शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पाकला स्पष्ट शब्दांत ठणकावले; पाहा, भाषणातील ५६ महत्त्वाचे मुद्दे
2
आजचे राशीभविष्य १३ मे २०२५ : या राशींना आर्थिक लाभ, कसा असेल तुमचा आजचा दिवस...
3
एअर मार्शल भारती म्हणाले, “भय बिनु होइ न प्रीति, कोणत्याही आव्हानांचा मुकाबला करण्यास सज्ज”
4
१९७१नंतर प्रथमच पाकला मोठा दणका; ५२हून अधिक वायुसैनिकांचा मृत्यू; १२ एअरबेसवर भारताचे हल्ले
5
‘हे’ तीन दहशतवादी हवेत, मगच थांबेल काश्मीरचा दहशतवाद; भारताची पाककडे सातत्याने मागणी
6
धास्ती: सीमावर्ती गावांत अद्याप शेकडो जिवंत बॉम्ब, ६ ठिकाणी केले निष्क्रिय; नागरिक परतले घरी
7
जे होते ‘ऑपरेशन सिंदूर’चा चेहरा त्यांचे ट्रोलिंग; मिस्रींच्या मुलीची वैयक्तिक माहिती लीक
8
युद्ध झालेलेच नाही, तेव्हा शस्त्रसंधीचा प्रश्नच नाही; भारत-पाकच्या राजनैतिकांनाच श्रेय
9
३२ विमानतळ पुन्हा सुरू करण्याची तयारी; भारत-पाकिस्तान संघर्षामुळे विमान उड्डाणे होती बंद
10
पाकच्या ताब्यातील जवानाच्या पत्नीशी संवाद; सुटकेसाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन, फोनवर चर्चा
11
संरक्षण दलांना राज्यात सर्वतोपरी मदत: मुख्यमंत्री; तिन्ही दलांच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक
12
‘ऑपरेशन सिंदूर’नंतर सायबर हल्ल्यांचा आकडा १५ लाखांवर; फक्त १५० यशस्वी, सायबर विभागाचा तपास
13
दहावीचा निकाल आज... मित्रांनो, मनासारखे नाही झाले, तरी हार मानू नका 
14
मराठवाडा, उत्तर महाराष्ट्राला अवकाळीचा तडाखा; पिकांनी टाकल्या माना, शेतकऱ्यांचे मोठे नुकसान
15
घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतील जखमी म्हणतात, आजही तेथून जाताना हृदयात चर्रर्र होतं
16
नवीन होर्डिंग धोरण वर्षभरानंतरही कागदावरच! घाटकोपर दुर्घटनेला वर्ष होऊनही महापालिका गप्पच
17
शाहरुख खानच्या ‘त्या’ कर्मचाऱ्याच्या कुटुंबाला ६२ लाखांची भरपाई योग्यच; हायकोर्टाचे आदेश
18
आंतरराष्ट्रीय सीमेवर संशयित ड्रोन दिसले, अनेक ठिकाणी ब्लॅकआऊट केले; ‘त्या’ ४ तासांत काय घडले?
19
डोनाल्ड ट्रम्प यांचा ‘तो’ दावा फेटाळला; भारताने स्पष्टच सांगितले, “चर्चेत ते मुद्दे नव्हते”
20
“भारत-पाकने युद्धविराम केला नाही, तर व्यापार नाही, आम्ही अण्वस्त्रांचे युद्ध रोखले”: ट्रम्प

मजुरांकडून ऊस तोडणीचा घोडेबाजार !

By admin | Updated: May 11, 2015 23:26 IST

शेतकऱ्यांची अडवणूक : चिपाड झालेला ऊस तोडण्यासाठी उकळले जातायत पैसे; एकरी तीन ते चार हजारांचा भुर्दंड

