शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain Alert: मुंबईत रेड अलर्ट; तीन ते चार तासात 'अतिमुसळधार' कोसळणार, शाळांना सुट्टी जाहीर
2
मुंबईत शाळांना सुट्टी जाहीर, पाणी साचल्याने अनेक ठिकाणी वाहतूक ठप्प; ४८ तासांसाठी रेड अलर्ट जारी
3
आभाळ फाटले! मुखेड तालुक्यातील सहा गावांत पाणी शिरले; बेपत्ता १२ जणांचा शोध सुरु
4
‘मत चोरी’चा वाद वाढला, विरोधक मुख्य निवडणूक आयुक्तांविरोधात महाभियोग प्रस्ताव आणण्याच्या तयारीत 
5
२ लाख रुपयांवर मिळेल ३०,९०८ रुपये निश्चित व्याज! सरकारी बँक 'या' ग्राहकांना देतेय सर्वाधिक परतावा
6
श्रावणातला शेवटचा आठवडा; 'या' दिशेला लावा बेलाचे झाड, घरात धन, समृद्धी, पैसा येईल अपार
7
"सिनेमाच्या नावाखाली अभिनेते मजा..." कमी वयाच्या अभिनेत्रींसोबत काम करण्यावर आर माधवनचं भाष्य
8
सतर्क राहा: कोकण, पश्चिम महाराष्ट्रात १८-१९ ऑगस्टला मुसळधार पाऊस; कुठे-कुठे 'रेड अलर्ट'?
9
अहिल्यानगरमध्ये फर्निचरच्या दुकानात अग्नितांडव; अख्खं कुटुंब संपलं, दोन चिमुकल्यांसह पाच जणांचा मृत्यू
10
भाडे देऊन लाखोंचे नुकसान की EMI देऊन घर खरेदी करावे? ५० लाखांच्या घराचं आर्थिक गणित समजून घ्या
11
फ्लॉप शोचा सिलसिला संपेना! अन् म्हणे; सलमानचा पाक संघ आशिया कपमध्ये टीम इंडियासमोर हिट ठरेल
12
Apple नं ट्रम्प आणि चीनला दाखवला ठेंगा; भारतात आणखी एका प्रकल्पातून सुरू केलं iPhone चं उत्पादन
13
Home Remedy: महागडी हेअर ट्रीटमेंट सोडा, ५० रुपयांत लांबसडक, घनदाट, काळेभोर केस मिळवा 
14
जन्माष्टमीच्या मिरवणुकीतील रथ विजेच्या तारांना चिकटला, शॉक लागून ५ जणांचा मृत्यू, केंद्रीय मंत्र्यांचा सुरक्षा रक्षकही जखमी 
15
'सिटी ऑफ ड्रीम्स'नंतर प्रिया बापटचा पुन्हा 'तो' सीन, अभिनेत्री सुरवीन चावलासोबत लिपलॉक
16
दरमहा १२,५०० रुपये गुंतवा आणि ४० लाख रुपये मिळवा! पोस्ट ऑफिसची ही योजना देते करमुक्त परतावा
17
शेतकऱ्यांवर चिनी संकट! महत्त्वाच्या खनिजांवरील निर्यात कमी, रोखला खतांचाही पुरवठा
18
Stock Market Today: शेअर बाजारात तुफान तेजी, ७१८ अंकांच्या तेजीसह बाजार उघडला; Midcap आणि बँकिंग शेअर्समध्ये खरेदी
19
'महाभारत'ची कुंती 'बिग बॉस'मध्ये येणार! 'हत्यारे की बहन' म्हणून बोलवायचे लोक, कोण आहे ती?
20
दुचाकीला धडक देऊन ट्रक ड्रायव्हर पळाला, पण AIने केली कमाल, पोलिसांनी ३६ तासांत पकडला

संडे स्पेशल इन्ट्रो आणि लेख

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2021 04:39 IST

जळीस्थळी निव्वळ कोरोना ऐकून आणि वाचून जिथं सामान्य विटले तिथे प्रत्यक्ष रणभूमीत उतरून काम करणाऱ्यांची काय अवस्था झाली असेल ...

