शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
2
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
3
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
4
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
5
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
6
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
7
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
8
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
9
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
10
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
11
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
12
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
13
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
14
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
15
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
16
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
17
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
18
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
19
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
20
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
Daily Top 2Weekly Top 5

बर्फासोबत अश्रूही गोठले...!

By admin | Updated: February 12, 2016 23:39 IST

मस्करवाडी सुन्न : शहीद सूर्यवंशींच्या पार्थिवाची अजून प्रतीक्षा

म्हसवड : सियाचीनमधील हिमस्खलनात मस्करवाडीचे जवान सुनील सूर्यवंशी शहीद झाल्यामुळे दुखवटा म्हणून कुकुडवाडचा शुक्रवारचा आठवडाबाजार भरला नाही. मस्करवाडीत नेते, पदाधिकारी, अधिकारी आणि ग्रामस्थांची वर्दळ वाढली असून, खराब हवामानामुळे शहीद सुनील यांचे पार्थिव सियाचीनमधून आणण्यात लष्कराला अद्याप यश आले नसल्याने ग्रामस्थांसह संपूर्ण जिल्हा अजूनही प्रतीक्षेतच आहे. दरम्यान, बर्फासोबत वाट पाहून अश्रूही गोठले आहेत. कुकुडवाडचा आठवडाबाजार शुक्रवारी असतो. मात्र, सुनील सूर्यवंशी शहीद झाल्यामुळे दुखवटा म्हणून बाजार भरलाच नाही. पार्थिवाची मिरवणूक कुकुडवाड-मस्करवाडी मार्गावरून काढण्यात येणार असून, या रस्त्याच्या रुंदीकरण व सपाटीकरणाचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. अंत्यसंस्काराच्या ठिकाणी सर्व तयारी पूर्ण झाली आहे. मात्र, पार्थिव आणण्यासाठी लडाखमधून रवाना झालेले हेलिकॉप्टर शुक्रवारीही सियाचीनमधील खराब हवामानामुळे परत आल्यामुळे प्रतीक्षा लांबली आहे. शहीद सूर्यवंशी यांच्या पार्थिवाची प्रतीक्षा जिल्हा गेल्या चार दिवसांपासून करीत आहे. वीर जवानाचे अखेरचे दर्शन घेण्यासाठी बाहेरगावी आणि परराज्यांत असणारे कुकुडवाड ग्रामस्थ गावी आले आहेत. शुक्रवारी दुपारी माण तालुक्याच्या अधिकाऱ्यांनी कुकुडवाडी ग्रामपंचायत कार्यालयात शहीद सूर्यवंशी यांच्या अंत्यसंस्कारांचे नियोजन करण्यासाठी बैठक घेतली. पार्थिवाची मिरवणूक कोणत्या मार्गाने न्यायची, अंत्यदर्शन सुलभ कसे होईल, येणाऱ्या वाहनांसाठी पार्किंग कोठे करायचे, वाहतूक कोंडी होऊ नये म्हणून नियोजन कसे करायचे यावर चर्चा झाली. यावेळी प्रांताधिकारी मिनाज मुल्ला, तहसीलदार सुरेखा माने, बांधकाम विभागाचे शिंगटे, सहायक पोलीस निरीक्षक सुनील चव्हाण, पोलीस उपनिरीक्षक शाहूराज दळवी, माजी सरपंच संजय जाधव, उपसरपंच तानाजी काटकर, सागर तुपे, ग्रामस्थ उपस्थित होते. (प्रतिनिधी)नेत्यांनी घेतली कुटुंबीयांची भेटमाण-खटावचे आमदार जयकुमार गोरे यांनी सूर्यवंशी कुटुंबीयांची भेट घेऊन सांत्वन केले. तसेच अंत्यसंस्काराच्या ठिकाणाची पाहणी करून कुकुडवाड-मस्करवाडी रस्त्याच्या कामालाही भेट दिली.विधानपरिषद सदस्य व राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांनी कुटुंबीयांची भेट घेतली आणि सुनील सूर्यवंशी यांची एक वर्षाची मुलगी तनया हिच्या नावाची दीड लाख रुपयांची मुदत ठेवपावती करणार असल्याचे सांगितले.माडी (ता. माण) ही शहीद सुनील सूर्यवंशी यांची सासुरवाडी आहे. दि. ११ रोजी तेथील बाजारपेठ बंद ठेवून शहीद सूर्यवंशी यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.