कार्वे : कऱ्हाड तालुक्यातील शिवारात ठिकठिकाणी अद्यापही ऊस उभा आहे. उसाला तोड मिळविण्यासाठी शेतकरी धडपडत आहेत. मात्र, मजुरांनी शेतकऱ्यांना अक्षरश: जेरीस आणले आहे. ऊस तोडणीसाठी कारखान्याचे मजूर शेतकऱ्यांकडून पैसे उकळत असल्याने ‘तोड नको; पण मजुरांना आवरा,’ असे म्हणण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे.तालुक्यातील कारखान्यांचा गळीत हंगाम अंतिम टप्प्यात आला आहे. मात्र, कार्वेसह परिसरातील शिवारात अद्यापही ऊस उभा असल्याचे दिसते. मध्यंतरी झालेला पाऊस व मजुरांचा तुटवडा यामुळे ऊसतोडणी रखडल्या आहेत. काही शेतकऱ्यांनी कारखान्याच्या ऊसतोडणीची वाट न पाहता गुऱ्हाळांना ऊस घातला आहे. कोणत्याही पद्धतीने लवकर उसाला तोड मिळावी व शेत मोकळे व्हावे, यासाठी शेतकऱ्यांची धडपड सुरू असते. सध्याही शेतकरी त्यासाठीच धावपळ करीत आहेत. अशातच दोन दिवसांपूर्वी पुन्हा वळवाचा तडाखा बसला. वादळी वाऱ्यामुळे उर्वरित उसाचे फड भुईसपाट झाले आहेत. परिणामी, ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. काहीही करून उसाला लवकर तोड मिळावी, व मशागतीसाठी शेत लवकरात लवकर मोकळे व्हावे, असे शेतकऱ्यांना वाटत आहे. त्यामुळे ते कारखान्यांच्या गट कार्यालयात हेलपाटे मारत आहेत. मात्र, मजुरांच्या टोळ्या कमी असल्याने शेतकऱ्यांना फक्त तारखा दिल्या जात आहेत. त्यामुळे शेतकरी अक्षरश: धायकुतीला आले आहेत.काही दिवसांपासून ऊसतोड मजुरांनी शेतकऱ्यांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न चालविला आहे. एखाद्या शेतकऱ्याच्या उसाला तोड मिळालीच तरी त्याला सुरुवातीला मजुरांची फर्माईश पूर्ण करावी लागत आहे. मजूर शेतकऱ्यांकडून पैसे उकळत आहेत. बैलगाडीस २०० ते ४०० रुपये तर ट्रॅक्टरला प्रतिटन १०० ते २०० असा मजुरांनी दर ठरविला आहे. शेतकऱ्याकडून पैसे घेतल्याशिवाय उसाला कोयता लावणार नसल्याची मजुरांची अडेलतट्टू भूमिका असते. अगोदरच उसाचे चिपाड झाल्याने शेतकरी नुकसानीत आहेत. त्यातच या चिपाडाची तोड करण्यासाठी मजूर पैसे मागत असल्याने शेतकऱ्यांना ‘इकडे आड अन् तिकडे विहीर’ अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. नाईलाजास्तव मजुरांची ही मागणी शेतकऱ्यांना पूर्ण करावी लागत आहे. त्यामुळे शेतकऱ्याला प्रतिएकरी तीन ते चार हजारांचा आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे.शेतकऱ्यांना कारखान्याकडून प्रतिटनास १ हजार ९०० रुपये पहिली उचल दिली जाते. ते पैसे एका महिन्यांनी मिळतात. मात्र, तोडणी मजूर शेतकऱ्यांकडून पैसे उकळून शेतकऱ्यांना वेठीस धरीत आहेत. या गंभीर बाबीचा कारखान्याने विचार करणे गरजेचे आहे. शेतकऱ्यांची पिळवणूक थांबवावी, अशी मागणी केली जात आहे. (वार्ताहर) उसाच्या फडाला आधी काडी, मग तोडउन्हाच्या तडाख्यामुळे शिवारातील उरलेले सर्वच ऊसक्षेत्र वाळले आहे. चिपाड झालेल्या उसाचे वाढेही वैरणीयोग्य राहिलेले नाही. तसेच पाला वाळल्याने फडात मोठी अडचण निर्माण झाली आहे. परिणामी, काही शेतकरी स्वत:च ऊस पेटवून देत आहेत. जळीत ऊस कारखान्याकडून अग्रक्रमाने तोडला जातो. त्यामुळे काही शेतकरी ही क्लृप्ती लढवतात. तर काही ठिकाणी ऊसतोड मजूरच तोडणी सोपी व्हावी म्हणून आधी काडी टाकून; मगच उसाला कोयता लावत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होत आहे.यावर्षी उसाने शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आणले आहे. कालावधी उलटून गेला तरी तोडी मिळालेल्या नाहीत. त्यामुळे कोणत्याही मार्गाने उसाची तोड करून घेऊन शेत रिकामे करण्यासाठी शेतकरी धडपडत आहेत. याचाच गैरफायदा ऊसतोडणी मजूर घेत आहेत. - माणिकराव थोरात, शेतकरी, कार्वे