शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
2
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; ६ जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
3
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
4
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
5
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
6
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
7
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
8
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
9
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
10
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
11
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
12
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
13
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
14
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
15
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
16
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
17
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
18
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
19
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
20
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षण विभाग राज्यात नावारुपाला आणा

By admin | Updated: September 5, 2014 23:21 IST

शशिकांत शिंदे : जिल्हा परिषदेच्या वतीने १२ शिक्षकांना पुरस्कार

सातारा : अलीकडील काळात स्पर्धा वाढली आहे, आव्हाने उभी आहेत. अशावेळी जिल्हा परिषदेच्या ग्रामीण भागातील शाळा टिकणार का हा प्रश्न निर्माण झाला आहे. या आव्हानांच्या स्पर्धेत सातारा जिल्हा परिषदेचा शिक्षण विभाग राज्यात एक आदर्श म्हणून नावारुपाला आणावा, असे आवाहन पालकमंत्री शशिकांत शिंदे यांनी केले. येथील सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या सभागृहात आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण कार्यक्रमात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी जिल्हा परिषद अध्यक्षा अरुणादेवी पिसाळ होत्या. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी जी. श्रीकांत, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष संजीवराजे नाईक-निंबाळकर, शिक्षण समिती सभापती संजय देसाई, कृषी सभापती किरण साबळे-पाटील, समाजकल्याण सभापती आनंदराव शेळके-पाटील, महिला व बालकल्याण सभापती नीलम पाटील-पार्लेकर, माध्यमिक विभागाच्या शिक्षणाधिकारी संगिता भागवत, प्राथमिकचे शिक्षणाधिकारी प्रवीण अहिरे, उपशिक्षणाधिकारी तानाजी नरळे आदी उपस्थित होते. दरम्यान, यावेळी जिल्हा परिषदेच्या वतीने १२ जणांना आदर्श शिक्षक पुरस्काराने गौरविण्यात आले. पालकमंत्री शिंदे म्हणाले, गुरुचे स्थान हे मात्या-पित्याबरोबर आहे. आज संस्कृती बदलत असतानाही गुरूला पूर्वीऐवढेच महत्व आहे. स्पर्धेच्या या युगात इंग्रजी शाळा वाढू लागल्या आहेत. त्या तुलनेत जिल्हा परिषदेच्या शाळेतील पटसंख्या टिकविणे अवघड झाले आहे. त्यातच भांडवलदारांचे ग्रामीण भागातील शिक्षणाकडे लक्ष गेले नाही, हे आपले सुदैव आहे. जिल्हा परिषद शाळांतील पटसंख्या का कमी झाली याची दुरूस्ती करण्याची गरज आहे. सातारा जिल्हा परिषदेने पुढाकार घेऊन विद्यार्थींच्या गुणवत्ता वाढीसाठी प्रयत्न करावेत, असे सांगून पालकमंत्री शिंदे म्हणाले, सत्ता व पदापेक्षा आपण काहीतरी वेगळे करून दाखविणे महत्वाचे असते. त्यादृष्टीने आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त शिक्षकांनी यापुढेही गुणवत्तापूर्ण विद्यार्थी घडविण्याचे काम करावे.शिक्षण सभापती देसाई म्हणाले, आपण केलेल्या कामाचा आदर्श सर्वांसमोर यावा म्हणून आदर्श शिक्षक पुरस्कार देण्यात येत असतो. आता मिळालेल्या पुरस्कारामुळे शिक्षकांची आणखी जबाबदारी वाढलेली आहे. शिक्षणात सध्या अनेक आव्हाने येऊ लागली आहेत. ती पेलण्याची ताकद विद्यार्थ्यात निर्माण करण्याची आवश्यकता आहे. त्यासाठी शिक्षकांनी देशाचा भावी आधारस्तंभ असणाऱ्या युवा पीढीला बळकट करण्याची गरज आहे.उपाध्यक्ष संजीवराजे नाईक-निंबाळकर यांनी शिक्षणातून गुणवान विद्यार्थी घडवा. त्याचबरोबर त्यांना चांगला नागरिकही बनवावे, असे आवाहन केले.यावेळी कार्यक्रमाला जिल्हा परिषद सदस्य शिवाजीराव शिंदे, सुभाष नरळे, संदीप शिंदे, अमित कदम, माण पंचायत समितीचे सभापती श्रीराम पाटील, अ‍ॅड. भास्करराव गुंडगे, तसेच शिक्षण क्षेत्रातील विविध मान्यवर, जिल्हा परिषदेतील अधिकारी आणि कर्मचारी आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)पुरस्कारप्राप्त शिक्षकांची नावे...सुनीता देवकर, अंकुश सपकाळ, वैशाली कदम, राहुल हावरे, दत्तात्रय महांगरे, संजय जाधव, सुरज तुपे, धनंजय कुलकर्णी, श्रीरंग जाधव, संजय नांगरे, जयसिंग कदम आणि सचिन यादव.