शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

इको सेन्सिटिव्हबाबतचे ठराव तत्काळ थांबवा

By admin | Updated: February 20, 2015 23:13 IST

शिवेंद्रसिंहराजे भोसले : सातारा तालुका आमसभेत वनविभागाच्या अधिकाऱ्यांना सुनावले

सातारा : ‘वनविभागाने इको सेन्सिटिव्हमध्ये तालुक्यात येणाऱ्या गावांची आणि लोकप्रतिनिधींची स्वतंत्र बैठक घेतल्याशिवाय गावागावांतून सुरू असलेले ठराव घेण्याचे काम थांबावावे. जोपर्यंत बैठक होत नाही, तोपर्यंत विरोध राहील,’ असा सज्जड इशारा आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी आमसभेमध्ये दिला. सातारा पंचायत समितीच्या या आमसभा आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या अध्यक्षतेखाली दिवंगत अभयसिंहराजे भोसले सभागृहात शुक्रवारी झाली. जीवन प्राधिकरण, महावितरण, एस.टी. आणि वनविभागाच्या कामकाजावर लोकप्रतिनिधींनी सभेत ताशेरे ओढले. या विभागाच्या कामकाजाबाबत अनेक तक्रारी आल्या. सभेला पंचायत समितीच्या सभापती कविता चव्हाण, उपसभापती सूर्यकांत पडवळ, जिल्हा परिषद सदस्य राजू भोसले, किरण साबळे-पाटील, तहसीलदार राजेश चव्हाण, पंचायत समितीचे सदस्य आणि अधिकारी उपस्थित होते.वनविभागाच्या आढाव्यात वनक्षेत्रपालांनी आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांना काही गावांनी निधी स्वीकारण्यास नकार दिला आहे, त्याबाबत आपण सांगावे, असे आवाहन केले. त्यावर आमदारांनी जोपर्यंत तुम्ही इको सेन्सिटिव्हचे फायदे-तोटे काय आहेत, हे सांगत नाही. तोपर्यंत आमचा विरोध राहील. वनविभागाचे अधिकारी गावागावांत जाऊन ठराव करून घेत आहेत; परंतु त्याबाबत लोकप्रतिनिधींना काही सांगितले जात नाही. एवढेच काय इको सेन्सिटिव्हचे काय निकष आहेत? याची माहिती नाही. त्यामुळे प्रांताधिकारी, तहसीलदार आणि सातारा तालुक्यातील इको सेन्सिटिव्हमध्ये समावेश झालेल्या गावातील प्रतिनिधी, लोकप्रतिनिधी यांची लवकरात लवकर संयुक्त बैठक घ्यावी, तोपर्यंत ठराव घेण्याचे काम थांबवावे आणि जरी ठराव घेतली तरी बैठक होत नाही आणि संपूर्ण माहिती कळत नाही, तोपर्यंत विरोध राहील, असे स्पष्टपणे सांगितले. आमसभेस तालुक्यातील विविध गावांचे सरपंच, ग्रामसेवक, केंद्रप्रमुख, विस्तार अधिकारी, अधिकारी आणि कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. (प्रतिनिधी)अनेकांना छंद व्हॉट्स अ‍ॅपचा...सातारा : ‘वेडीच माणसे इतिहास घडवितात...वेडीच माणसे आधुनिक शोध लावतात,’ असं म्हटलं जातं; परंतु शोध लावणाऱ्या तसेच इतिहास घडविणाऱ्यांमध्ये मोजक्या मंडळींचाच समावेश असतो. तुम्ही आम्ही सर्वांनीच ठरवलं वेड पांघरायचं तर पेडगावला जाण्याशिवाय पर्याय उरत नसतो. कुणाला कशाचं वेड असावं, हे ज्याच्या-त्याच्या इच्छेचा प्रश्न. मात्र या वेडामुळे महत्त्वाच्या चर्चेतील गांभीर्यच निघून जात असेल तर त्याचा फायदा होण्यापेक्षा तोटाच होतो. शुक्रवारी सातारा पंचायत समितीच्या आमसभेतही अधिकारी तसेच काही नागरिकांचं ‘वायफाय’ वेड पाहायला मिळालं. सभा सुरू असताना ही ‘व्हॉट्स अ‍ॅप’ वेडी माणसं त्यांच्याच नादात असलेली पाहायला मिळाली.पंचायत समितीच्या सभागृहात आमदार शिवेंद्रसिंहराजे यांच्या अध्यक्षतेखाली आमसभा झाली. यावेळी अनेकांचे मोबाईल मध्येच खणखणत असताना पाहायला मिळाले. सभेत आमदार महत्त्वाच्या सूचना देत असताना काही अधिकारी व सभेला उपस्थित असलेले नागरिक मोबाईलवर खेळताना पाहायला मिळाले. या सभेत काही अधिकारी व नागरिक मोबाईलवर चॅटिंग करताना पाहायला मिळाले. या पामरांना सभेतील कामकाजाचे काही पडले नव्हते. स्मितहास्य करीत त्यांचे हे चॅटिंगचे वेड सुरूच होते. मात्र, यातून आमसभेचे गांभीर्यच त्यांना नसल्याचे यानिमित्ताने पुढे आले.मोबाईल नावाचं ‘पिल्लू’ सर्वच जण खिशामध्ये घेऊन वागवतात. व्हॉट्स अ‍ॅपमुळे हे पिल्लू वारंवार ‘टँवटँव’ करत असतं. सभेत बसलेल्या सर्वांचच लक्ष ते पिल्लू वारंवार वेधून घेतं. मोबाईलचा शोध लागण्यापूर्वीपासून आमसभा घेतली जाते. आमदारांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या सभेत महत्त्वाच्या विषयांवर चर्चा सुरू असते. सामान्य नागरिकही आपले प्रश्न उपस्थित करू शकतात. या सभेमध्ये खरंतर मोबाईलची गरजच काय? हा प्रश्न वारंवार उभा राहत आहे. (प्रतिनिधी)मोबाईल सायलेंटवर ठेवला तर...!सभेत महत्त्वाच्या बाबींवर चर्चा सुरू असते. या चर्चेमध्ये अधिकाऱ्यांसह नागरिकांचाही सहभाग असणे आवश्यक असते; परंतु मोबाईलमुळे या सभेत भलताच कल्ला होताना पाहायला मिळत आहे. अचानकपणे मोबाईलची रिंग वाजते आणि वातावरणातील गांभीर्यच निघून जाते. हा वाजणारा मोबाईल सर्वांचे लक्ष वेधून घेतो.