शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
2
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
3
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
4
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
5
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
6
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
7
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
8
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
9
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
10
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
11
छोटीशी चूक अन् हातात आलेला सामना गमावला, डेव्हिड मिलर ड्रेसिंग रूममध्ये ओक्साबोक्सी रडला, अखेर...
12
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
13
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
14
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
15
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
16
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
17
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
18
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
19
Viral Video: "नोकरी हवी तर किम जोंग उनला शिवी दे..."; कंपनीची अजब अट पाहून उमेदवार थरथरला
20
Latest Marathi News LIVE: डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
Daily Top 2Weekly Top 5

नोंदणी कार्यालयात सनईचे सूर

By admin | Updated: July 25, 2015 01:13 IST

वाग्दत्तांसाठी वातावरणनिर्र्मिती : पश्चिम महाराष्ट्रात पहिलाच यशस्वी प्रयोग

प्रगती जाधव-पाटील - सातारा -नोंदणी पद्धतीने विवाह करताना विवाह इच्छुकांबरोबरच आलेल्या वऱ्हाडींना टिपिकल शासकीय वातावरणाचा अनुभव येऊ नये, यासाठी साताऱ्यात नामी शक्कल लढविण्यात आली आहे. येथील विवाह नोंदणी कार्यालयात विवाह सुरू असताना मंगल सनई चौघड्यांचा संगीत लावले जाते. त्यामुळे शासकीय कार्यालयाचे वातावरण जाऊन मंगल कार्यालयाचा फिल येतो. असा प्रयोग करणारे सातारा हे पहिले केंद्र ठरले आहे.विवाह हा प्रत्येकाच्या आयुष्यातील एक अविस्मरणीय प्रसंग असतो. तो सर्वांच्याच स्मृतीत राहावा, यासाठी कुटुंबे प्रयत्न करतात. डामडौल करून लग्न साजरे करण्याच्या प्रथेला फाटा देत काही कुटुंबीय नोंदणी पद्धतीने विवाह करण्याचा मार्ग स्वीकारतात. अशा वऱ्हाडींना विवाह नोंदणी कार्यालय अनेकदा रुक्ष वाटते. आधुनिक विचारसरणीचा अवलंब केलेल्या या कुटुंबीयांना विवाह प्रसंग साजरा केल्यासारखा वाटावा, यासाठी ही सोय करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, जेव्हा लग्नाची नोंदणी सुरू असते, त्यावेळी कार्यालयातील अन्य विभागांचे काम थोड्या वेळासाठी थांबविण्यात येते. विवाह नोंदणी सुरू झाल्यापासून गळ्यात मंगळसूत्र घालेपर्यंत संगणकावर मंद आवाजात चनईसे सूर वाजत असतात. काहीजण जागेच्या नोंदीसाठी आलेले लोकही वऱ्हाडी बनून लग्नात सहभागी होतात. शासकीय कार्यालयाचा बाज सोडून अधिकारी आणि कर्मचारीही वऱ्हाडींपैकी एक होऊन जातात. त्यामुळे लग्न लावताना येथे खूपच मोकळे वातावरण असल्याचे पाहायला मिळते. भविष्यात शहरी भागातील सुशिक्षितांनीही नोंदणी पद्धतीने विवाह करण्यास प्रवृत्त व्हावे, अशी अपेक्षा कार्यालयातून व्यक्त केली जात आहे.दोनशे रुपयांत लग्ननोंदणी पद्धतीने विवाह करण्यासाठी केवळ दोनशे रुपयांचा खर्च येतो. लग्न जिल्ह्यातील व्यक्तींचे होणार असेल तर नोटीसचा खर्च पन्नास रुपये येतो. दोन जिल्ह्याात नोटीस पाठवायच्या असतील तर शंभर रुपये लागतात. विवाहनोंदणी कार्यालयाचे शुल्क १५० रुपये असते. अशा पद्धतीने केवळ दोनशे रुपयांत हे लग्न लागू शकते. कार्यालयाबाहेर जाऊन विवाह नोंदणी करण्यासाठी एक हजार रुपयांचे शुल्क आकारले जाते. ग्रामीण भागातील टक्का मोठा नोंदणी विवाह करण्यासाठी ९९ टक्के लोक हे ग्रामीण भागातून येत असल्याची माहिती पुढे आली आहे. अशिक्षित म्हणून ग्रामीण भागातील लोकांकडे पाहून नाके मुरडणारे फक्त एक टक्का शहरी लोक नोंदणी पद्धतीने विवाह करतात. पारंपरिक पद्धतींना बाजूला सारून आधुनिक विचारसरणीची कास धरलेले सुजाण नागरिक ग्रामीण भागात असल्याचे वास्तव यानिमित्ताने अधोरेखित झाले आहे. शहरी भागातूनही नोंदणी विवाह वाढणे अपेक्षित आहे.