शहरं
Join us  
Trending Stories
1
वाटाघाटी फिसकटल्या, आता पुन्हा युद्ध... ट्रम्प यांच्या आदेशाने इराणवर परत सुरु होणार हल्ले?
2
डोनाल्ड ट्रम्प यांची होर्मुजच्या सामुद्रधुनीवर बंदी घालण्याची धमकी, Crude Oil च्या किमतीचा भडका, किती झाली किंमत?
3
आजचे राशीभविष्य, १३ एप्रिल २०२६: नकारात्मकता दूर ठेवा, लाभ होईल, मान-सन्मान वाढेल!
4
मतदारयादीच्या 'फिल्टर'चा बंगालच्या सत्तेवर परिणाम, ९१ लाख नावे बाद, ६५ ते ७० मतदारसंघांत ठरावीक केंद्रे ठरणार निर्णायक, वगळलेल्या नावांचा प्रभाव येथेच
5
महिला आरक्षणासाठी पंतप्रधानांनी सर्वच पक्षांकडून मागितले समर्थन, पक्षांच्या गटनेत्यांना पत्र लिहून आवाहन
6
पश्चिम बंगालमधील मतदारयाद्यांबाबत सुप्रीम कोर्टात आज निकाल
7
विदर्भात पारा ५ अंशांनी वाढला; अकोला जिल्हा सर्वाधिक ‘हॉट’, थंड हवेचे ठिकाण बुलढाणाही तापले; ८ दिवस राहणार तडाखा
8
MI vs RCB : विकेट गमावल्यावर Virat Kohli ला राग अनावर! हेल्मेट-ग्लोव्हज फेकल्याचा व्हिडिओ व्हायरल
9
विशेष लेख: पाकिस्तानच्या भूमिकेवरून एवढा गोंधळ, गदारोळ का?
10
‘पीएच.डी गाइड’च्या छळाला कंटाळून पुण्यात विद्यार्थिनीनं संपवलं जीवन, मार्गदर्शक शास्त्रज्ञ अटकेत; चिठ्ठीतून गंभीर आरोप
11
चीनने पाकव्याप्त काश्मीर-अफगाण सीमेजवळ स्थापन केला नवीन विभाग
12
‘ईशान्येला देशापासून वेगळे करण्याचा डाव’, पंतप्रधान मोदींचा गंभीर आरोप
13
अमरनाथ यात्रा ३ जुलैला सुरू होणार; १५ एप्रिलपासून नोंदणी
14
Iran War: इराणच्या युद्धात महासत्ता अमेरिकेचा ‘सेल्फ गोल’
15
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
16
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
17
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
18
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
19
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
20
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
Daily Top 2Weekly Top 5

सूरज मोहितेंचे स्मारक सरताळेत व्हावे

By admin | Updated: March 30, 2015 00:16 IST

ग्रामस्थांची मागणी : पराक्रमाचा इतिहास जागृत ठेवण्यासाठी प्रयत्न

कुडाळ : जम्मू काश्मीरमध्ये दहशतवाद्यांच्या हल्ल्यात हुतात्मा झालेल्या जावळी तालुक्यातील सरताळे (गणेशवाडी) येथील वीर जवान सूरज मोहिते यांचे यथोचित स्मारक त्यांच्या जन्मगावी सरताळे येथे व्हावे, अशी मागणी सरताळे ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आली आहे. याबाबतची लेखी निवेदने राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री विजय शिवतारे, आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले, जिल्हाधिकारी, प्रांताधिकारी यांना देण्यात आली आहेत. सूरज मोहिते हे देशासाठी धारातीर्थ पडले असून, त्यांच्या अतुलनीय पराक्रमाचा इतिहास सतत जागृत ठेवण्यासाठी जावळी तालुक्यातील सर्वच स्तरातील नागरिकांनी स्मारकाच्या उभारणीसाठी सहकार्य करावे, असे आवाहनही सरताळे ग्रामस्थांनी केले आहे. हुतात्मा मोहिते यांचा जन्म जावळी तालुक्यातील वैराटगडाच्या पायथ्याशी अवघी तीस ते चाळीस घरे व जेमतेम १५० लोकसंख्या असलेल्या गणेशवाडी येथे झाला असून, त्यांचे बालपण गणेशवाडी, सरताळे येथेच झाले आहे. त्यांचे माध्यमिक शिक्षण गगनगिरी माध्यमिक विद्यालय कापसेवाडी येथे झाले आहे. बालपणी ते नित्यनेमाने वैराटगडावर दर्शनाला जात असायचे. गावच्या डोंगरदऱ्यात निसर्गरम्य वातावरणात बागडत असताना शिक्षणाचे धडे गिरवताना मोहिते यांना देशसेवा करण्याची प्रेरणा मिळाली. २० मार्च २०१३ मध्ये ते सैन्यदलात दाखल झाले. नोकरी लागताना मोहिते यांनी जी कागदपत्रे सादर केली ती सुद्धा जावळी तालुक्यातीलच आहेत.गुढीपाडव्याच्या आदल्यादिवशी सूरज माहिते हे हुतात्मा झाले. गावच्या सुपुत्रास अखेरची मानवंदना देण्यासाठी गावातील ग्रामस्थांनी गुडीपाडव्याच्या दिवशी गुड्या न उभारता सणच साजरा केला नाही.सूरज मोहिते यांनी देशासाठी आपल्या प्राणांची परवा न करता आपल्या छातीवर दहशतवाद्यांच्या गोळ््या निडरपणे झेलून आपल्या सहकार्यांचे प्राण वाचवले, म्हणून या भारतमातेच्या थोर सुपुत्रास मरणोत्तर वीर पुरस्कार देऊन सन्मानित करावे, तसेच हुतात्मा सूरज, त्यांची वीरमाता, गणेशवाडी ग्रामस्थांना योग्य न्याय मिळून हीच खरी श्रद्धांजली ठरेल म्हणून त्यांचे यथोचित स्मारक त्यांच्या जन्मगावी व्हावे, अशी मागणी गणेशवाडी (सरताळे) ग्रामस्थांनी पत्रकार परिषदेत केली आहे. यावेळी सरताळे येथील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. (प्रतिनिधी)सरताळेची यात्रा साधेपणानेसरताळे (गणेशवाडी)च्या ग्रामदैवतांची वार्षिक यात्रा गुरूवार दि. १६ ते १८ एप्रिलला होणार आहे. याही यात्रेत कोणत्याही प्रकारचे मनोरंजनाचे कार्यक्रम न करता केवळ साधेपणाने धार्मिक विधी करून साजरी करणार असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. आजही सूरज आपल्यात नाही, यावर ग्रामस्थांचा विश्वास बसत नसून ग्रामस्थांचा शोक अजूनही टिकून आहे. सुरज यांच्या आठवणीने आजूनही गावात युवा वर्ग व ग्रामस्थांमध्ये त्यांच्या शौर्याची चर्चा करताना दिसत आहेत.