जळीस्थळी निव्वळ कोरोना ऐकून आणि वाचून जिथं सामान्य विटले तिथे प्रत्यक्ष रणभूमीत उतरून काम करणाऱ्यांची काय अवस्था झाली असेल याचा विचार न केलेलाच बरा ! बारा-बारा तास ओसाड रस्त्यांवर बंदोबस्तासाठी उभे असलेले पोलीस, पॉझिटिव्ह रुग्णांना बरे करणारे डॉक्टर, सामान्यांना बेडसह औषधे पुरविणारे प्रशासन, यात्रा-जत्रा रद्द झाल्याने बेरोजगारी झेलणारे कलाकार हे सगळे सध्या ताणतणावात आहेत. हा ताण घालविण्यासाठी कोण काय करतंय आणि स्वत:ला कसं सक्षम ठेवतंय, हे शोधण्याचा हा छोटासा प्रयत्न...!

टेन्शन लेने का नहीं...!

जगण्या-मरण्याच्या पुसटशा रेषेदरम्यान खंबीरपणे ते उभे आहेत... कोरोनाचाही मुकाबला करायला ते ऑनड्यूटी आहेत... कोरोनाने सहकाऱ्याला जेरबंद केलं तरीही त्याचं काम करून त्यांनी अखंड रुग्णसेवा केली... रुग्णाला वाचविण्याची जबाबदारी, औषधे मिळविण्यापासून नातेवाइकांना धीर देण्यापर्यंतचे काम करताना येणारा ताण न सांगण्यासारखा आहे. वैद्यकीय क्षेत्रात काम करणाऱ्या अनेकांनी स्वत:मध्ये सकारात्मक विचार पेरून हा ताण घालवत असल्याचे सांगितले. यासाठी वाचन, वेबसीरिज, गाणी, मोटिव्हेशनल विचार तर कोणी निव्वळ हास्यमालिका पाहून ताण घालविल्याचे सांगितले.

कोविड रुग्णांमध्ये राहून रोजच कोरोनाची शिकार करणाऱ्या योद‌्ध्यांना त्यांचा घात होऊ नये यासाठी काळजी घ्यावी लागते. हा संसर्ग किती भयानक आहे, हे खूप जवळून पाहणाऱ्या वैद्यकीय क्षेत्रातील घटकाला याच्या संसर्गाची सर्वाधिक भीती आहे; पण रोजच्या या भीतीवर विजय मिळवून हे योद्धे सलग वर्षभर अविरतपणे लढाई लढत आहेत. अंगाखांद्यावर बसलेला कोरोना कधी नाकावाटे शरीरात पोहोचून हल्ला करील हे माहीत नसल्याने वैद्यकीय क्षेत्रातील प्रत्येकजण आवश्यक काळजी घेतो आहे. उपचार करताना अचानक उद्भवणारी इमर्जन्सी, कोसळत जाणारे अवयव आणि गतप्राण होणारे देह रोजच्या रोज पाहणं प्रचंड तणाव देऊन जातं. ड्यूटी संपवून जाताना ठणठणीत असणारा तिशीतला रुग्ण अचानक जातो आणि आपल्या किंवा आप्तांच्याबाबतही हे घडू शकतं या विचारानेही मन खिन्न होतं. दिवसभर कामाच्या व्यापात विचारचक्र बंद असलं तरीही घरी आप्तेष्टांना भेटल्यानंतर प्रचंड खळबळ जाणवते हे नक्की.

सर्वत्र तणाव घेऊन जगणाऱ्या वैद्यकीय क्षेत्रातील अनेकांना या दिवसांत सु्ट्टीचा आनंद घेता आला नाही. जादा काम करून कंटाळलेले जीव या ताणातही स्वत:ला सकारात्मकतेने कार्यप्रवृत्त करीत आहेत. यासाठी कोणी गाण्यांच्या प्रेमात आहे, तर कोणाला वेबसीरिज दिलासादायक वाटतात, कोणी निव्वळ हसण्याच्या मालिका पाहतेय; तर कोणी मिळेल तो वेळ निसर्गाच्या सान्निध्यात घालविण्याचा प्रयत्न करतंय. काहींनी पुस्तकाला दोस्त बनवून चक्क आत्मचरित्र वाचून स्वत:ला अधिक खंबीर बनविण्यासाठी प्रयत्न केलाय. कोविडच्या या संकटकाळात आपले छंद जोपासूनही काहींनी तणावापासून मुक्ती मिळविण्याचा प्रयत्न केला आहे.

प्रगती जाधव-पाटील