शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

‘राष्ट्रवादी युवक’चा महामार्गावर रास्ता रोको

By admin | Updated: October 8, 2015 00:58 IST

चिन्मय कुलकर्णी यांच्या आंदोलनास समर्थन : आंदोलकांवर पोलिसांकडून प्रतिबंधात्मक कारवाई

शिरवळ : पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गाचे काम घेतलेल्या रिलायन्स इन्फ्राला ‘ब्लॅक लिस्ट’मध्ये टाकण्यात यावे, यासह विविध मागण्यांसाठी उपोषणाला बसलेल्या चिन्मय कुलकर्णी यांना पाठिंबा देण्यासाठी राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने बुधवारी (दि. ७) पुणे-सातारा हद्दीवर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. यावेळी शिरवळ पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेत प्रतिबंधात्मक कारवाई करून सोडून दिले. दरम्यान, राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या या आंदोलनाचा फज्जा उडाल्याचे चित्र दिसून आले. आंदोलनाच्या ठिकाणी आंदोलक कमी व पोलीस जास्त, अशी स्थिती दिसून आली. पोलिसांनी आंदोलकांना महामार्गावरून अवघ्या पाच मिनिटांत उचलल्याने आंदोलन हे फक्त रास्ता रोकोचा प्रीमिअर शो ठरला असल्याची चर्चा आंदोलनस्थळी सुरू होती.राष्ट्रीय महामार्गाच्या निकृष्ट कामाबाबत व अपघाताची वाढती संख्या लक्षात घेऊन चिन्मय कुलकर्णी शिंदेवाडी येथे उपोषणाला बसले आहे. या आंदोलनाच्या समर्थनार्थ राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. नितीन भोसले, खंडाळा तालुकाध्यक्ष मनोज पवार, शिरवळ शहराध्यक्ष विशाल परखंदे यांच्या नेतृत्वाखाली शिदेंवाडी याठिकाणी रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात जवळेचे सरपंच अजय भोसले, राष्ट्रवादी युवक तालुका उपाध्यक्ष चंद्र्रकांत पाचे, रविराज दुधगावकर, हिम्मत सोनावणे, अय्याज पठाण, बाळासाहेब पानसरे, महेश चव्हाण, विजय सोनावणे, सागर जाधव, संकेत महांगरे, वैभव सोनावणे आदी कार्यकर्ते सहभागी झाले होते.दरम्यान, रास्ता रोको आंदोलनात आंदोलक कमी पोलीस जास्त, अशी स्थिती दिसल्याने फज्जा उडाला. आंदोलनस्थळी फलटणचे पोलीस उपविभागीय अधिकारी रमेश चोपडे, वाईचे पोलीस उपविभागीय अधिकारी दीपक हुंबरे, शिरवळ पोलीस निरीक्षक संभाजी म्हेत्रे यांच्या नेतृत्वाखाली सातारा येथील दंगा नियंत्रक पथक, वाहतूक नियंत्रक पथक, लोणंद, शिरवळ, खंडाळा, सातारा, वाई येथील फौजफाटा तैनात केला होता. (प्रतिनिधी)शिंदेवाडी, ता. खंडाळा येथे राष्ट्रीय महामार्गाच्या निकृष्ट कामाबाबत आमरण उपोषणासाठी बसलेल्या संकल्प इंजिनिअरिंग सांस्कृतिक सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष चिन्मय खंडोजी कुलकर्णी यांनी बुधवारी (दि. ७) सातव्या दिवशी आंदोलन स्थगित केले. रिलायन्स इन्फ्रा व राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणच्या अधिकाऱ्यांनी त्यांना मागण्यांबाबत लेखी आश्वासन दिल्याने बुधवारी सायंकाळी ७.३० च्या सुमारास प्रोजक्ट डायरेक्टर मदन दिवाण यांच्या हस्ते कुलकर्णी यांनी ज्यूस पिऊन उपोषण सोडले.राष्ट्रीय महामार्गाच्या निकृष्ट कामाबाबत चिन्मय कुलकर्णी व रिलायन्स इन्फ्रा व राष्ट्रीय महामार्गाच्या अधिकाऱ्यांची सुमारे एक तास चर्चा झाली. या चर्चेत कुलकर्णी यांच्या मागण्यांबाबत सकारात्मक चर्चा करण्यात आली. अधिकाऱ्यांनी मागण्यांबाबत उपाययोजना करण्याबात लेखी आश्वासन कुलकर्णी यांना दिले.यावेळी रिलायन्स इन्फ्राचे प्रोजेक्टर डायरेक्टर रतनप्रकाश, प्रोजक्ट टेक्निकल श्रीकांत पोतदार, रिलायन्सचे प्रोजेक्ट मॅनेजर ब्रिजेंद्र किशोर सिंग, अनुपम खेर, पोलीस निरीक्षक संभाजी म्हेत्रे, संकल्पचे कार्यकर्ते राघवेंद्र मिश्रा आदी उपस्थित होते.आंदोलक, पोलिसांत शब्दिक चकमकशिदेंवाडी येथे राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे कार्यकर्ते आंदोलनात मोठ्या संख्येने सहभागी होण्याची शक्यता गृहित धरून आंदोलनस्थळी कडेकोट पोेलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. मात्र, कार्यकर्ते कमी व पोलीस जास्त ही स्थिती दिसल्याने पोलिसांनीही सुटकेचा नि:श्वास टाकला. यावेळी आंदोलन सुरू झाल्यानंतर अवघ्या पाच मिनिटांतच पोलिसांनी आंदोलकाना महामार्गावरून बाजूला घेत ताब्यात घेतले. जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. नितीन भोसले यांची पोलीस अधिकाऱ्यांसोबत शाब्दिक चकमक उडाली.पोलीस फौजफाटाआंदोलनस्थळी दंगा नियंत्रक पथक, वाहतूक नियंत्रक पथक, लोणंद, शिरवळ, खंडाळा, सातारा, वाई येथील पोलीस फौजफाटा तैनात करण्यात आला होता.