शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
6
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
7
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
8
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
9
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
10
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
11
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
12
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
13
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
14
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
15
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
16
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
17
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
18
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
19
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
20
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
Daily Top 2Weekly Top 5

‘तांबं’ चोरांचं ‘एक डीपीतपितळ’ उघडं!

By admin | Updated: December 9, 2015 01:03 IST

चाळीस हजारांचा ऐवज : वीज कंपनीची डोकेदुखी तर शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान

राहुल तांबोळी ल्ल भुर्इंज एका डिपी चोरीतून तब्बल ४० हजार रुपये एवढी घसघशीत रक्कम मिळत असल्याने चोरट्यांनी डीपी चोरीकडे मोर्चा वळवला आहे. डिपीमधील १०० किलोहून अधिक किलोच्या तांब्याच्या तारेच्या हव्यासापोटी धोका पत्करुन डीपींची चोरी होत असून चोरीतील हे तांबे ४०० रुपये किलोने भंगारात विकले जात आहे. ज्या ठिकाणी डीपीची चोरी होते त्या ठिकाणी नविन डीपी बसवण्यास क्लिष्ट प्रक्रियेमुळे मोठा कालावधी खर्ची पडत असल्याने वीज कंपनीच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांची डोकेदुखी वाढण्यासोबत शेतकऱ्यांचेही प्रचंड नुकसान होत आहे. दरम्यान, सोमवारी स्थानिक गुन्हे शाखेने ट्रान्सफॉर्मरमधून तांब्याची तार चोरणाऱ्या टोळीचा छडा लावून चौघांना अटक केली आहे. यामुळे तांबं चोरांच पितळ आता उघडं पडलं आहे. वीज वितरण कंपनीतर्फे २५ केव्ही, ६३ केव्ही, १०० केव्ही आणि २०० केव्हीचे डीपी बसवले जातात. यातील २५ केव्ही हे छोट्या वाडी वस्तीवर तर २०० केव्ही डीपी हे मोठ्या गावात व शहरात बसवले जातात. त्यामुळे हे डीपी फोडून त्यातील तांबे चोरणे चोरट्यांना शक्य होत नाही. शेतीसाठी ६३ केव्ही आणि १०० केव्हीचे बसवले जाणारे डीपी आडबाजूला शेतात असतात त्यामुळे चोरट्यांकडून या डीपींना लक्ष केले जाते. या डीपींवरुन तब्बल २२ केव्ही क्षमतेचा वीज पुरवठा वाहणारी तार असते. त्याची जोडणी या डीपीला असते. त्यामुळे डीपी फोडणे धोकादायक आहे. मात्र पैशाच्या हव्यासापोटी चोरटे तो धोका पत्करुन हे डीपी फोडत आहेत. दिवसेंदिवस वाढत चाललेल्या या चोरीच्या घटनांमुळे वीज वितरण कंपनीची डोकेदुखी वाढत आहेच याशिवाय शेतकऱ्यांचेही प्रचंड नुकसान होत आहे. कारण एका ६३ केव्हीच्या डीपीवर ४० ते ५० आणि एका १०० केव्ही डीपीवर ६५ ते ८० वीजपंप जोडणी दिलेली असते. डीपी नादुरुस्त झाला तर साधारण ८ ते १५ दिवसांत दुरुस्ती करुन तो डीपी पुर्ववत सुरु केला जातो. मात्र डीपी फोडून त्यातील तांब्याची तार चोरी झाल्यानंतर मात्र पोलिस तक्रार, वरिष्ठ कार्यालयाला त्याची माहिती कळवणे त्यानंतर नविन डीपीची मंजुरी मिळणे आदी सर्व प्रक्रियेमध्ये प्रचंड वेळ जातो. त्यामुळे चोरीझालेल्या ठिकाणी नविन डीपी बसण्यास दोन महिन्यांहून अधिक कालावधी लागत असल्याची माहिती शेतकऱ्यांकडून दिली जात आहे. या कालावधीत पाण्याअभावी पिके अक्षरश वाळून जात असून समोर पाणी असूनही वीज जोडणीअभावी ते पिकांना देता येत नाही. डीपी चोरीची तक्रार झाल्यानंतर तपास लागण्यास मोठा कालावधी लागतो. चोरटे जो डीपी फोडतात त्याचे संपूर्ण नुकसान होते त्यामुळे चोरीच्या ठिकाणी नविन डीपी बसवण्याशिवाय पर्याय राहत नाही. नविन डीपीला मंजूरी मिळण्याची प्रक्रिया अनेकदा दिरंगाईच्या फटक्यात अडकते. त्यामुळे शेतकऱ्यांचा रोष स्थानिक वीज कंपनी अधिकारी, कर्मचाऱ्यांना सहन करावा लागतो. प्रत्येक डीपीच्या ठिकाणी २४ तास सुरक्षा व्यवस्था ठेवणेही अशक्य आहे.  

एखादा डीपी नादुरुस्त झाला तर तो आम्ही जेवढ्या लवकर शक्य आहे तेवढ्या लवकर दुरुस्त करुन शेतकऱ्यांची गैरसोय दूर करु शकतो. मात्र चोरीनंतर संबंधित ठिकाणी नवा डीपी बसवण्यास एक महिन्याचा कालावधी लागत आहे. पोलिस तक्रार, वरिष्ठ कार्यालयाला याबाबतची माहिती देणे, नवा डीपी मंजूर करुन घेणे व तो बसवणे ही प्रक्रिया पार पाडणे आवश्यक असते त्यामुळे तो कालावधी लागत असून डीपी चोरट्यांवर वचक बसणे, या चोऱ्यांना आळा बसणे अतिशय गरजेचे आहे. - ए. एस. खुस्पे, उप कार्यकारी अभियंता, वाई. एका डीपीत १०० किलो तार ६३ केव्हीच्या डीपीमध्ये १०४ किलो वजनाची तांब्याची तार असते तर १०० केव्हीच्या डीपीमध्ये १२८ किलो वजनाची तांब्याची तार असते. सध्या नविन तांब्याच्या तारेचा दर हा प्रतिकिलोस ६०० रुपये आहे तर भंगारात हीच तांब्याची तार ४०० रुपये प्रतिकिलोने विकली जाते. एका डीपीतून १०० किलोहून अधिक तांबे मिळत असल्याने चोरट्यांना एका चोरीतून ४० हजारापेक्षा अधिक कमाई होत आहे. एवढ्या मोठ्या रकमेच्या हव्यासापोटीच चोरटे प्रसंगी धोका पत्करुन शेतातील डीपी फोडून तांबे चोरत आहेत.