शहरं
Join us  
Trending Stories
1
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
2
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
3
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
4
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
5
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
6
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
7
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
8
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
9
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
10
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
11
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
12
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
13
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
14
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
15
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
16
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
17
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
18
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
19
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
20
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
Daily Top 2Weekly Top 5

तळमावले - ढेबेवाडीत दहा दिवस जनता कर्फ्यूचा निर्णय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2021 04:39 IST

ढेबेवाडी : कोरोनाने शहरासह आता ग्रामीण भागातही मोठ्या प्रमाणात विळखा घातल्याने दिवसेंदिवस आता गंभीर स्थिती निर्माण झाली आहे. प्रशासनावरही ...

ढेबेवाडी : कोरोनाने शहरासह आता ग्रामीण भागातही मोठ्या प्रमाणात विळखा घातल्याने दिवसेंदिवस आता गंभीर स्थिती निर्माण झाली आहे. प्रशासनावरही मोठा ताण येत आहे. यामुळे या सर्व बाबींचा विचार करून ढेबेवाडी आणि तळमावले या पाटण तालुक्यातील मोठ्या बाजारपेठेतील सर्वच व्यापाऱ्यांनी बुधवारपासून सलग दहा दिवस बाजारपेठा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय पोलिसांसह प्रशासनालाही कळवला असून त्यानुसार स्थानिक ग्रामपंचायतींंनीही नोटीस जाहीर केली आहे.

पाटण तालुक्यातील बहुतेक गावात कोरोनाने हात-पाय पसरायला सुरुवात केली आहे. दिवसेंदिवस परिस्थिती गंभीर होत असतानाच कोरोनाचे हॉट स्पॉट असलेल्या पुणे-मुंबईहून गावा-गावात चाकरमानी परतू लागले आहेत. यामुळे कोरोनाचा फैलाव वेगाने होत आहे. त्यातच या विभागातील ढेबेवाडी आणि तळमावले या दोन महत्त्वपूर्ण बाजारपेठेत अलीकडे विनाकारण फिरणाऱ्यांचीही संख्या वाढतच चालली होती.

सुमारे साठ गावे आणि शंभरवर वाड्या-वस्त्यांसह कराड-पाटण तालुक्यातील अनेक गावांतील जनतेसाठी सर्व सोयींनीयुक्त बाजारपेठा म्हणून तळमावले आणि ढेबेवाडी ओळखल्या जातात. मंगळवारी सकाळी प्रांताधिकारी श्रीरंग तांबे, ढेबेवाडी पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक संतोष पवार आणि स्थानिक सरपंच, पदाधिकारी आणि व्यापारी अशा संयुक्तिक बैठका दोन्ही बाजारपेठेत झाल्या. त्यावेळी प्रांताधिकारी तांबे आणि सहायक पोलीस निरीक्षक संतोष पवार यांनी प्रशासनाच्यावतीने कोरोना संकट काळात घ्यावयाची काळजी आणि खबरदारी याबाबत माहिती देऊन प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन केले.

त्यावेळी उपस्थित व्यापारी आणि ग्रामपंचायतीचे पदाधिकारी यांनी कोरोनावर मात करण्यासाठी बाजारपेठच सलग दहा दिवस बंद ठेवण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय प्रशासनालाही कळविण्यात आला. अत्यावश्यक सेवा यामध्ये हॉस्पिटल आणि मेडिकल सेवा चालू राहतील असेही ठरले आहे.