शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

अडतच्या बंदला विक्रेत्यांचा पाठिंबा...

By admin | Updated: July 13, 2016 23:27 IST

शेतकरी संघटनेकडून निषेध : दलाल, व्यापाऱ्यांवर टीका; पुतळा दहनचा प्रयत्न, परवाने रद्द करण्याची मागणी

सातारा : खरेदीदाराकडून अडत वसूल करण्याच्या निषेधार्थ अडत व्यापाऱ्यांचे चार दिवसांपासून बंद आंदोलन सुरू आहे. बुधवारी या बंदला भाजीविक्री करणाऱ्या व्यावसायिकांनीही पाठिंबा देत मंडई बंद ठेवली. तर शेतकरी संघटनेने बंद पुकारणाऱ्या दलाल व व्यापाऱ्यांचा निषेध करून पुतळा दहन करण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, अडत्यांचे परवाने रद्द करण्याची मागणी करण्यात आली. अडतच्या बंदला चार दिवस होऊनदेखील कोणताच निर्णय शासनाने घेतलेला नाही. त्यामुळे या बंदची व्याप्ती वाढली आहे. बंदमुळे माल मिळत नसल्याने भाजी विक्रेत्यांनीही बंद पुकारला आहे. अडते आम्हाला उधार माल देतात शेतकऱ्यांकडून उधार मिळत नाही. त्यामुळे अडत्यांमुळेच आमचा प्रपंच चालत असल्याने या बंदला आम्ही स्वत:हून पाठिंबा दिला आहे. शासनाच्या या धोरणामुळे अडते बरोबर आम्हीही अडचणीत आलो असल्याने बुधवारपासून बेमुदत बंद केले असल्याचे येथील विक्रेत्यांनी ‘लोकमत’ला सांगितले. दरम्यान, भाजी विक्रेत्यांनी बंद केला असला तरी शेतकरी आपला स्वत:चा माल स्वत:च विकत आहे. त्यामुळे ग्राहकांची गैरसोय झाली नसली तरी दरांची चढाओढ होत असल्याने ग्राहकांनी नाराजी व्यक्त केली. अचानक भाजी विक्रेत्यांनी पुकारलेल्या बंदमुळे आज ग्राहकांची चांगलीच तारांबळ उडाली. महात्मा फुले भाजी मंडई, राजवाडा भाजी मंडई व पोवई नाका भाजी मंडईतील व्यापाऱ्यांनी बुधवारी कडेकोट बंद पाळला असला तरी नाक्यावरील भाजी मंडईत शेतकऱ्यांनी भाजीविक्री सुरूच ठेवली होती. त्यामुळे या बंदचा येथे काहीच परिणाम जाणविला नाही. (प्रतिनिधी)