शहरं
Join us  
Trending Stories
1
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
2
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
4
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
5
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
6
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
7
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
8
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
9
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
10
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
11
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया
12
पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवशी राहुल गांधींने पाठवले 'विशेष' पत्र; केली एक खास मागणी
13
"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं
14
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर
15
ह्युंदाईच्या या SUV ची किंमत ₹6 लाखही नव्हती, नव्या GST नंतर ₹86156 नं स्वस्त झाली; वरून ₹50000 चा डिस्काउंटही!
16
"क्लेमोर, वायर, पावडर... सगळं तयार होतं !" गुप्त माहितीने गडचिरोली पोलिसांनी रोखला भीषण कट
17
पाक आशिया कप स्पर्धेतून Out? सामान बसमध्ये अन् पाक खेळाडू हॉटेलमध्ये! नेमकं काय घडलं?
18
वाघाला घोरताना कधी पाहिलंय? VIDEO पाहून नेटकरी म्हणतायत, "हे तर आमच्या बाबांसारखेच..."
19
नवरात्रीचा मुहूर्त? पंतप्रधान मोदी नव्या ठिकाणाहून कामकाज पाहणार; PMOचा पत्ता बदलणार
20
प्रसिद्धीचा मुद्दा, अजितदादांचा फडणवीसांकडे रोख;  म्हणाले, “जाहिरात करावी तर देवाभाऊंसारखी”

राज्यातील ५१ गडकोट होणार ‘राज्य संरक्षित स्मारक’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2019 01:00 IST

सातारा : जिल्ह्यातील ऐतिहासिक वारसा समृद्ध करण्यासाठी गडसंवर्धन समिती आणि पुरातत्त्व विभागाच्या समन्वयाने महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले आहे. त्यानुसार ...

सातारा : जिल्ह्यातील ऐतिहासिक वारसा समृद्ध करण्यासाठी गडसंवर्धन समिती आणि पुरातत्त्व विभागाच्या समन्वयाने महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले आहे. त्यानुसार राज्यातील ५१, तर जिल्ह्यातील १५ गडकोटांना ‘राज्य संरक्षित स्मारक’ म्हणून घोषित करण्यात येणार असून, याबाबतची प्रक्रियाही गतिमान झाली आहे.साताऱ्यात मंदिरे, गडकोट, इमारती, स्मारके यांसह विविध वास्तू आजही इतिहासाची साक्ष देत उभे आहेत; परंतु जाज्वल्य पराक्रमाचे साक्षीदार असलेले जिल्ह्यातील बहुतांश गड, किल्ले संवर्धनाअभावी अखेरची घटका मोजत आहेत.गेली अनेक वर्षे देखभाल, दुरुस्तीच्या प्रतीक्षेत असलेल्या या गडकोटांना आता नवसंजीवनी मिळणार आहे. जागतिक वारसा दिनाचे औचित्य साधून गडसंवर्धन समिती आणि पुरातत्त्व विभाग यांच्या समन्वयाने गडकोटांचे संवर्धन करण्यासाठी महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले आहे. त्यानुसार राज्यातील ८३ किल्ल्यांची यादी जाहीर करण्यात आली असून, यापैकी ५१ गडकोटांना राज्य संरक्षित स्मारक म्हणून घोषित केले जाणार आहे. या ५१ गडकोटांमध्ये सातारा जिल्ह्यातील १५ गटकोटांचा समावेश आहे. साताºयासह पुणे, नगर, नाशिक, ठाणे, रत्नागिरी, रायगड, सांगली, कोल्हापूर, औरंगाबाद आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांतील गडकोटांचाही यामध्ये समावेश आहे. या निर्णयामुळे उपेक्षित गडकोटांच्या जतन-संवर्धनाचा मार्ग सुकर होणार असून, याबातची प्रक्रियाही गतिमान झाली आहे.संरक्षित स्मारक म्हणजे काय?महाराष्ट्र शासनाच्या पुरातत्त्व विभागामार्फत सांस्कृतिक वारसा जतन करण्यासाठी काही महाराष्ट्रातील काही ऐतिहासिक वास्तू, इमारती, स्मारके, जागा संरक्षित केल्या जातात. अशा ठिकाणांना राज्य संरक्षित स्मारके म्हटले जाते. या ठिकाणांची देखभाल आणि संरक्षणाचे काम राज्य शासनाच्या पुरातत्त्व विभागामार्फत केले जाते. संरक्षित स्मारकांना हानी होऊ नये, यासाठी ऐतिहासिक वास्तू व स्मारके जतन कायदा लागू करण्यात आला आहे. या कायद्यानुसार आता गटकोटांवर अतिक्रमण करणाऱ्यांवर व हानी पोहोचविणाºयांवर चाप बसणार आहे.या किल्ल्यांचा समावेशचंदन-वंदन, वैराटगड, पांडवगड, अजिंक्यतारा, वारुगड, संतोषगड, भूषणगड, वर्धनगड, वसंतगड, दातेगड, कमळगड, वासोटा, नांदगिरी, केंजळगड, भैरवगड.