कऱ्हाड : काँग्रेस पक्षाच्या १३० व्या स्थापना दिनानिमित्त माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते आमदार आनंदराव पाटील यांच्या शनिवार पेठ, सुपर मार्केट येथील कार्यालयात काँग्रेस पक्षाच्या सभासद नोंदणीचा प्रारंभ करण्यात आला़ यावेळी प्रांतिक प्रतिनिधी हिंदुराव पाटील, अॅड़ विजयराव कणसे, धैर्यशील कदम, कऱ्हाड उत्तर अध्यक्ष अविनाश नलवडे, जिल्हा सरचिटणीस सतीश भोसले, अविनाश फाळके, अन्वर पाशा खान, कऱ्हाड शहराध्यक्ष प्रदीप जाधव, कऱ्हाड दक्षिण अध्यक्ष राजेंद्र चव्हाण, माजी नगरसेवक अशोकराव पाटील, ग्राहक संरक्षण सेलचे अध्यक्ष बाळासाहेब प्रभुणे, जिल्हा परिषद विरोधी पक्षनेते जयवंत ऊर्फ बंडानाना जगताप, बाजार समितीचे संचालक प्रकाश पाटील, जिल्हा परिषद सदस्या विद्या थोरवडे, विरोधी पक्षनेत्या स्मिता हुलवान, अरुणा पालकर, अलीभाई मांगलेकर, मोहनराव शिंदे, हरीष जोशी, भीमराव सूर्यवंशी नगरसेवक बाळासाहेब यादव, बाळासाहेब आलेकरी उपस्थित होते. काँगे्रसने देशात आणि राज्यात अनेक लोकहिताचे निर्णय घेतले असल्याने पक्षसंघटना बळकट करण्याचे आवाहन माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केले.सुनील पाटील यांनी सूत्रसंचालन केले़ शहराध्यक्ष प्रदीप जाधव यांनी आभार मानले़ (प्रतिनिधी)
काँग्रेस पक्ष बळकट करा : चव्हाण
By admin | Updated: January 2, 2015 00:22 IST