शहरं
Join us  
Trending Stories
1
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
2
Latest Marathi News LIVE Updates: पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकातामध्ये ED ची मोठी कारवाई
3
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
4
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, जाणून घ्या एका रात्रीचं भाडं
5
Video - हृदयस्पर्शी! दोन्ही पाय गमावले पण जिद्द कायम; डान्सरने जिंकली कोट्यवधी लोकांची मनं
6
Travel : सारखा गोवाच कशाला हवा? भारतातील 'या' ५ बीच डेस्टिनेशन्सचा थाटच न्यारा; एकदा जाल तर प्रेमातच पडाल!
7
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
8
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
9
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
10
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
11
३० वर्षांनी त्रिएकादश राजयोग: ८ राशींना भरपूर लाभ, प्रमोशन-पगारवाढ संधी; लक्षणीय नफा-फायदा!
12
गोमांस, नमाजची सक्ती अन् मुलांचेही धर्मांतरण; आयटी कंपन्यांनमध्ये रॅकेट सक्रिय असल्याचा महाजनांचा दावा
13
Andhra Pradesh: धबधब्यावर मौजमजा करताना दुर्दैवी घटना, एकीला वाचवायला गेल्या आणि तिघीही बुडाल्या!
14
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
15
Abhinav Arora: कंटेंट क्रिएटर अभिनव अरोरावर जीवघेणा हल्ला; कारच्या काचा फोडल्या, वडील जखमी - Video
16
Food : आशियातील टॉप-५० रेस्टॉरंट्समध्ये भारताची दोन 'रत्न'; एक तर आपल्या मुंबईतच! बहुतेक मुंबईकरांनाही माहीत नसेल...
17
मीटिंगला बोलवायचे अन्...,आयटी कंपनीतील काळ्या कारनाम्याचा भांडाभोड, ४० सीसीटीव्ही तपासले!
18
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
19
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
20
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
Daily Top 2Weekly Top 5

दहा दिवसांची तान्हुली झुडपात सापडली

By admin | Updated: February 28, 2015 23:59 IST

कऱ्हाडातील घटना : पोलिसांनी घेतले ताब्यात, उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू

कऱ्हाड : वारुंजी फाटा येथील एका मंगल कार्यालयानजीक उपमार्गापासून काही अंतरावर झुडपात दहा दिवसांची तान्हुली बेवारस स्थितीत आढळून आली. शनिवारी पहाटे पाचच्या सुमारास घटनास्थळी पोहोचलेल्या पोलिसांनी त्या तान्हुलीला ताब्यात घेऊन उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वैशाली मंगल कार्यालयाच्या मागे झुडपांमधून एका लहान मुलाचा रडण्याचा आवाज सकाळी फिरणाऱ्या नागरिकांच्या कानी पडला. नागरिकांनी याबाबतची माहिती कऱ्हाड शहर पोलिसांत दिली. त्यानंतर पोलिसांनी त्याठिकाणची पाहणी केली असता झुडपात तान्हुली कापडात गुंडाळलेल्या स्थितीत आढळली. पोलिसांनी आपल्या जीपमधून तान्हुलीला उपजिल्हा रुग्णालयात आणले. डॉक्टरांनी तिच्यावर उपचार सुरू केले. तान्हुलीची प्रकृती चांगली असल्याचे रुग्णालयातून सांगण्यात आले. दरम्यान, काही दिवसांपूर्वीही मलकापूर-शास्त्रीनगर येथे महामार्गाच्या पादचारी पुलावर पंधरा दिवसांची तान्हुली बेवारस स्थितीत आढळली होती. तिच्या नातेवाइकांचा शोध अद्याप पोलिसांना लागलेला नाही. बेवारस सोडणाऱ्यांचा शोध सुरू तान्हुलीला निर्जनस्थळी आणि रात्रीच्या वेळेस बेवारस स्थितीत सोडणाऱ्यांचा सध्या पोलिसांकडून शोध घेतला जात आहे. त्यासाठी शनिवारी सकाळपासून वारुंजी फाटा परिसरातील रहिवाशांकडे पोलिसांनी कसून चौकशी सुरू केली आहे. त्यातून अद्याप तरी ठोस माहिती पोलिसांच्या हाती लागलेली नाही. (प्रतिनिधी)