शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
2
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
3
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
4
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
5
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
6
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
7
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
8
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
9
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
10
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
11
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
12
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
13
आशा भोसलेंचे कधीच न पाहिलेले दुर्मिळ फोटो; आर.डी. बर्मन ते लता दीदींसोबतचे खास क्षण, प्रत्येक फोटोमागे भन्नाट किस्सा
14
मुंबई इंडियन्सनं 'टाईमपास' केला; Hardik Pandya ला १२ लाखांचा फटका; Tim David लाही शिक्षा
15
Asha Bhosale: सूरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन, दिग्गज गायकांनी गाणं गाऊन दिली अखेरची स्वरांजली
16
होर्मुझ सामुद्रधुनीवर ब्रिटन-फ्रान्सचा 'बिग प्लॅन'; ४० देशांना एकत्र आणणार, ट्रम्प यांना डच्चू
17
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
18
Rohit Sharma Injury : मुंबई इंडियन्ससाठी वाजली धोक्याची घंटा; रोहित शर्मा पुढच्या सामन्याला मुकणार?
19
सिंगल चार्जवर ३२० KM रेंज...किंमत फक्त ₹१.२९ लाख! Ola ची नवीन EV स्कूटर लॉन्च
20
बालेन शाह यांनी PM मोदींना भेटण्यासाठी ठेवली अट; नेपाळ-भारत संबंध पुन्हा सुधारणार
Daily Top 2Weekly Top 5

एसटी चालकास हातोड्याने मारहाण

By admin | Updated: January 21, 2015 23:56 IST

चालक जखमी : बँक कर्मचाऱ्यासह तिघांना अटक

परळी : राज्य परिवहन महामंडळाच्या सातारा-खडगांव या गाडीला पोगरवाडी फाट्याजवळ तिघांनी हातोड्यांनी मारहाण केली. ही घटना समजताच परळी तसेच परिसरातील जमावाने घटनास्थळी धाव घेऊन मारहाण करणाऱ्या तिघांना अटक केल्याशिवाय वाहतूक सुरू न करण्याचा निर्णय घेतला. तिघांना पोलिसांनी अटक केली. त्यानंतर त्यांची जामिनावर मुक्तताही झाली.या घटनेनंतर सातारा तालुका पोलीस ठाण्यात तिघांवर गुन्हा दाखल झाला आणि त्यांना अटक करण्यात आली. कृष्णत निकम, रामचंद्र बापू देशमुख आणि पवन रामचंद्र देशमुख अशी अटक झालेल्यांची नावे असून पिकअप चालक रामचंद्र आणि पवन पितापूत्र आहे तर निकम हा एका बँकेतील कर्मचारी असल्याचे समजते.याबाबत घटनास्थळ आणि सातारा तालुका पोलीस ठाण्यातून मिळालेली अधिक माहिती अशी की, सातारा आगारातील चालक सुरेश गायकवाड हे सातारा-खडगांव ही एसटी बस घेऊन साताराहून खडगावकडे निघाले होते. बुधवारी सकाळी साडेआठच्या दरम्यान पोगरवाडी फाट्यानजीक एसटी बस आली असता सातारच्या दिशेने निघालेल्या पिकअपने वाहन (एमएच ११ - बीटी ५५६) चालकाने एसटी बसला झासा दिला. यानंतरही ही पिकअप पुढे निघून गेली. मात्र, थोड्याचवेळात ही पिकअप पुन्हा मागे आली आणि एसटी बसला आडवी मारली. यावेळी पिकअप चालक रामचंद्र बापू देशमुख, कृष्णत निकम, पवन रामचंद्र देशमुख पिकअपमधून खाली उतरले आणि त्यांनी चालक सुरेश गायकवाड यांना गाडीतील हातोड्याने मारहाण केली. हा प्रकार सुरू असतानाच मानेवाडी-अंबवडे खुर्द येथील काही युवकांना मारहाण करणाऱ्या तीन युवकांनी फोन करून घटनास्थळी बोलावले. याचवेळी गाडीत असणाऱ्या वाहक आणि काही प्रवाशांनी सोडविण्याचा प्रयत्न केला; परंतु युवकांनी त्यांनाही मारहाण केली. याचवेळी काही ग्रामस्थांनी फोनवरून ही घटना परळी ग्रामस्थांना कळविली. यानंतर परळी परिसरातील युवकांनी घटनास्थळाकडे धाव घेतली. यामुळे येथे वाहतुकीची मोठी कोंडी झाली. काही वेळानंतर पोलीस, एसटीचे अधिकारीही घटनास्थळी पोहोचले. ‘हल्लेखोरांना आमच्या ताब्यात द्या किंवा त्यांना तत्काळ अटक करा,’ असा पवित्रा घेतला. काही ग्रामस्थांनी रस्त्यावर ठिय्या मांडत वाहतूक थांबविली. यावेळी सातारा आगारव्यवस्थापक नीलम गिरी, सहायक पोलीस निरीक्षक हेमंत साठे, वाहतूक अधिकारी के. टी. पाटील, सहायक फौजदार शशिकांत फडतरे उपस्थित होते. (वार्ताहर)