सातारा : साताऱ्यासह परिसरात सोमवारी पहाटेपासून दिवसभर ढगाळ वातावरण होते. त्यातच दुपारी साडेबाराच्या सुमारास सुमारे अर्धा तास रिमझिम पावसाने हजेरी लावली. यामुळे सातारकरांची चांगलीच पळापळ झाली. दरम्यान, फलटण तालुक्यातील आदर्की परिसरात रविवारी सायंकाळी पाऊस झाला होता.
साताऱ्यात गेल्या काही दिवसांपासून सातत्याने वातावरणात बदलत होत आहे. गेल्या आठवड्यात कडाक्याची थंडी पडली होती, तर गेले दोन दिवस थंडी गायब झाली. परिसरात सोमवारी पहाटेपासून ढगाळ वातावरण तयार झाले होते. मात्र गार वारे वाहत असल्याने गारठा पडला होता. त्यामुळे सातारकर गारठले होते. त्यातूनही काहीजण नोकरी, व्यवसायानिमित्ताने घरातून बाहेर पडले. मात्र दुपारी अचानक पावसाला सुरुवात झाली. त्यामुळे चांगलीच पळापळ झाली. मकरसंक्रांत काही दिवसांवर आलेली असल्याने साताऱ्यातील बाजारपेठेत असंख्य विक्रेते वाणाच्या वस्तू विक्रीसाठी बसले आहेत. त्यांचीही पावसामुळे पळापळ झाली.
०४सातारा-रेन
साताऱ्यात सोमवारी दुपारी अचानक पावसाने हजेरी लावल्याने सातारकरांची चांगली पळापळ झाली. (छाया : जावेद खान)