शहरं
Join us  
Trending Stories
1
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
2
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
3
“अजिबात सोपे नाही, पण काही होऊ दे, होर्मुझ जलमार्ग सुरू करणारच”; डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्धार
4
'त्याच्याशीच लग्न करेन' म्हणत तरुणी अडून बसली; पोलिसांनी बोलावले तरीही घरच्यांनी दिला नकार अन् घडला थरार
5
पाकिस्तानात इराण-अमेरिका चर्चा अयशस्वी ठरली तर काय असेल डोनाल्ड ट्रम्प यांना पुढचा प्लॅन?
6
"उस्मान तारिकच्या बॉलिंगवर खेळणार नाही" लाईव्ह सामन्यात डॅरिल मिशेलचा आक्षेप, असं का म्हणाला?
7
संतापजनक! मराठा साम्राज्याचा विस्तार दर्शविणारा नकाशा आठवीच्या पुस्तकातून NCERT ने वगळला
8
१२० किंवा १५० रुपयांऐवजी ₹१२३ किंवा ₹१४८ चं पट्रोल का भरताहेत लोक? राऊंड फिगरमुळे कमी मिळतं का Petrol?
9
वरुथिनी एकादशी २०२६: १० हजार वर्षांच्या तपश्चर्येचे फळ केवळ एका व्रतात! जाणून घ्या 'वरुथिनी एकादशी'चे पूजा विधी
10
Tripti Kalhans : डिप्रेशनवर मात अन् पाचव्या प्रयत्नात बाजी! सलग ४ वेळा नापास झालेली तृप्ती बनली IAS अधिकारी
11
वयाच्या ४२ व्या प्रेग्नंट, तरी जिममध्ये हेवी वर्कआउट करतेय अभिनेत्री; नेटकऱ्यांनी दिला सल्ला
12
गोल्ड ETF मधील गुंतवणूक ५७% नं घसरली, चांदीत सलग दुसऱ्या महिन्यात 'एक्झिट'; आता गुंतवणूकदारांनी काय करावं?
13
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
14
IPL 2026: वैभव सूर्यवंशीच्या बॅटिंगवर किंग कोहली फिदा; सामन्यानंतर दिलं खास गिफ्ट!
15
Tarot Card: तुमचा हा आठवडा भाग्याचा की संघर्षाचा? टॅरो कार्ड्सनुसार वाचा १२ ते १८ एप्रिलचे साप्ताहिक भविष्य!
16
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
17
२००० कोटींचा महाघोटाळा! ६.३ कोटी कॅश, ७.५ कोटींचे दागिने; १९ हजार लोकांना गंडा, ED ची मोठी कारवाई
18
मंत्री झिरवाळ 'व्हिडिओ' प्रकरणाला नवं वळण; FIR रद्द करण्यासाठी आरोपीची कोर्टात धाव; आरोपांनी खळबळ
19
लग्नाची मागणी फेटाळली, रागीट युवकाने युवतीला टोचलं HIV संक्रमित इंजेक्शन, मग १ महिन्यांनी...
20
IPL 2026: वैभव सूर्यवंशी नावाचं वादळ थांबेना! मुंबई, सीएसकेनंतर विराटच्या आरसीबीलाही दाखवला हिसका
Daily Top 2Weekly Top 5

पाईपलाईनसाठी टेलिफोन खांब ढापला!

By admin | Updated: October 6, 2015 23:46 IST

चोरीचा ‘पोल’खोल : पळशीमध्ये जलवाहिनीसाठी डांबरी रस्त्याखाली गाडला पाईप

सातारारोड : चोरी कशा कशाची होईल याचा नेम नाही. चोरट्याचा डोळा भलत्याच वस्तूवर असू शकतो. घर, दुकान, बँकेत चोरी झाल्याचे आजवर ऐकले असेल पण कोरेगाव तालुक्यातील पळशीमधील एकाचा चक्क शासकीय वस्तूंवरच डोळा आहे. त्याने रस्त्याकडेला पडलेला टेलिफोनचा खांबच ढापला आणि चक्क जलवाहिनीसाठी तो डांबरी रस्त्याखाली गाडला. या प्रकारामुळे कोरेगाव तालुक्यात खळबळ निर्माण झाली आहे.याबाबत माहिती अशी की, कोरेगाव तालुक्यातील पळशी स्टेशन येथे भारत दूरसंचार निगमचा खांब उभा होता. तो खांब वाहतुकीस अडथळा होत असल्याने पळशी ग्रामपंचायतीने तो खांब काढून टाकला होता. रस्त्याच्या कडेला पडलेला खांबावरच एका ग्रामस्थाने डोळा ठेवला होता. गावातील स्वत:च्या घरात जलवाहिनी घेत असतानाच पवार या गृहस्थाने तो खांब रातोरात लांबविला असल्याचा आरोप ग्रामस्थांमधून केला जात आहे. जलवाहिनी घरात नेण्यासाठी रस्ता ओलांडण्यासाठी या महाशयाने तो खांब रस्त्याखाली गाडला. यासंदर्भात ग्रामस्थांनी भारत दूरसंचार निगमच्या कोरेगाव कार्यालयात ३ सप्टेंबर, २०१५ रोजी अर्ज केला होता. मात्र, अद्यापही कारवाई झालेली नसल्याचा आरोप ग्रामस्थांमधून केला जात आहे. या संदर्भात विविध पातळीवर तक्रारी अर्जही केले आहेत.सरकारी वस्तू म्हणजे सार्वजनिक मालमत्ता. तिचा योग्य कारणासाठी वापर व्हावा, असे प्रत्येकालाच वाटत असते. भलेही या वस्तू रस्त्यावर असतील म्हणून ती स्वार्थासाठी घेऊन जाणे योग्य नाही. याची जाण असलेल्या काही ग्रामस्थांनी शासकीय मालमत्तेच्या चोरीसंदर्भात शासकीय पातळीवर लढा सुरू केला आहे. याप्रकरणी शासकीय यंत्रणांनी वेळीच दखल घेऊन संबंधित व्यक्तीवर कारवाई करावी, अशी मागणी केली जात आहे. (प्रतिनिधी)लोकशाही दिनातही संबंधिताविरुध्द तक्रारसर्वसामान्यांवर होत असलेल्या अन्यायाला शासकीय यंत्रणांकडून दखल घेतली जात नसल्यास त्याला वाचा फोडण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयातर्फे लोकशाही दिन आयोजित केला जातो. या लोकशाही दिनातही संबंधित व्यक्तीच्या कारनाम्याची तक्रार गेलेली आहे. येथील राहुल शिंदे यांना समाजकल्याण यशवंत घरकुल योजनेतून घरकुल मंजूर झाले आहे. या घरकुलाचे काम पूर्ण झाले असून त्याची नोंद करण्यासाठी पळशी ग्रामपंचायतीकडे अर्ज केला होता. मात्र, वेळोवेळी खोटा तक्रार अर्ज करुन घरकुलाची नोंद करण्यात अडथळा आणला जात आहे. त्यामुळे या घरकुलाची नोंद केली जात नाही. संबंधित पवार याच्यावर कारवाई करण्याचा अर्ज शिंदे यांनी पोलीस अधीक्षकांकडेही केला आहे.या तथाकथित सामाजिक कार्यकर्त्याला खोट्या तक्रारी करण्याची सवय आहे. यामुळे ते ग्रामपंचायतीकडे माझ्याविरोधात तक्रारी करत आहेत. यासंदर्भात पोलीस अधीक्षकांनी दखल घेऊन कारवाई करावी. - राहुल शिंदे, ग्रामस्थ पळशी