शहरं
Join us  
Trending Stories
1
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
2
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
3
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
4
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
5
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
6
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
7
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
8
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
9
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
10
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
11
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
12
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
13
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
14
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
15
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
16
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
17
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
18
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
19
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
20
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षकांचे राजकारण ग्रामसभेत गाजले!

By admin | Updated: August 24, 2014 22:40 IST

सदस्य आक्रमक : जंगलवाडी शाळेबाबत कारवाईची मागणी

चाफळ : विभागातील जंगलवाडी, ता. पाटण येथील प्राथमिक शाळेतील शिक्षक ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांसह ग्रामस्थांना विश्वासात न घेता कारभार करत आहेत. शालेय कार्यक्रमामध्ये राजकारण आणून गावात राजकीय तेढ निर्माण करत आहेत. शिक्षकांची चौकशी करून त्यांची तातडीने बदली करण्याची मागणी सरपंच अंजना केंजळे यांनी केली.ग्रामपंचायतीमध्ये आयोजित ग्रामसभेत त्या बोलत होत्या. यावेळी उपसरपंच योगेश पवार, सदस्या शशिकला पवार, मुगुटराव केंजळे, ग्रामसेवक संदीप निकम यांची प्रमुख उपस्थिती होती. सभेच्या सुरुवातीला ग्रामसेवक निकम यांनी मागील सभेचे प्रोसेडिंंग वाचन केले. यानंतर शासनाच्या विविध योजनांची माहिती देण्यात आली. जाधववाडी गाव पर्यावरण संतुलित ग्रामसमृद्ध योजनेमध्ये बसण्यासाठी थकित कर भरण्यात यावा, अन्यथा थकित खातेदारांवर कारवाई करण्याात येणार असल्याचे ग्रामसेवकांनी सांगितले. रोजगार हमी योजनेतून पाणंद रस्ते तयार करणे, ज्येष्ठ नागरिकांच्या समस्या गावस्तरावर सोडवण्यासाठी समिती स्थापन करणे, विहीर बांधकामाचे प्रस्ताव तयार करणे, पाझर तलावातील गाळ काढणे आदी विषयावर यावेळी चर्चा करण्यात आली.ऐनवेळच्या विषयादरम्यान जंगलवाडी शाळेतील शाळा व्यवस्थापन समिती गठित करण्यात येऊन शिक्षक राजकारण करत असल्याबाबत वरिष्ठांशी पत्रव्यवहार करण्याची मागणी सरपंच केंजळे यांनी केली. तसेच गावात दारूबंदी करण्याची मागणीही यावेळी महिलांनी केली. पिण्याच्या पाण्याच्या कृत्रिम टंचाई निकाली काढण्याबाबत गावात लवकरच नळपाणी योजना राबवण्यात येणार असल्याचे उपसरपंच योगेश पवार यांनी सांगितले. ग्रामसभेस विश्वास जाधव, रामचंद्र पवार, संपत गायकवाड आदींसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. (वार्ताहर)गटशिक्षणाधिकाऱ्यांना निवेदनस्वातंत्र्यदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमामध्ये जंगलवाडी शाळेत विद्यार्थ्यांना गणवेश वाटप कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमासही सरपंचांना निमंत्रित करण्यात आले नव्हते. त्यामुळे शिक्षक राजकारण करून गावातील वातावरण कलुशित करण्याचा प्रयत्न करीत असल्याचे स्पष्ट होते. संबंधित शिक्षकांवर कारवाई करावी, अशा मागणीचे निवेदन ग्रामस्थांनी गटशिक्षणाधिकाऱ्यांना दिले आहे.