शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
3
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
4
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
5
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
6
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
7
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
8
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
9
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
10
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
11
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
12
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
13
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
14
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
15
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
16
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
17
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
18
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
19
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
20
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
Daily Top 2Weekly Top 5

कऱ्हाडकर म्हणे.. नियम पाळून कारवाई करा!

By admin | Updated: February 11, 2016 00:36 IST

अतिक्रमणाबाबत आज निकाल : पालिका आणि हातगाडा संघटनेचा न्यायालयीन लढा; पालिकेने कारवाई थांबवली

कऱ्हाड : सर्वसोयी सुविधांनियुक्त असलेल्या कऱ्हाड शहरात रस्त्याकडेला अनधिकृतपणे लावण्यात आलेल्या अतिक्रमणावर पालिकेकडून गेल्या आठ दिवसांपासून कारवाई केली. पालिकेकडून व्यावसायिकांचे अगोदर पुनर्वसन केले असते तर योग्य झाले असते. बेधडकपणे न्यायालयाच्या नियमांचे पालन न करता कारवाई केल्याने शहरातील हातगाडा संघटना न्यायालयात गेली. पालिकेने शहरातील अतिक्रमणे काढल्यानंतर पुन्हा एकदा शहराने मोकळा श्वास घेतला. मात्र, यामध्ये एकीकडे व्यावसायिकांचे नुकसान झाले आहे तर दुसरीकडे अतिक्रमणाची कारवाई ही योग्य असल्याचे कऱ्हाडकरांमधून मत व्यक्त केले जात आहे.कऱ्हाड शहरात पालिकेच्या वतीने पहिल्यांदाच एवढी मोठी अतिक्रमण हटाव मोहीम राबविण्यात आली आहे. पालिकेकडून सुरू करण्यात आलेल्या कारवाईमुळे पुन्हा एकदा शहरातील रस्त्यांनी मोकळा श्वास घेतला. शहरातील रस्त्याकडेला असलेल्या फूटपाथवरून नागरिकांना देखील आता चालण्यासाठी जागा उपलब्ध झाली असल्याने याबाबत नागरिकांतून समाधान व्यक्त केले जात आहे. तर दुसरीकडे संघटना अतिक्रमण हटाव मोहिमेविरोधात आक्रमक झाली आहे. पालिकेकडून यापूर्वी करण्यात आलेल्या अतिक्रमण हटाव मोहिमेवेळी स्वत: संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनीही सहकार्य केले होते. मात्र, यावेळी करण्यात आलेली कारवाई ही नियमांच्या विरोधात असल्याचे संघटनेच्या पदाधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले. शहरातील प्रत्येक चांगल्या गोष्टीमध्ये सहभागी होत असल्याचे व्यावसायिकांकडून सांगितले जाते. मग ती स्वच्छता मोहीम असो अथवा उत्सव, उपक्रम. यामध्ये शहरातील हातगाडाधारक व लोक शहरातील एक जबाबदार नागरिक म्हणून सहभागी होतात. मात्र, यावेळच्या कारवाईबाबत व्यावसायिकांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे.पालिकेच्या वतीने वीस कर्मचारी, तीन अभियंते, दोन ट्रॅक्टर, आरोग्य निरीक्षक तसेच जेसाबी, एक डंपर यांच्या साह्याने आतापर्यंत तीन झोपड्या, चाळीसहून अधिक खोकी तसेच वीसहून अधिक हातगाडे, अनधिकृतपणे लावण्यात आलेले फलक काढण्यात आले. त्यामध्ये व्यावसायिकांसह काही कुटुंबाचे नुकसानही झाले. याविरोधात सुरक्षा दल, भीमशक्ती संघटना तसेच झोपडपट्टी सुरक्षा संघटना, चारचाकी हातगाडाधारक संघटनेकडून पालिकेविरोधात मोर्चा, आंदोलनही काढण्यात आला. त्यास शहरातील व्यावसायिकांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला. मात्र, दुसरीकडे याच व्यावसायिकांमुळे फूटपाथ, रस्त्याकडेला अतिक्रमण केले जात असल्याने नागरिकांनाही मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत होता. त्यातून पालिकेने शहरात अतिक्रमण हटाव मोहीम राबवावी, अशी नागरिकांकडूनही मागणी केली जात आहेत. सध्या करण्यात आलेली कारवाई ही योग्य असल्याचे नागरिकांतून सांगितले जाते.पालिकेच्या वतीने तीन टप्यांत अतिक्रमण कारवाई केली जाणार असल्याचे सांगण्यात आले होते. मात्र, हे प्रकरण न्यायालयात गेल्याने पालिकेला ही मोहीम थांबवावी लागली आहे. (प्रतिनिधी)पालिकेने पूर्वी संघटनेला सहकार्य करू असे सांगितले. त्यामुळे सुरुवातीला संघटनेतील व्यावसायिकांनीही पालिकेस सहकार्य करत आपली अतिक्रमणे स्वत:हून काढून घेतली. मात्र, पुन्हा पालिकेने सरसकट सर्वांचीच अतिक्रमणे काढल्याने संघटनेला न्यायालयात जावे लागले. कऱ्हाड शहरातील एक जबाबदार नागरिक म्हणून आम्ही स्वत:ला मानतो. त्याप्रमाणे पालिकेस यापूर्वी अनेकवेळा सहकार्यही केले आहे. मात्र, यावेळी पालिकेने चुकीच्या पद्धतीने ही कारवाई केली.- जावेद नायकवडीतालुकाध्यक्ष, हॉकर्स संघटना, कऱ्हाडकऱ्हाड शहरात पालिकेकडून राबविण्यात आलेली अतिक्रमण हटाव मोहीम ही योग्यच आहे. मात्र दुसरीकडे पालिकेने ही कारवाई करण्यापूर्वी व्यावसायिकांचे पुनर्वसन करणे गरजेचे होते. त्यांचे पुनर्वसन केले असते तर आज व्यावसायिकांचे नुकसान झाले नसते.-सागर बर्गेशहराध्यक्ष, मनसे, कऱ्हाड