शहरं
Join us  
Trending Stories
1
'होर्मुझ'वरून तणाव वाढला! अमेरिका आजपासून करणार इराणची नाकेबंदी, सेंट्रल कमांडचा इशारा
2
Top Marathi News LIVE Updates: आशा भोसले यांच्या पार्थिवावर आज संध्याकाळी अंत्यसंस्कार
3
पिंपरी: धक्कादायक! प्राध्यापकाच्या छळामुळे विद्यार्थिनीने उचललं टोकाचं पाऊल, एकाला अटक
4
Gold Silver Price Today: आज सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; खरेदी करणार असाल तर पाहा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K Gold चे नवे दर
5
IPL 2026 Points Table : गत चॅम्पियन RCB टॉप ३ मध्ये; पाचवेळच्या विजेत्या MI अन् CSK ची अवस्था बिकट
6
धर्मांतर प्रयत्नप्रकरणी नाशिकमधील 'त्या' बहुराष्ट्रीय कंपनीतील आरोपी निलंबित
7
वेतनवाढीच्या मागणीवरून कामगार आक्रमक; वाहनांची तोडफोड आणि दगडफेक, नोएडातील घटना!
8
ट्रम्प यांच्या धमकीनंतर शेअर बाजारात भूकंप; सेन्सेक्स १४०० अंकांनी आपटला; निफ्टी २४ हजारांच्या खाली
9
सिंधुदुर्ग जिल्ह्यात ग्रामपंचायतीच्या १००हून अधिक रिक्त जागांसाठी पोटनिवडणुकीची नोटीस जारी
10
SBI Home Loan: स्टेट बँकेतून ५० लाख रुपयांचं होम लोन घ्यायचंय; पाहा किती असावी लागेल सॅलरी?
11
IPL 2026: भर मैदानात टिम डेव्हिडची ‘दादागिरी’! पंचांच्या हातून चेंडू हिसकावला अन्...; पाहा नेमकं काय घडलं?
12
वेगाचा बादशाह जेव्हा स्वराभिषेकात न्हाऊन निघाला, ब्रेट लीने आशा भोसले यांच्यासोबत गायले होते गाणे
13
वाटाघाटी फिसकटल्या, आता पुन्हा युद्ध... ट्रम्प यांच्या आदेशाने इराणवर परत सुरु होणार हल्ले?
14
आजचे राशीभविष्य, १३ एप्रिल २०२६: नकारात्मकता दूर ठेवा, लाभ होईल, मान-सन्मान वाढेल!
15
Accident: लग्नाहून परतताना मृत्यूनं कवटाळलं, हापूड जिल्ह्यात वऱ्हाड्यांच्या बसला भीषण अपघात, ६ जण ठार!
16
डोनाल्ड ट्रम्प यांची होर्मुजच्या सामुद्रधुनीवर बंदी घालण्याची धमकी, Crude Oil च्या किमतीचा भडका, किती झाली किंमत?
17
Asha Bhosle Funeral: निरोपाची वेळ आली..! आशा भोसले यांच्या पार्थिवावर आज अंत्यसंस्कार होणार, दुपारी तीन वाजेपर्यंत अंत्यदर्शन
18
मतदारयादीच्या 'फिल्टर'चा बंगालच्या सत्तेवर परिणाम, ९१ लाख नावे बाद, ६५ ते ७० मतदारसंघांत ठरावीक केंद्रे ठरणार निर्णायक, वगळलेल्या नावांचा प्रभाव येथेच
19
महिला आरक्षणासाठी पंतप्रधानांनी सर्वच पक्षांकडून मागितले समर्थन, पक्षांच्या गटनेत्यांना पत्र लिहून आवाहन
20
उरले उरात काही 'आवाज' चांदण्यांचे, आशा भोसले यांचे निधन, आज होणार अंत्यसंस्कार
Daily Top 2Weekly Top 5

तार्इंच्या प्रवेशावर ‘स्वाभिमानी’गप्प

By admin | Updated: July 27, 2014 23:03 IST

दुसऱ्या हप्त्याची लढाई तीव्र करणार : आॅगस्टमध्ये ठरणार रणनीती

सातारा : माजी आमदार शालिनीताई पाटील यांचा पक्षप्रवेश आणि कोरेगावातून उमेदवारी यावर स्वाभिमानीच्या पदाधिकाऱ्यांनी थेट बोलणे टाळले. दरम्यान, दुसरा हप्ता पाचशे रुपये मिळावा म्हणून आम्ही तीव्र आंदोलन उभे करणार असून, आॅगस्टमध्ये जिल्ह्यात होणाऱ्या मेळाव्यात पुढील रणनीती स्पष्ट करणार असल्याची माहिती संजय भगत, मनोज घोरपडे यांनी दिली.शालिनीताई पाटील यांना स्वाभिमानी शेतकरी संघटनेत प्रवेश द्यावा आणि कोरेगावातून विधानसभेची उमेदवारी द्यावी, अशी मागणी जरंडेश्वर कारखाना गटाच्या काही कार्यकर्त्यांनी खा. राजू शेट्टी यांच्याकडे केली आहे. त्याचाच संदर्भ देत पत्रकारांनी भगत आणि घोरपडे यांना छेडले असता त्यांनी या विषयावर थेट बोलणे टाळले. स्वाभिमानीचा उमेदवार कोण राहील, याचा निर्णय वरिष्ठ पातळीवरून होणार असला तरी कार्यकर्ते म्हणून या मतदारसंघातून निष्कलंक आणि सहकार वाचविणाऱ्या उमेदवाराच आमचे प्राधान्य राहील, असे सांगण्यासही भगत आणि घोरपडे विसरले नाहीत.दरम्यान, दुसऱ्या हप्त्याची लढाई स्वाभिमानीने आणखी तीव्र करण्याचा निर्धार केला असल्याची माहिती यावेळी देण्यात आली. भगत म्हणाले, ‘दि. २ आॅगस्ट रोजी कोरेगाव आणि उंब्रज येथे खासदार राजू शेट्टी आणि सदाभाऊ खोत यांच्या प्रमुख उपस्थितीत दुसऱ्या हप्त्याच्या लढाईची अंतिम घोषणा होणार आहे. जरंडेश्वर शेतकऱ्यांच्या मालकीचा व्हावा आणि दुष्काळी भागासाठी आवश्यक असणारे; मात्र रखडलेले सिंचन प्रकल्प पूर्ण करावेत, महाराष्ट्रात दुष्काळ निवारण आयोग स्थापन करावा, अशी मागणीही यावेळी करण्यात येणार आहे.’ यावेळी सुर्यकांत भुजबळ, शंकर शिंदे, संजय साबळे, अल्लाउद्दीन इनामदार, हणमंत जगदाळे, संभाजी केंजळे, जीवन शिर्के, उपस्थित होते. (प्रतिनिधी)