शहरं
Join us  
Trending Stories
1
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
2
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
3
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
4
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
5
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
6
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
7
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
8
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
9
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
10
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
11
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
12
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
13
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
14
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
15
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
16
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
17
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
18
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
19
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
20
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला पदार्पणाची संधी मिळणार?
Daily Top 2Weekly Top 5

दफनविधीच्या कारणावरून तणाव

By admin | Updated: June 10, 2016 00:13 IST

मलकापुरात पोलिस बंदोबस्त : जागेवरून वाद; पाहणी करण्याच्या प्रांताधिकाऱ्यांकडून सूचना

कऱ्हाड : मलकापूर येथील बिरोबा मंदिराची सेवा करणाऱ्या पुजाऱ्यांचे मंगळवारी निधन झाल्यानंतर मंदिर परिसरात पार्थिवाचा दफनविधी करण्याच्या कारणावरून तणाव निर्माण झाला. कृष्णा ट्रस्टने संबंधित जागेत विधी करण्यास विरोध दर्शविल्याने धनगर समाज आक्रमक झाला होता. अनुचित प्रकार घडू नये यासाठी त्याठिकाणी पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.मलकापूर येथे कृष्णा चॅरिटेबल ट्रस्टच्या आवारात २० गुंठे जागेमध्ये बिरोबा मंदिर असून, मंदिराची सेवा करणाऱ्या पुजाऱ्यांचे निधन झाल्यानंतर त्यांचे पार्थिव याच जागेत दफन करण्याची परंपरा आहे. मंगळवारी जखिणवाडी येथील तातोबा येडगे (वय ६५) या पुजाऱ्यांचे निधन झाले. त्यामुळे परंपरेनुसार त्यांचे पार्थिव मंदिराच्या आवारातील जागेत दफन करण्याचा निर्णय धनगर समाजाने घेतला. मात्र, कृष्णा ट्रस्टच्या व्यवस्थापनाने त्यांना विरोध केला. या विरोधामुळे नागरिकांनी आक्रमक पवित्रा घेतला.प्रांताधिकारी किशोर पवार यांची भेट घेतली. याबाबत प्रांताधिकाऱ्यांनी तहसीलदार व मंडलाधिकाऱ्यांना संबंधित जागेची पाहणी करून अहवाल देण्याच्या सूचना दिल्या. दुपारी साडेतीन वाजता मंडलाधिकाऱ्यांनी जागेची पाहणी केली. सायंकाळपर्यंत धनगर समाजाचे नागरिक मंदिर परिसरात निर्णयाची वाट पाहत होते. मात्र, कोणताच निर्णय न झाल्याने संतप्त झालेल्या जमावाने प्रशासनाला दहा मिनिटांचा वेळ देऊन निर्णय न झाल्यास पार्थिव मंदिर परिसरात आणून दफन करण्याचा इशारा दिला. त्यानुसार जमाव पार्थिव आणण्यासाठी जखिणवाडीकडे गेला. याच कालावधीत कृष्णा ट्रस्टच्या व्यवस्थापनाची बैठक होऊन सायंकाळी प्रशासनाने समाजातील लोकांना फोनवरून तोंडी परवानगी दिली. त्यामुळे तणाव निवळला. अनुचित प्रकार घडू नये यासाठी वरिष्ठ पोलिस निरीक्षक विकास धस, सहायक निरीक्षक एच. एन. काकंडकी यांच्यासह अधिकारी व कर्मचारी मंदिर परिसरात तैनात होते. (प्रतिनिधी)