शहरं
Join us  
Trending Stories
1
शिंदे गटाचे नेते तानाजी सावंत यांची प्रकृती बिघडली; रुग्णालयात दाखल, ICUमध्ये उपचार सुरू
2
मुंबईत दीड कोटी अमराठी, त्यांच्याशी‌ बोलताना हिंदी हवी की नको; चंद्रकांत पाटील यांचं विधान
3
“उद्या दुपारी १२ वाजता या, अंतरवाली सराटीतील शेवटची बैठक”; जरांगेंचे मराठा समाजाला आवाहन
4
ENG W vs IND W : स्मृतीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाचा मोठा विजय; इंग्लंडवर ओढावली नामुष्की
5
"पृथ्वीवर कोणत्याही सीमा दिसत नाहीत, आपण सर्व एक आहोत"; पंतप्रधान मोदींनी साधला शुभांशू शुक्लांशी संवाद
6
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी भाजपाची तयारी सुरू; वॉर्डनिहाय आढावा घेणार, संचलन समितीची घोषणा
7
स्मृती मानधनानं पहिल्या टी-20I सेंच्युरीसह रचला इतिहास, असा पराक्रम करणारी ती पहिलीच
8
एअर इंडियाच्या विमानात बसला, दारू प्यायला अन् महिला कर्मचाऱ्यासोबत... ; लँडिंग होताच प्रवासी पोलिसांच्या ताब्यात!
9
"उत्तर भारतीयांना तमिळ शिकायला सांगा"; हिंदी शत्रू नाही म्हणणाऱ्या अमित शाहांना कनिमोळींचे प्रत्युत्तर
10
भारताचा बांगलादेशला मोठा झटका, 'या' गोष्टीवर घातली बंदी! का घेतला मोठा निर्णय?
11
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
12
आता आणखी कोण? काँग्रेसचा मोठ्या पदावरील बडा नेता भाजपात जाणार? निवडणुकीपूर्वी धक्का बसायची चिन्हे
13
पैसे तयार ठेवा! लवकरच येणार Meesho चा IPO, काय आहे कंपनीचा प्लान? पाहा डिटेल्स 
14
मुंबईचे डबेवाले एक दिवसाच्या सुट्टीवर जाणार! काय आहे कारण? जाणून घ्या...
15
“तुमचा वाईट पद्धतीने पराभव केला, तुम्ही आता नरकात...”; ट्रम्प यांचा खामेनी यांच्यावर प्रहार
16
“काँग्रेसचा विचार संपवू शकत नाही, वहिनींना पक्षात घेऊन...”; विशाल पाटलांची भाजपावर टीका
17
मालव्य राजयोगाने जूनची सांगता: ८ राशींना मालामाल होण्याची संधी, यश-पैसा-लाभ; जुलै शुभच ठरेल!
18
महायुती सरकारमध्ये मतभेद! पाचवीपर्यंत हिंदी नको, अजित पवार गटाने मांडली पक्षाची भूमिका
19
पाणी अंगावर उडाले म्हणून कोयता घेऊन धावला; छत्रपती संभाजीनगरात नशेखोराचा धुमाकूळ
20
Shefali Jariwala Funeral: शेफालीच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार, पती पराग त्यागीची रडून वाईट अवस्था, भावुक करणारा व्हिडिओ

पोटाच्या खळगीनं ‘त्याला’ दाखवला कामाचा मार्ग!

By admin | Updated: August 14, 2014 22:37 IST

सातारा पालिका : मनोरुग्ण करतोय मनापासून काम

सातारा : पालिकेचे राजवाड्यावरील जुन्या अग्निशामक कार्यालय ते मोती तळ्याजवळील नवीन अग्निशामक कार्यालयातील कार्यालयीन नोंदवहीची कामे चक्क मनोरुग्ण व्यक्ती करत आहे. एखाद्या नवख्याने हा प्रकार पाहिला तर तो कार्यालयातून नोंदवही पळवत आहे काय?, असाच प्रश्न पडतो; परंतु हा मनोरुग्ण पोटाची खळगी भरण्यासाठी या नोंदवहीची देवाणघेवाण करत आहे.राजवाड्यावर पालिकेचे जुने अग्निशमनदलाचे कार्यालय व नवीन कार्यालय जवळपास २00 मिटरचे अंतर आहे. या कार्यालयात नोंदवही तसेच इतर स्टेशनरी साहित्यांची देवाणघेवाण या दोन्ही कार्यालयांतून होते. चक्क एक मनोरुग्ण हे काम करत आहे. संबंधित मनोरुग्ण व्यक्ती कुणाशी बोलत नाही. तो एका कार्यालयातून चालत सरळ जातो व दुसऱ्या कार्यालयात जातो. मनात आले तरच काम करतो. या कामासाठी त्याला अनेकजण जेवायला काही पैसे देतात. राजवाडा चौपाटीवर खाऊन पुन्हा तो आपल्या कामाला लागतो. कोणत्याही दिवशी हा व्यक्ती याठिकाणी येतो व ही कामे व्यवस्थित पार पाडतो. दरम्यान, मनोरुग्ण व्यक्ती हे शांतपणाने एकाच कामात मग्न असतात; परंतु एखादी गोष्ट त्यांच्या मनाविरुध्द झाली तर त्याचा नेहमीच्या कामातही अडथळा निर्माण होतो. (प्रतिनिधी)कष्टाशिवाय पोटाला काही मिळूच शकत नाही. याची साक्षच जणू त्याला पटली असल्यानं तो हे काम करतो. या कामातून त्याला चार पैसे मिळतात अन पोटाची खळगी भरतात.