शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

प्रेमसंबंधातून युवकाची मुचंडीमध्ये आत्महत्या

By admin | Updated: May 22, 2016 00:32 IST

रावळगुंडवाडीत खळबळ : लग्नाला विरोध

जत : तालुक्यातील रावळगुंडवाडी येथील राघवेंद्र चन्नाप्पा हिरगोंड (वय २०) याने प्रेमसंबंधातून मुचंडी (ता. जत) येथील वन विभागात झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना शनिवारी सकाळी आठच्या दरम्यान घडली. या घटनेमुळे रावळगुंडवाडी गावात खळबळ माजली आहे. राघवेंद्र हिरगोंड शेतमजूर होता. त्याचे मेंढेगिरी येथील एका सतरा वर्षाच्या दहावीत शिक्षण घेत असलेल्या मुलीसोबत मागील दोन वर्षापासून प्रेमसंबंध होते. एक-दोन महिन्यांपासून या प्रेमप्रकरणाची माहिती दोघांच्या घरातील लोकांना झाली होती. त्यांनी या प्रेमप्रकरणाला विरोध केला. त्यानंतरही या प्रेमीयुगुलाने घरात लग्नाचा प्रस्ताव ठेवला. त्यालाही नातेवाईकांनी विरोध केला. त्यामुळे राघवेंद्र नाराज होता. शुक्रवार, दि. २० रोजी सकाळी राघवेंद्रच्या प्रेयसीने जत पोलिस ठाण्यात समक्ष येऊन ‘आपले राघवेंद्रवर प्रेम असून, माझे वय १८ वर्षे पूर्ण झाल्यानंतर आम्ही दोघे लग्न करणार आहोत’, अशा आशयाचा लेखी अर्ज दिला. याची माहिती तिच्या नातेवाईकांना समजल्यानंतर त्यांनी तिला मारहाण केली. मारहाण केल्याची माहिती तिने राघवेंद्रला मोबाईलवरून सांगितली. त्यानंतर संबंधित मुलीचे नातेवाईक शुक्रवारी सायंकाळपासून राघवेंद्रचा शोध घेत होते. त्यामुळे राघवेंद्र दडपणाखाली होता. शनिवारी सकाळी सातच्यादरम्यान राघवेंद्र घरातून आंघोळ करून बाहेर पडला. त्यानंतर तो मुचंडी येथे वन विभागाच्या जागेत आला. आपण आत्महत्या करणार असल्याची माहिती त्याने स्वत: घरी मोबाईलवरून सांगितली. त्यानंतर झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. त्याचे नातेवाईक तेथे पोहोचेपर्यंत तो मृत झाला होता. याप्रकरणी पोलिस पाटील रोहिदास शिवशरण यांनी जत पोलिसात फिर्याद दिली आहे.