शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिकेच्या अवास्तव मागण्या...!" इराणने अमेरिकेवर फोडलं शांतता चर्चा फिसकटण्याचं खापर; व्हॉन्स म्हणाले...
2
पुन्हा युद्ध भडकणार? अमेरिका-इराण यांच्यात तोडगा नाहीच; पुढे काय होणार? जगाचे लक्ष लागले!
3
Ashok Kharat : औषधे आणि केबिनमधील ठसे; भोंदू अशोक खरातच्या कार्यालयाची पथकाकडून पुन्हा झडती
4
काळाचा घाला! हायवेवर गाडी पंक्चर, टायर बदलताना ट्रकने चिरडलं; ५ जणांचा मृत्यू
5
२१ तास बैठक झाली, चर्चा फिस्कटली; जे.डी. व्हान्स अमेरिकेत परतणार, इराणने अटी अमान्य केल्या!
6
महिला मतदारांचा वाढता टक्का; यंदाच्या निकालात ठरणार ‘गेमचेंजर’, आसाम, केरळ आणि पुद्दुचेरीत यंदा 'या' मुद्द्यावर महिलांनी केले मतदान
7
भाजप सरकार बंगालमधील ‘सिंडिकेट राज’ संपवेल, अमित शाह यांचं आश्वासन
8
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
9
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
10
घुसखोरांना बंगाल सोडावेच लागेल, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा सक्त इशारा
11
‘....तोपर्यंत मुख्यमंत्रिपदाबाबत चर्चा नाही’, केरळबाबत काँग्रेसने घेतला मोठा निर्णय
12
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
13
कल्याणचे आमदार राजेश मोरे यांना न्यायालयाचा दिलासा, पराभूत प्रमोद पाटील यांची याचिका फेटाळली
14
ऊर्जेसाठी 'पॉवर'फुल भागीदारी, भारताचे परराष्ट्र सचिव मिस्री यांची अमेरिकेचे ऊर्जा सचिव ख्रिस राईट यांच्याशी चर्चा, अणुऊर्जेसह एलपीजी निर्यात आणि कोळसा वायूकरण यावर होणार काम
15
ऐतिहासिक क्षण : ४७ वर्षांनंतर अमेरिका-इराण ‘फेस-टू-फेस’, इस्लामिक क्रांतीनंतर पहिल्यांदाच दोन्ही देशांमध्ये संवादास सुरुवात
16
उत्तर प्रदेशात बोट दुर्घटनेतील मृतांची संख्या पोहोचली ११ वर
17
राज्यात महात्मा फुले कौशल्य विकास प्रशिक्षणाची एक हजार केंद्रे उभारणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
18
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची प्रकृती चिंताजनक, छातीच्या संसर्गाचा ताण येऊन हृदयविकाराचा झटका
19
आता उपराजधानीत इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक हेल्थ, १२० कोटींचा निधी मंजूर
20
स्कूल बसचे भाडे ठरवणार प्रादेशिक परिवहन प्राधिकरण; आता वार्षिक नव्हे, मासिक भाडे
Daily Top 2Weekly Top 5

ट्रकला पाठीमागून टेम्पोची धडक; चालक ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2021 04:47 IST

सातारा : पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर येथील बाॅम्बे रेस्टाॅरंट परिसरामध्ये ट्रकला पाठीमागून टेम्पोची धडक बसल्याने टेम्पो चालकाचा जागीच मृत्यू झाला. ...

सातारा : पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर येथील बाॅम्बे रेस्टाॅरंट परिसरामध्ये ट्रकला पाठीमागून टेम्पोची धडक बसल्याने टेम्पो चालकाचा जागीच मृत्यू झाला. हा अपघात मंगळवारी पहाटे पाचच्या सुमारास झाला.

अमित तानाजी सुर्वे (वय ३०, रा. डांगरेघर, पो. केळघर, ता. जावळी) असे अपघातात ठार झालेल्या टेम्पो चालकाचे नाव आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, आयशर टेम्पो (एमएच ४३ बीएक्स ७२७१)

पुण्याहून कोल्हापूरकडे निघाला होता. तर या टेम्पोच्या पुढे असणारा एक ट्रकही कोल्हापूरकडे निघाला होता. बाॅम्बे रेस्टाॅरंट परिसरात आल्यानंतर टेम्पो चालकाचे नियंत्रण सुटले. त्यामुळे टेम्पोची ट्रकला पाठीमागून भीषण धडक बसली. यात टेम्पो चालक अमित सुर्वे हा जागीच ठार झाला. हा अपघात इतका भीषण होता की, चालकाचा मृतदेह क्रेनच्या साह्याने बाहेर काढण्यात आला. टेम्पोमध्ये असलेला त्याचा सहकारी अमोल सुर्वे हासुद्धा जखमी झाला. या अपघातानंतर सातारा शहर पोलीस ठाण्याचे हवालदार संजू गुसिंगे यांनी घटनास्थळी धाव घेतली. जखमीला रुग्णालयात पाठविल्यानंतर त्यांनी महामार्गावरील वाहतूक पूर्ववत केली.