यात आले आहेत.कारवाई करण्यात आलेल्या ट्रकमध्ये बसवराज चंद्रप्पा माठगे यांचा ट्रक (केएच२२ बी ९०९५) हा पाचवड फाटा, निवास दत्तू मदने (ट्रक क्र.एमएच०९ बीए९००) हा कार्वेगाव, दीपक निवासराव जाधव (ट्रक क्र. एमएच१० एक्यू ५५५५) हा गोळेश्वर, मुजावर (एमएच५० १०२) हा मसूर येथून तर विष्णू भागवत जायभाय (ट्रक क्र. एमएच१४ इएच ६४६३), बंडोपंत रावू शिंदे (एमएच०९ क्यू६०६१), अंकुश शिवाजी पवार (एमएच५०-१३५७) हे ट्रक तासवडे बेलवडे या ठिकाणाहून तसेच सर्जेराव सदाशिव कुंभार (ट्रक क्र. एमएच०४ सीपी २०१), सचिन महादेव पाटील (एमएच१२ आरए६४१) हे दोन ट्रक भेदा चौक, तसेच रवींद्र शामराव भोसले (ट्रक क्र. एमएच५०-९९०) हा कार्वे चौकी अशा एकूण दहा ट्रक व त्यावरील चालकांवर कारवाई करत ते महसूल अधिकाऱ्यांनी रात्री ताब्यात घेतले.ताब्यात घेण्यात आलेल्या प्रत्येक ट्रकमध्ये अडीच ब्रास इतकी वाळू भरण्यात आली होती. तसेच एकूण दहा ट्रकमधून २५ ब्रास वाळू ट्रकसह ताब्यात घेण्यात आली असून ट्रकचालकांवर कारवाई करण्यासाठी तलाठी व मंडलाधिकाऱ्यांना महसूल विभागाकडून नोटिसाही देण्यात आल्या आहेत. (प्रतिनिधी)यांनी केली कारवाईपाचवडफाटा या ठिकाणी काले मंडल अधिकारी जे. जी. काळे यांच्यासह दोन तलाठीकार्वेगाव व गोळेश्वर या ठिकाणी मलकापूर मंडल अधिकारी नागेश निकम व शेणोली मंडल अधिकारी किशोर पाटील यांच्यासह सात तलाठीमसूर या ठिकाणी मसूर मंडल अधिकारी के. टी. वाघमारे यांच्यासह तीन तलाठीतासवडे बेलवडे या ठिकाणी उंब्रज मंडल अधिकारी एम. बी. चक्के व इंदोली मंडल अधिकारी यांच्यासह चार तलाठीभेदा चौक व कार्वे चौकी या ठिकाणी कऱ्हाड मंडल अधिकारी एच. एल. बेस्के व कोळे मंडल अधिकारी आर. आर ढाणे यांच्यासह चार तलाठी वाहनांतून २५ ब्रास वाळू जप्तमहसूल विभागाच्या पथकाने सोमवारी रात्रीच्या सुमारास केलेल्या कारवाईत दहा ट्रक जप्त केले आहेत. हे ट्रक तहसील कार्यालय परिसरात लावण्यात आले असून प्रत्येक ट्रकमध्ये अडीच ब्रास अशी एकूण २५ ब्रास वाळू महसूल विभागाने ताब्यात घेतली आहे.