शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
6
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
7
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
8
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
9
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
10
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
11
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
12
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
13
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
14
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
15
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
16
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
17
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
18
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
19
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
20
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
Daily Top 2Weekly Top 5

प्राध्यापकाची रस्त्याजवळ आत्महत्या

By admin | Updated: July 30, 2014 23:17 IST

झाडाला गळफास : कौटुंबिक वादातून घटना घडल्याचा संशय

सातारा : माढा तालुक्यातील कुर्डुवाडी येथे प्राध्यापक म्हणून काम करत असलेले गजानन नानासाहेब काटकर (वय ४० मूळ रा. कुकुडवाड, ता. माण सध्या रा. शाहूनगर, सातारा) यांनी आज (बुधवारी) सकाळी येथील जिल्हा परिषदेसमोरील एका झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे उघडकीस आले. भर रस्त्याच्याकडेला प्रा. काटकर यांनी आत्महत्या केल्याने शहरात खळबळ उडाली.पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, सातारा हॉस्पिटलच्या आवारामधील झाडाला एका व्यक्तीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे सकाळी काही नागरिकांच्या निदर्शनास आले. भर रस्त्याच्याकडेला आत्महत्या केल्याने बघ्यांची प्रचंड गर्दी झाली. डॉ. विकास जाधव यांनी शहर पोलीस ठाण्यात या घटनेची माहिती दिल्यानंतर पोलीस घटनास्थळी तत्काळ पोहोचले. झाडाखाली प्लास्टिकची पिशवी होती. त्या पिशवीत चिठ्ठी सापडली. त्या चिठ्ठीवरून गजानन काटकर यांची ओळख पटली. पोलिसांनी त्यांच्या भावाला बोलावून घेतले. काटकर हे माढा तालुक्यामधील एका कॉलेजवर प्राध्यापक म्हणून काम करत होते. त्यांची पत्नी उंब्रज येथील शाळेवर शिक्षिका आहे.साताऱ्यात त्यांनी घर घेतले आहे. सुटीच्या दिवशी ते साताऱ्यात येत होते. ‘मला तुझ्याशी बोलायचे आहे, तू साताऱ्यात ये,’ असे काटकर यांनी त्यांच्या भावाला मंगळवारी फोन करून सांगितले होते. बुधवारी सकाळी ते साताऱ्याला यायला निघाले. मात्र वाटेतच त्यांना भावाने आत्महत्या केल्याचे समजले. काटकर यांनी आत्महत्या केल्याचे समजताच त्यांच्या पत्नीला जबर मानसिक धक्का बसला. त्यांना नातेवाइकांनी तत्काळ जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले. या प्रकाराची शहर पोलीस ठाण्यात नोंद झाली आहे. (प्रतिनिधी)चिठ्ठी उलगडणार रहस्य !गजानन काटकर यांनी आत्महत्या करण्यापूर्वी चिठ्ठी लिहिली आहे. कौटुंबिक वादातून त्यांनी आत्महत्या केली असावी, अशी शक्यता पोलिसांनी वर्तविली. चिठ्ठीत दोन व्यक्तींच्या नावाचा उल्लेख केला असून, चिठ्ठी काटकर यांनीच लिहिली आहे का? याची शहानिशा झाल्यानंतर संबंधितावर गुन्हा दाखल केला जाईल, असे एका अधिकाऱ्याने सांगितले.