चाफळ : उत्तरमांड प्रकल्पग्रस्तांनी विविध मागण्यांसाठी जलसमर्पण करण्याचा पवित्रा घेतला; मात्र शासकीय अधिकाऱ्यांच्या लेखी आश्वासनामुळे हे आंदोलन तात्पुरते स्थगित करण्यात आले़उत्तरमांड प्रकल्पाला १४ वर्षे पूर्ण होत आहेत. मात्र आजही प्रकल्पग्रस्तांच्या मागण्या ‘जैसे थे’ आहेत़ यासाठी धरणग्रस्तांनी जलसमर्पणाचा इशारा दिला होता़ धरणस्थळावर सकाळी दहापासून धरणग्रस्त गोळा होण्यास सुरूवात झाली़ आंदोलनापूर्वी तहसीलदार रवींद्र सबनीस यांनी धरणग्रस्तांशी चर्चा करून प्रांताधिकाऱ्यांशी संपर्क साधला़ याबाबत आठ दिवसांत धरणस्थळावर बैठक घेण्याचे आश्वासन देण्यात आले़ तसेच कृष्णा खोरेचे उपअभियंता मुंजाप्पा यांनी जोपर्यंत धरणावर बैठक होत नाही तोपर्यंत धरणातून पाणी न सोडण्याचे आश्वासन दिले़ त्यामुळे धरणग्रस्तांनी हे आंदोलन तात्पुरते स्थगित करण्याचा निर्णय घेतला़ (वार्ताहर)अन्यथा पुन्हा तीव्र आंदोलनअधिकाऱ्यांनी बैठक आयोजित करण्याचे आश्वासन दिल्यामुळे हे आंदोलन स्थगीत करण्यात आले आहे. मात्र, बैठक न झाल्यास अथवा बैठकीत तोडगा न निघाल्यास पुन्हा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा धरणग्रस्तांनी दिला आहे़
जलसर्पण आंदोलन आश्वासनानंतर स्थगित
By admin | Updated: January 2, 2015 00:19 IST