शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
2
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
3
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
4
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
5
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
6
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
7
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
8
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
9
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
10
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
11
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
12
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
13
आशा भोसलेंचे कधीच न पाहिलेले दुर्मिळ फोटो; आर.डी. बर्मन ते लता दीदींसोबतचे खास क्षण, प्रत्येक फोटोमागे भन्नाट किस्सा
14
मुंबई इंडियन्सनं 'टाईमपास' केला; Hardik Pandya ला १२ लाखांचा फटका; Tim David लाही शिक्षा
15
Asha Bhosale: सूरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन, दिग्गज गायकांनी गाणं गाऊन दिली अखेरची स्वरांजली
16
होर्मुझ सामुद्रधुनीवर ब्रिटन-फ्रान्सचा 'बिग प्लॅन'; ४० देशांना एकत्र आणणार, ट्रम्प यांना डच्चू
17
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
18
Rohit Sharma Injury : मुंबई इंडियन्ससाठी वाजली धोक्याची घंटा; रोहित शर्मा पुढच्या सामन्याला मुकणार?
19
सिंगल चार्जवर ३२० KM रेंज...किंमत फक्त ₹१.२९ लाख! Ola ची नवीन EV स्कूटर लॉन्च
20
बालेन शाह यांनी PM मोदींना भेटण्यासाठी ठेवली अट; नेपाळ-भारत संबंध पुन्हा सुधारणार
Daily Top 2Weekly Top 5

स्वार्थी टोळ्यांना निवडणुकीत रोखा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2021 04:27 IST

कऱ्हाड : ‘ज्येष्ठ नेते यशवंतराव मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली पंधरा वर्षे कारखान्यात सभासद हिताच्या अनेक गोष्टी घडल्या. त्यांनी विचार आणि ...

कऱ्हाड : ‘ज्येष्ठ नेते यशवंतराव मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली पंधरा वर्षे कारखान्यात सभासद हिताच्या अनेक गोष्टी घडल्या. त्यांनी विचार आणि कृतीची सांगड घालून कारखाना व सभासद विकासाची विशिष्ट उंची निर्माण केली. असाच विकास त्यांच्या मार्गदर्शनाखाली कारखान्याच्या स्थापनेनंतर झाला. त्या विकासामध्ये स्वार्थाची बुद्धी बळावल्याने विकासाची प्रक्रिया थांबली. विकासाची बेटे विकेंद्रित न होता ती स्वकेंद्रित झाली. त्यामुळे खासगीकरणाचा विचार यापुढे का होणार नाही? असे सांगून स्वार्थी टोळ्यांना या निवडणुकीत रोखा’, असे आवाहन यशवंतराव मोहिते रयत पॅनलचे प्रमुख डॉ. इंद्रजित मोहिते यांनी केले.

यशवंतराव मोहिते रयत पॅनेलच्या प्रचार दौऱ्यात दुशेरे येथील बैठकीत ते बोलत होते. यावेळी सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.

डॉ. मोहिते म्हणाले, ‘समोरील दोन्ही पॅनलचे नेते व कार्यकर्ते कारखान्याकडे खाण्याचे कुरण म्हणून पाहतात. त्यांना सत्ता कधी मिळतेय व कधी एकदा स्वतःचे खिसे भरतोय, याचे स्वप्न ही मंडळी पाहत आहेत. एका पॅनलचे प्रमुख कारखान्यावर कधीतरी भेटतात, तर दुसऱ्या पॅनलचे नेते भेटले तर त्यांची बुद्धी असंविधानिक व्यक्ती चालवते. सभासदांनी याचा विचार करावा व आपले पवित्र मत रयत पॅनलला देऊन विकासाचा सुवर्ण काळ आणावा.’

फोटो ओळ

गोळेश्वर, ता. कऱ्हाड येथे रयत पॅनलच्या उमेदवारांनी सभासदांची थेट भेट घेत प्रचार केला.