शहरं
Join us  
Trending Stories
1
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
2
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
3
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
4
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
5
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
6
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
7
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
8
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
9
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
10
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
11
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
12
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
13
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
14
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
15
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
16
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
17
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
18
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
19
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
20
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
Daily Top 2Weekly Top 5

पन्नास गावांसाठी हजार जणांचे पथक सज्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 15, 2021 04:33 IST

खंडाळा : खंडाळा तालुक्यातील ५० ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी शुक्रवार, १५ जानेवारी रोजी मतदान पार पडणार आहे. त्यासाठी तालुका प्रशासनाची ...

खंडाळा : खंडाळा तालुक्यातील ५० ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी शुक्रवार, १५ जानेवारी रोजी मतदान पार पडणार आहे. त्यासाठी तालुका प्रशासनाची तयारी पूर्ण झाली आहे. मतदान केंद्रावरील अधिकारी, कर्मचारी अशा १०२३ जणांची टीम सज्ज आहे. कोरोनाकाळात काळजी घेऊन मतदान शांततेत पार पाडावे, असे आवाहन तहसीलदार दशरथ काळे यांनी केले आहे.

खंडाळा तालुक्‍यातील ५० ग्रामपंचायतींच्या निवडणुका होत आहेत. सात ग्रामपंचायत बिनविरोध झाल्या आहेत. तर यामध्ये ४६१ जागांपैकी ३२० जागांवर मतदान होणार आहे. ६९८ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. यासाठीची संपूर्ण यंत्रणा तालुक्यातील १३८ मतदान केंद्रांवर रवाना झाले आहेत. या प्रक्रियेसाठी उपजिल्हाधिकारी, तहसीलदार, नायब तहसीलदार, सात झोनल अधिकारी, २१ निवडणूक निर्णय अधिकारी व ४२ सहायक अधिकारी व मतदान अधिकारी कामकाज पाहत आहेत.

दरम्यान, गुरुवारी मतदान केंद्रावर साहित्य पाठविण्यासाठी पंचायत समिती प्रांगणात मंडप उभारून गावनिहाय टेबल लावण्यात आले होते. या टेबलवर मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांना मतदान यंत्रासह मतदानाचे सर्व साहित्य वाटप करण्यात आले. शुक्रवारी सायंकाळी मतदानप्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर त्यांच्या टेबलावर मतदान यंत्र साहित्य जमा करायचे आहे, अशी व्यवस्था तहसील प्रशासनाकडून करण्यात आली आहे.

मतदानप्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी पोलीस प्रशासनाकडून मतदानाच्या दिवशी चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. शुक्रवारी मतदान झाल्यानंतर १८ जानेवारी रोजी मतमोजणी करण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर खंडाळा शिरवळ व लोणंद पोलीस ठाण्यातील सर्व अधिकारी, १७० पोलीस कर्मचारी व होमगार्डची नियुक्ती करण्यात आली. तर मतदान यंत्रणा ठेवण्यासाठी स्ट्राँग रुमसाठी एसआरपीएफचे जवान व पोलीस फौजफाटा तैनात राहणार आहे.