शहरं
Join us  
Trending Stories
1
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
2
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
3
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
4
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
5
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
6
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
7
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
8
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
9
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
10
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
11
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
12
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
13
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
14
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
15
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
16
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
17
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
18
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
19
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
20
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
Daily Top 2Weekly Top 5

संगणक परिचालकांच्या ठिय्या आंदोलनाला पाठिंबा

By admin | Updated: November 17, 2014 23:26 IST

आज पंकजा मुंडेंशी चर्चा : ...अन्यथा शनिवारी आझाद मैदानावर मोर्चा

सातारा : ग्रामपंचायतीतील संगणक परिचालक (डाटा आॅपरेटर) यांनी विविध मागण्यांसाठी काम बंद आंदोलन सुरू केल्यानंतर सोमवारी जिल्ह्यातील पंचायत समितीसमोर ठिय्या आंदोलन केले. या आंदोलनाला अनेक संघटना व मान्यवरांनी पाठिंबा दिला आहे. दरम्यान, या मागण्यासंदर्भात मंगळवार, दि. १८ रोजी ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्याशी शिष्टमंडळ चर्चा करणार आहे. यावेळी निर्णय न झाल्यास दि. २२ रोजी आझाद मैदानावर निषेध मोर्चा काढण्यात येणार आहे.राज्यातील ग्रामपंचायतीत कार्यरत असणाऱ्या संगणक परिचालकांनी पाच दिवसांपासून विविध मागण्यांसाठी काम बंद आंदोलन सुरू केले आहे. यामुळे ग्रामपंचायतीत संगणकावर दाखले देणे बंद झाले आहे. लोकांना दाखले काढण्यासाठी अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. काम बंद करणाऱ्या परिचालकांनी सोमवारी प्रत्येक पंचायत समितीसमोर ठिय्या आंदोलनाचा निर्णय घेतला होता. त्यानुसार सातारा जिल्ह्यातील माण, पाटण, कोरेगाव, वाई, मेढा, फलटण येथील पंचायत समितीसमोर ठिय्या आंदोलन करण्यात आले. मेढा : येथील आंदोलनात जावळी तालुक्यातील सर्व संगणक परिचालक सहभागी झाले होते. परिचालकांच्या मागण्यांना मनसेच्या वतीने पाठिंबा देण्यात आला. दहिवडी : माण पंचायतीसमोरील आंदोलनाला पंचायत समितीचे उपसभापती अतुल जाधव, पंचायत समिती सदस्य हुलगे, माजी उपसभापती दादासाहेब शिंगाडे, वंजारी युवक संघटना, परिवर्तन सामाजिक संस्था, ग्रामपंचायत संघ यांनी पाठिंबा दिला. वाई : तालुक्यातील संगणक परिचालकांनी मोर्चा काढून पंचायत समितीसमोर आंदोलन केले. यावेळी स्वप्निल सणस, महेश भणगे, स्वप्निल शेलार, दीपक जाधव, रूपेश कांबळे, सागर बाबर, मंगेश चौधरी, सूरज जगताप, आरती जाधव, रेश्मा मांढरे, श्रीराम पोतदार आदी सहभागी झाले होते. (प्रतिनिधी)आज शिष्टमंडळ मुंबईत...दि. १८ रोजी मुंबईत ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्याशी संघटनेचे सात जणांचे शिष्टमंडळ चर्चा करणार आहे. या चर्चेत सकारात्मक निर्णय न झाल्यास पुढील आंदोलनाची दिशा ठरविण्यात येणार आहे. त्यासाठी प्रत्येक जिल्ह्याचे अध्यक्ष मुंबईत दाखल होणार आहेत. दि. २२ रोजी मुंबईतील आझाद मैदानावर निषेध मोर्चाचे आयोजन करण्यात येणार आहे.